Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 06

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2022 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

प्रश्न : 1. उपमेयाला दुसऱ्या कशाशीच उपमा देता येत नसेल, म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा, ………… अलंकार होतो .
1) उत्प्रेक्षा
2) स्वभावोक्ती
3) व्यतिरेक
4) अनन्वय
उत्तर : अनन्वय

प्रश्न : 2. तांडव नृत्य करणे या वाक्प्रचाराचा समान अर्थ असा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे .
1) मनाशी खुणगाट बांधणे
2) चित्त एकाग्र होणे
3) उडानटप्पू गिरी करणे
4) थयथयाट करणे
उत्तर : थयथयाट करणे

प्रश्न : 3. जगात जैवविविधता करार खालीलपैकी कोणत्या वर्षी अमलात आला ?
1) 1981 साली
2) 1997 साली
3) 1993 साली
4) 2000 साली
उत्तर : 2000 साली

प्रश्न : 4. सुभाष चंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे रेजिमेंटल मार्चिंग गाणे खालीलपैकी कोणते होते ?
1) कदम कदम बढाये जा
2) ये मेरे वतन के लोगो
3) एक ला चलो रे
4) अपनी आजादी को हम
उत्तर : कदम कदम बढाये जा

प्रश्न : 5. भारतीय चलनासाठी ₹ चिन्हाची रचना खालीलपैकी कोणी केली आहे ?
1) आर. के. पाचौरी
2) अतुल एस पांडे
3) राममूर्ती जानकी
4) उदयकुमार
उत्तर : उदयकुमार

प्रश्न : 6. नव्याने नियुक्त केंद्रीय दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतात ?
1) राष्ट्रपती
2) भारताचे मुख्य न्यायाधीश
3) सीबीआय प्रमुख
4) यापैकी नाही
उत्तर : राष्ट्रपती

प्रश्न : 7. महाराष्ट्रातील वर्धा जवळील सेवाग्राम आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केले आहे ?
1) पंडिता रमाबाई
2) अण्णा हजारे
3) विनोबा भावे
4) महात्मा गांधी
उत्तर : महात्मा गांधी

marathi naukri telegram

प्रश्न : 8. कंजूष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
1) नमन
2) कृपण
3) दृष्ट
4) अधम
उत्तर : कृपण

प्रश्न : 9. भारतात पहिला ई पासपोर्ट खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता ?
1) सोमनाथ चॅटर्जी
2) प्रणव मुखर्जी
3) नरेंद्र मोदी
4) प्रतिभा देवीसिंग पाटील
उत्तर : प्रतिभा देवीसिंग पाटील

प्रश्न : 10. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा .
1) सुगंध x मुद्गांध
2) होकार x नकार
3) वात x वायू
4) कडक x टणक
उत्तर : होकार x नकार

प्रश्न : 11. ‘कान्हा टायगर रिझर्व’ हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
1) मध्य प्रदेश
2) गुजरात
3) तेलंगणा
4) छत्तीसगड
उत्तर : मध्य प्रदेश

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

 

प्रश्न : 12. खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करीत आहे ?
1) बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी
2) सेव व्हल्चर्स
3) बोर्ड फॉर इंडियन वाइल्ड लाईफ
4) इंडियन वाइल्ड लाईफ असोसिएशन
उत्तर : बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी

प्रश्न : 13. भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ?
1) कर्नाटक
2) मध्य प्रदेश
3) पश्चिम बंगाल
4) आसाम
उत्तर : मध्य प्रदेश

प्रश्न : 14. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवाळ भित्तिका (कोरल रिफ ) आढळत नाही ?
1) मन्नारचे आखात
2) कच्छचे आखात
3) सुंदरबन त्रिभुज प्रदेश
4) अंदमान आणि निकोबार बेटे
उत्तर : सुंदरबन त्रिभुज प्रदेश

प्रश्न : 15. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक –
1) पक्षपाती
2) पंच
3) निरपेक्ष
4) पुढारी
उत्तर : पंच

प्रश्न : 16. महाराष्ट्रात पेंच नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेले आहे ?
1) ईसापुर
2) तोतलाडोह
3) उजनी
4) जायकवाडी
उत्तर : तोतलाडोह

प्रश्न : 17. दिल्लीतील शांतीवन भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केले स्मारक आहे ?
1) राजीव गांधी
2) जवाहरलाल नेहरू
3) अटल बिहारी वाजपेयी
4) इंदिरा गांधी
उत्तर : इंदिरा गांधी

marathi naukri telegram

18. ‘स्वस्थ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
1) बेचैन
2) चैनी
3) अल्लड
4) शरीर
उत्तर : बेचैन

प्रश्न : 19. धाबे दणाणणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल ?
1) प्रचंड घाबरणे
2) अतिशय जोरात धोब्याने कपडे धुणे
3) जोरात उड्या मारणे
4) स्तुती करणे
उत्तर : प्रचंड घाबरणे

प्रश्न : 20. पहिले साग वृक्षाचे संग्रहालय (टिक संग्रहालय) कोणत्या शहरात स्थित आहे ?
1) कोडाईकनाल
2) उटी
3) निलांबुर
4) तिरूचिरापल्ली
उत्तर : निलांबुर

प्रश्न : 21. खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे ?
1) दिसपूर
2) कोईमतुर
3) अहमदाबाद
4) दार्जीलिंग
उत्तर : दिसपूर

प्रश्न : 22. नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय याचे नवीन नाव काय असणार आहे ?
1) पंतप्रधान संग्रहालय
2) भारत संग्रहालय
3) राष्ट्रपती संग्रहालय
4) मुख्यमंत्री संग्रहालय
उत्तर : पंतप्रधान संग्रहालय

प्रश्न : 23. संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्ष महिने आणि दिवस कार्य केले ?
1) 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस
2) 3 वर्ष 12 महिने 16 दिवस
3) 4 वर्ष 18 महिने 6 दिवस
4) वरीलपैकी नाही.
उत्तर : 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस

प्रश्न : 24. ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य कशाचे उदाहरण आहे ?
1) समुद्री संरक्षित क्षेत्र
2) राष्ट्रीय उद्यान जागतिक
3) वारसा साईट
4) जीवावरण राखीव क्षेत्र
उत्तर : समुद्री संरक्षित क्षेत्र

प्रश्न : 25. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे ?
1) हेमिस राष्ट्रीय उद्यान
2) नामडाफा राष्ट्रीय उद्यान
3) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
4) राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान
उत्तर : हेमिस राष्ट्रीय उद्यान

marathi naukri telegram

प्रश्न : 26. महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला ?
1) दिल्ली
2) चंपारण्य
3) कलकत्ता
4) बडोदा
उत्तर : चंपारण्य

प्रश्न : 27. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
कोठे चंद्राचा ऐरावत नि……………
1) कोठे विष्णूचा गरुड
2) कोठे शंकराचा नंदी
3) कोठे इंद्राची नगरी
4) कोठे शामभट्टाची तटणी
उत्तर : कोठे शामभट्टाची तटणी

प्रश्न : 28. मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर कोणत्या नावाने ओळखला जात असे ?
1) चौथ
2) तीर्थयात्रा कर
3) जाझिया कर
4) यापैकी नाही
उत्तर : चौथ

प्रश्न : 29. भारतातील शीत वाळवंट जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
1) मध्यप्रदेश
2) गुजरात
3) हिमाचल प्रदेश
4) अरुणाचल प्रदेश
उत्तर : हिमाचल प्रदेश

प्रश्न : 30. बटरफ्लाय स्ट्रोक हे शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
1) कुस्ती
2) टेनिस
3) जलतरण
4) हॉलीबॉल
उत्तर : जलतरण

प्रश्न : 32. अरुंधती रॉय यांच्या २०२१ साली प्रसिद्ध झालेल्या कोणत्या निबंधाला युरोपीयन निबंध पुरस्कार मिळाला आहे ?
1) स्वातंत्र्य
2) भारत
3) आझादी
4) संविधान
उत्तर : आझादी

marathi naukri telegram

प्रश्न : 33.आशिया चषक एकदिवशीय क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात संयुक्तरित्या होणार आहे ?
1) भारत व श्रीलंका
2) श्रीलंका व पाकिस्तान
3) बांगलादेश व नेपाळ
4) मलेशिया व चीन
उत्तर : श्रीलंका व पाकिस्तान

प्रश्न : 34.शहीद सैनिकाच्या सन्माणार्थ संयुक्त राष्ट्रात स्मारक भिंत उभरण्यासाठी कोणत्या देशाने प्रस्ताव मांडला होता तो संयुक्त राष्ट्राने मंजूर केला आहे ?
1) अमेरिका
2) ऑस्ट्रेलिया
3) भारत
4) जपान
उत्तर : भारत

प्रश्न : 35. भारत कोणत्या देशाकडून MQ-9 B हे ड्रोन खरेदी करणार आहे ?
1) अमेरिका
2) रशिया
3) जर्मनी
4) सिंगापूर
उत्तर : अमेरिका

 


 

2 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 06”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *