Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 16

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

 

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01. 1958 मध्ये महर्षी कर्वे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ?
1) पद्मभूषण
2) भारतरत्न
3) पद्मविभूषण
4) महाराष्ट्र भूषण
उत्तर : भारतरत्न

02. ‘हळद लागणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता आहे ?
1) कावीळ होणे
2) फसवणूक होणे
3) साध्य करणे
4) विवाह होणे
उत्तर : विवाह होणे

03. भारतीय वन सर्वेक्षण विभागाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1) 1981 साली
2) 1985 साली
3) 1989 साली
4) 1984 साली
उत्तर : 1981 साली

04. महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ?
1) नागपूर
2) पुणे
3) मुंबई
4) दिल्ली
उत्तर : मुंबई

marathi naukri telegram

05. श्रीलंका हा देश पूर्वी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जात होता ?
1) सिलोनका
2) सिंका
3) सिलोन
4) यापैकी नाही
उत्तर : सिलोन

06. भारतातील सर्वात घनदाट जंगलाचे क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1) ओडिशा
2) अरुणाचल प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) महाराष्ट्र
उत्तर : अरुणाचल प्रदेश

07. ज्या सॉफ्टवेअर द्वारे वेबसाईट मध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हटले जाते ?
1) सर्व्हर
2) इंटरनेट
3) ब्राऊझर
4) यापैकी नाही
उत्तर : ब्राऊझर

08. भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एलनिनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो ?
1) पॅसिफिक महासागर
2) अटलांटिक महासागर
3) हिंदी महासागर
4) आर्क्टिक महासागर
उत्तर : पॅसिफिक महासागर

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

09. नोमॅडिक इलेफंट हा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशात पार पडलेला होता ?
1) भारत व इंडोनेशिया
2) भारत व फ्रान्स
3) भारत व रशिया
4) भारत व मंगोलिया
उत्तर : भारत व मंगोलिया

10. सन 1906 मध्ये कोणत्या क्रांतिकारकांनी ‘युगांतर’ हे क्रांतीचा प्रचार करणारे वृत्तपत्र सुरू केले ?
1) वीरेंद्र कुमार घोष
2) भूपेंद्रनाथ दत्त
3) 1 आणि 2 दोन्ही
4) हेमचंद्र दास
उत्तर : 1 आणि 2 दोन्ही

11. सप्टेंबर 1929 मध्ये लाहोर कटातील कोणत्या क्रांतीकारकाने 64 दिवसांच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान केले ?
1) बटुकेश्वर दत्त
2) बाबू गेनू
3) शिरीष कुमार
4) जतीनदास
उत्तर : जतीनदास

12. भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले ?
1) मुंबई
2) नवी दिल्ली
3) म्हैसूर
4) यापैकी नाही
उत्तर : नवी दिल्ली

marathi naukri telegram

13. भारतात वन महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृक्षारोपण उत्सवाचे जनक खालीलपैकी कोण आहेत ?
1) जवाहरलाल नेहरू
2) सुभाषचंद्र बोस
3) महात्मा गांधी
4) के. एम. मूंशी
उत्तर : के. एम. मूंशी

14. ‘परोक्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल ?
1) अप्रत्यक्ष
2) प्रत्यक्ष
3) पराधीन
4) दृष्टीआड
उत्तर : प्रत्यक्ष

15. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी दख्खन शेतकरी सहाय्य कायदा पारित केला ?
1) 1857 साली
2) 1885 साली
3) 1900 साली
4) 1879 साली
उत्तर : 1879 साली

 


 

6 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 16”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *