Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 07

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2022 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

प्रश्न : 1. वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी. . .. . ……. हा भारतीय संसदेचा अधिनियमित केलेला कायदा आहे.
1) वन्य जीव संरक्षण कायदा 1972
2) भारतीय वन अधिनियम 1927
3) वनसंवर्धन अधिनियम 1980
4) वन आश्रित समुदायाची मालकी कायदा 2005
उत्तर : वन्य जीव संरक्षण कायदा 1972

प्रश्न : 2. खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध मुळांचे साकव (लिव्हिंग रुट ब्रीज) आढळतात ?
1) आसाम
2) मिझोराम
3) मेघालय
4) सिक्कीम
उत्तर : मेघालय

प्रश्न : 3. ‘बार उडवणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे ?
1) एखाद्या कार्याची पूर्तता करणे
2) दिवाळीच्या फटाक्यांचा आनंद लुटणे
3) लक्ष्मी नावाचा आवाज करणारा फटाके फोडणे
4) एखाद्याच्या मुस्कटात मारणे
उत्तर : एखाद्या कार्याची पूर्तता करणे

प्रश्न : 4. ‘फ्रेंच भाषा’ ही भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे अधिकृत भाषा आहे ?
1) गोवा
2) पाँडिचेरी
3) दमण आणि दीव
4) लक्षद्वीप
उत्तर : पाँडिचेरी

प्रश्न : 5. महाराष्ट्रात 2012 साली स्थापन करण्यात आलेले वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे ?
1) मयुरेश्वर सुपे
2) मानसिंग देव
3) कारंज सोहोळ
4) उमरेड खारंगला
उत्तर : उमरेड खारंगला

प्रश्न : 6. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधित केले होते ?
1) सुभाष चंद्र बोस
2) रवींद्रनाथ टागोर
3) बाळ गंगाधर टिळक
4) जवाहरलाल नेहरू
उत्तर : सुभाष चंद्र बोस

marathi naukri telegram

प्रश्न : 7. गुजरात राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे ?
1) एशियाई सिंह
2) वाघ
3) हत्ती
4) जिराफ
उत्तर : एशियाई सिंह

प्रश्न : 8. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट
1) वहिवाट
2) गावरान
3) शिवा
4) पानंदी
उत्तर : पानंदी

प्रश्न : 9. भारतातील नीलक्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत ?
1) हरिलाल चौधरी
2) वर्गीस कुरियन
3) शाली होत्र
4) एम. स्वामीनाथन
उत्तर : हरिलाल चौधरी

प्रश्न : 10. कुंडन-कुलम परमाणु ऊर्जा प्रकल्प स्थानक कोणत्या राज्यात आहे ?
1) आंध्र प्रदेश
2) तामिळनाडू
3) कर्नाटक
4) केरळ
उत्तर : तामिळनाडू

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

 

प्रश्न : 11. खालीलपैकी कोणाला भारताचे जल पुरुष म्हणून ओळखले जाते ?
1) राजेंद्र सिंग
2) राजेश्वर जयसिंग
3) एम. स्वामीनाथन
4) जी. डी.अगरवाल
उत्तर : राजेंद्र सिंग

प्रश्न : 12. ‘जीवाची उलाघाल होणे’ या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून समानार्थी वाक्प्रचार ओळखा .
1) पोटात धस होणे
2) जीव वरखाली होणे
3) ऊरसफोड करणे
4) जीव मोठी धरणे
उत्तर : जीव वरखाली होणे

प्रश्न : 13. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत जागतिक पर्यावरण चा जागतिक यजमान होता ?
1) 2018 साली
2) 2013 साली
3) 2015 साली
4) 2016 साली
उत्तर : 2018 साली

marathi naukri telegram

प्रश्न : 14. 1951 मध्ये भूदान आंदोलन खालीलपैकी कोणी सुरू केले होते ?
1) विनोबा भावे
2) बाबा आमटे
3) मेधा पाटकर
4) वि.दा. सावरकर
उत्तर : विनोबा भावे

प्रश्न : 15. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
1) खात्री-विश्वास
2) किमया-जादू
3) कष्ट-श्रम
4) जन-मन
उत्तर : जन-मन

प्रश्न : 16. मोहिनीअट्टम नृत्य शैली खालीलपैकी कोणत्या राज्यात विकसित झाली ?
1) कर्नाटक
2) केरळ
3) तामिळनाडू
4) तेलंगणा
उत्तर : केरळ

प्रश्न : 17. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये न्याय शब्दाचा उल्लेख काय व्यक्त करतो ?
1) सामाजिक राजकीय आणि धार्मिक न्याय
2) सामाजिक आर्थिक सांस्कृतिक न्याय
3) सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय
4) आर्थिक आणि सामाजिक न्याय
उत्तर : सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय

प्रश्न : 18. भारतातील कोणत्या राज्यात एलिफंट ( Elephant Falls) फॉल्स स्थित आहे ?
1) ओडिशा
2) मणिपूर
3) मेघालय
4) मिझोरम
उत्तर : मेघालय

प्रश्न : 19. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती ?
1) प्रसरण x अंकुचन
2) अबोल x वाचाळ
3) निर्भय x भित्रा
4) निद्रिस्त x सुप्त
उत्तर : निद्रिस्त x सुप्त

प्रश्न : 20. ‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
1) इजा
2) अपहार
3) अपचन
4) अनिती
उत्तर : इजा

marathi naukri telegram

प्रश्न : 21. खालीलपैकी कोणते भारतातील पर्यावरण संरक्षणाशी संबंधित धोरण नाही ?
1) राष्ट्रीय वन धोरण
2) प्रदूषण प्रतिबंधासाठी धोरण विधान
3) पर्यावरण आणि विकासावरील राष्ट्रीय संवर्धन धोरण आणि धोरण विधान
4) सार्वजनिक आरोग्य सुरक्षितता सुविधा धोरण
उत्तर : सार्वजनिक आरोग्य सुरक्षितता सुविधा धोरण

प्रश्न : 22. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
काठी मारल्याने ……… दुभंगत नाही.
1) पाणी
2) भिंत
3) जमीन
4) स्वर्ग
उत्तर : पाणी

प्रश्न : 23. अकबरनामा (अकबराचे पुस्तक) हे चरित्र कोणी लिहिले आहे ?
1) शेख मुबारक
2) अहमद लाहोरी
3) उस्ताद इसा
4) अबुल फजल
उत्तर : अबुल फजल

प्रश्न : 24. मध्यप्रदेशातील बालाघाट खाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत ?
1) कांस्य
2) ॲल्युमिनियम
3) तांबे
4) लोह
उत्तर : तांबे

प्रश्न : 25. खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
पूर्वी कधी पाहिले नाही असा –
1) अनभिज्ञ
2) अप्रूप
3) अपूर्व
4) अभिजात
उत्तर : अपूर्व

प्रश्न : 26. कोणत्या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली होती ?
1) सरकारीया समिती
2) संथनम समिती
3) बलवंत राय मेहता समिती
4) नरसिंह समिती
उत्तर : संथनम समिती

प्रश्न : 28. भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व कोणत्या ठिकाणी स्थापित केले गेले ?
1) नंदादेवी
2) हजारीबाग
3) निलगिरी
4) चामुंडा देवी
उत्तर : निलगिरी

marathi naukri telegram

प्रश्न : 29. ‘प्राचीन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा .
1) पूर्वांचल
2) अर्वाचीन
3) अश्मयुग
4) पाषाण युग
उत्तर : अर्वाचीन

प्रश्न : 30. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे ?
1) जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
2) मन्नार समुद्री राष्ट्रीय उद्यानाचे आखात
3) गीर वन्य राष्ट्रीय उद्यान
4) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
उत्तर : सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

 


 

10 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 07”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *