Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 08

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2022 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

प्रश्न : 1. खालीलपैकी कोणती एक शहरांची जोडी कुंभार्ली घाटातून जाणाऱ्या रस्त्याने परस्परांशी जोडली आहे ?
1) कोल्हापूर व रत्नागिरी
2) सांगली व मालवण
3) कराड व चिपळूण
4) पुणे व सातारा
उत्तर : कराड व चिपळूण

प्रश्न : 2. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाली ?
1) पंजाब
2) गुजरात
3) महाराष्ट्र
4) पश्चिम बंगाल
उत्तर : महाराष्ट्र

प्रश्न : 3. खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी (नेफा) NEFA या नावाने ओळखले जात होते ?
1) अरुणाचल प्रदेश
2) मध्य प्रदेश
3) आंध्र प्रदेश
4) कर्नाटक
उत्तर : अरुणाचल प्रदेश

प्रश्न : 4. भूकंप प्रणव क्षेत्राचा नकाशानुसार भारत किती भूकंप प्रणव क्षेत्रामध्ये विभागला आहे ?
1) एक
2) दोन
3) चार
4) पाच
उत्तर : चार

प्रश्न : 5. ‘केवलादेव राष्ट्रीय उद्यान’ खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
1) सिंह
2) पक्षी प्रजाती
3) वाघ
4) हरीण
उत्तर : पक्षी प्रजाती

प्रश्न : 6. सिंधू खोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड (The Great Bath) सापडले आहेत ?
1) लोथल
2) मोहेंजोदडो
3) मेहरगड
4) हडप्पा
उत्तर : मोहेंजोदडो

प्रश्न : 7. भारतातील कोणत्या राज्यात सेवन सिस्टर्स फॉल्स (धबधबा) आहे ?
1) ओडिशा
2) मणिपूर
3) मेघालय
4) मिझोरम
उत्तर : मेघालय

marathi naukri telegram

प्रश्न : 8. दलदली परिसंस्थांच्या संवर्धनाशी संबंधित खालीलपैकी कोणता करार आहे ?
1) बोन करार
2) रामसर करार
3) व्हिएन्ना करार
4) बॅसेल करार
उत्तर : रामसर करार

प्रश्न : 9. प्रसिद्ध कला शैली ‘मधुबनी’ कोणत्या राज्याची संबंधित आहे ?
1) बिहार
2) ओडिशा
3) पश्चिम बंगाल
4) आसाम
उत्तर : बिहार

प्रश्न : 10. ‘पियुष’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
1) अमृत
2) निषाद
3) प्रदोष
4) विषारी
उत्तर : अमृत

प्रश्न : 11. भारताची पहिली महिला बँक कोणत्या नावाने ओळखली जाते ?
1) वुमेन्स बँक ऑफ इंडिया
2) महिला बँक ऑफ इंडिया
3) भारतीय महिला बँक
4) महिला स्टेट बँक ऑफ इंडिया
उत्तर : भारतीय महिला बँक

प्रश्न : 12. ‘धारोष्ण’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा .
1) धार + उष्ण
2) धारो + उष्ण
3) धरा + उष्ण
4) धारा + उष्ण
उत्तर : धारा + उष्ण

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

 

प्रश्न : 13. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी कोणती आहे ?
1) अग्र x टोक
2) तारुण्य x यौवन
3) कठोर x मृदू
4) छंद x नाद
उत्तर : कठोर x मृदू

प्रश्न : 14 खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
चोराची पावले …………….
1) पोलिसालाच ठाऊक
2) कुत्र्यालाच ठाऊक
3) अंधाराला ठाऊक
4) चोरालाच ठाऊक
उत्तर : चोरालाच ठाऊक

प्रश्न : 15. ‘वात्रट’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
1) चहाटळ
2) आगाऊ
3) सद्गुनी
4) पोरकट
उत्तर : सद्गुनी

marathi naukri telegram

प्रश्न : 16. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द कोणता ?
योग्य काळजी घेतल्यामुळे आंदोलनाला कोणतेही ……….. लागले नाही .
1) गालबोट
2) सुरवंट
3) कडीपाट
4) कणवट
उत्तर : गालबोट

प्रश्न : 17. थार वाळवंटामधून कोणती नदी वाहते ?
1) बियास नदी
2) लूनी नदी
3) झेलम नदी
4) गोदावरी नदी
उत्तर : लूनी नदी

प्रश्न : 18. ‘कपिलाषष्ठीचा योग येणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे ?
1) एखाद्या व्यक्तीचा साठावा वाढदिवस साजरा करणे
2) कपिला षष्ठी नावाचे योगासन करता येणे
3) अत्यंत दुर्मिळ आणि उत्कृष्ट संधी उपलब्ध होणे
4) कपिला जातीच्या गाईला बछडा होणे
उत्तर : अत्यंत दुर्मिळ आणि उत्कृष्ट संधी उपलब्ध होणे

प्रश्न : 19. भारतामध्ये ॲटॉल प्रवाळ भित्तिका कोणत्या ठिकाणी आढळून येतात ?
1) लक्षद्वीप बेट समूह
2) मन्नारचे आखात
3) अंदमान आणि निकोबार बेट
4) कच्छचे आखात
उत्तर : लक्षद्वीप बेट समूह

प्रश्न : 20. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा .
1) श्रमजीवी x कष्टाळू
2) खरेदी x विक्री
3) नर x मादी
4) गुप्त x उघडा
उत्तर : श्रमजीवी x कष्टाळू

प्रश्न : 21. खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे किनारालगतचे खाजण आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खाजण आहे ?
1) चिल्का सरोवर, ओडिशा
2) पुलिकत सरोवर, आंध्रप्रदेश
3) सांभर खारे सरोवर, राजस्थान
4) यापैकी नाही
उत्तर : चिल्का सरोवर, ओडिशा

प्रश्न : 22. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
म्हाताऱ्या व लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण
1) पांगुळगाडा
2) पांजरपोळ
3) चावडी
4) धर्मशाळा
उत्तर : पांजरपोळ

marathi naukri telegram

प्रश्न : 23. भारत सरकारकडून राजस्थान मधील कोणत्या ठिकाण ‘चित्ता पुनरुत्पादन योजना’ यासाठी निवडले गेले ?
1) नाहरगढ
2) शेरगढ
3) रामगढ
4) शहागढ
उत्तर : शहागढ

प्रश्न : 24. भारतातील खालीलपैकी कोणते जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये येत नाही ?
1) कांचनगंगा
2) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
3) सिमली पाल
4) अमरकंटक
उत्तर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

प्रश्न : 25. खालीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
1) ठग – चोर
2) झाड – तरू
3) खेडे – गाव
4) ऋतू – संकट
उत्तर : ऋतू – संकट

प्रश्न : 26. खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले होते ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) मध्य प्रदेश
4) उत्तर प्रदेश
उत्तर : महाराष्ट्र

प्रश्न : 27. भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
1) पांढरा गेंडा
2) वाघ
3) बगळे
4) हत्ती
उत्तर : वाघ

प्रश्न : 28. अकबराचे चरित्र ‘अकबरनामा’ हे कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे ?
1) फारसी
2) हिंदी
3) संस्कृत
4) उर्दू
उत्तर : फारसी

प्रश्न : 29. खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची वितरिका आहे आणि ती नदी बांगलादेश मध्ये वाहते ?
1) पद्मा नदी
2) भागीरथी नदी
3) चांदपुर नदी
4) मंदाकिनी नदी
उत्तर : पद्मा नदी

प्रश्न : 30. भोपाळ वायू दुर्घटना ही ………… गळतीचा परिणाम होता .
1) मिथेन
2) लिक्वीड नायट्रोजन
3) कार्बन डायऑक्साइड
4) मिथाईल आयसोसायनाईट
उत्तर : मिथाईल आयसोसायनाईट

marathi naukri telegram

प्रश्न : 31. राष्ट्रीय साखर संस्था ( National Sugar Institute ) …………… मध्ये स्थित आहे.
1) वाराणसी
2) नवी दिल्ली
3) कानपूर
4) लखनऊ
उत्तर : कानपूर

प्रश्न : 32. ‘भारत कला भवन’ हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) नवी दिल्ली
2) वाराणसी
3) जयपूर
4) आग्रा
उत्तर : वाराणसी

प्रश्न : ३३. समूहदर्शक शब्द ओळखा.
जसा पक्षांचा थवा तसा हरणाचा ……………
1) कुंज
2) भारा
3) कळप
4) संच
उत्तर : कळप

प्रश्न : 34. खालीलपैकी कोणत्या ठिकाण ऑइल इंजिन उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
1) रत्नागिरी
2) किर्लोस्करवाडी
3) जळगाव
4) येवले
उत्तर : किर्लोस्करवाडी

 


 

Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 08

4 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 08”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *