Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 20

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : (vanrakshak question) Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

 

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01. दर 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे, या शब्दाऐवजी एकच शब्द वापरा ?
1) मासिक
2) वार्षिक
3) साप्ताहिक
4) पाक्षिक
उत्तर : पाक्षिक

02. ज्याला लिहिता व वाचता मुलीच येत नाही असा ……………. ?
1) निरक्षर
2) वेडा
3) बावळट
4) अति शहाणा
उत्तर : निरक्षर

03. ‘ पाणी पडणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे ?
1) पाऊस पडणे
2) पराभव करणे
3) केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे
4) आशा सोडणे
उत्तर : केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे

04. पुढील म्हणीचा अर्थ सांगा – ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे’
1) विनाकारण छळ सहन करणे
2) अगतिक स्थिती होणे
3) विना तक्रार छळ सहन करणे
4) न बोलता मार सहन करणे
उत्तर : अगतिक स्थिती होणे

05. ‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली आहे ?
1) भालचंद्र नेमाडे
2) अरुण साधू
3) बाबासाहेब पुरंदरे
4) ना.धो.महानोर
उत्तर : बाबासाहेब पुरंदरे

marathi naukri telegram

06. ‘कर्नल बहादुर’ हे कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखकाचे टोपण नाव होते ?
1) आचार्य अत्रे
2) शिवाजी सावंत
3) व्यंकटेश माडगूळकर
4) नारायण सुर्वे
उत्तर : व्यंकटेश माडगूळकर

07. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1) गुजरात
2) कर्नाटक
3) तेलंगाना
4) महाराष्ट्र
उत्तर : महाराष्ट्र

08. महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाच्या प्रमुखाला काय म्हटले जाते ?
1) सहाय्यक पोलीस
2) आयुक्त पोलीस उपायुक्त
3) पोलीस उपअधीक्षक
4) उपविभागीय पोलीस अधिकारी
उत्तर : उपविभागीय पोलीस अधिकारी

09. सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते आहे ?
1) पंजाब
2) कर्नाटक
3) महाराष्ट्र
4) केरळ
उत्तर : महाराष्ट्र

🏆 महाराष्ट्र तलाठी भरती अजून महत्त्वाचे प्रश्नसंच 🏆
तलाठी भरती प्रश्नसंच 01
तलाठी भरती प्रश्नसंच 02
तलाठी भरती प्रश्नसंच 03
तलाठी भरती प्रश्नसंच 04
तलाठी भरती प्रश्नसंच 05

10. अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र (UOTC) याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
1) मुंबई
2) पुणे
3) छ.संभाजीनगर
4) नागपूर
उत्तर : नागपूर

11. महसूल खात्याचे ग्रामस्थारावरील दप्तर खालीलपैकी कोण सांभाळतो ?
1) तहसीलदार
2) बी. डी. ओ
3) तलाठी
4) ग्रामसेवक
उत्तर : तलाठी

12. नैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते ?
1) विधिमंडळ
2) आपत्कालीन व्यवस्थापन विभाग
3) ग्रामपंचायत
4) निवडणूक विभाग
उत्तर : आपत्कालीन व्यवस्थापन विभाग

13. महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते ?
1) 1 जानेवारी
2) 1 एप्रिल
3) 1 ऑगस्ट
4) 1 जुलै
उत्तर : 1 ऑगस्ट

14. ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवण्या कामी पोलीस पाटलाला कोण मदत करत असतो ?
1) कोतवाल
2) वरिष्ठ नागरिक
3) पोलीस शिपाई
4) यापैकी नाही
उत्तर : कोतवाल

15. गावांच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल खालीलपैकी कोण तयार करतो ?
1) ग्रामसेवक
2) सरपंच
3) तलाठी
4) पोलीस पाटील
उत्तर : तलाठी

marathi naukri telegram

16. ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ?
1) 18 वर्षे
2) 21 वर्षे
3) 25 वर्षे
4) 30 वर्ष
उत्तर : 18 वर्षे

17. खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका येत नाही ?
1) उल्हासनगर
2) परभणी
3) मालेगाव
4) बीड
उत्तर : बीड

18. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहेत ?
1) ठाणे
2) पुणे
3) मुंबई
4) नागपूर
उत्तर : ठाणे

19. पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे ?
1) 72 व्या
2) 74 व्या
3) 73 व्या
4) 75 व्या
उत्तर : 73 व्या

20. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1) केरळ
2) गुजरात
3) तेलंगणा
4) मध्य प्रदेश
उत्तर : गुजरात

marathi naukri telegram

21. मुळशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
1) सेनापती बापट
2) नानासाहेब पेशवे
3) तात्या टोपे
4) न्यायमूर्ती रानडे
उत्तर : सेनापती बापट

22. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
1) न्यायमूर्ती गोखले
2) न्यायमूर्ती रानडे
3) महात्मा फुले
4) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

23. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
1) शिवनेरी
2) सिंहगड
3) पुरंदर
4) रायगड
उत्तर : पुरंदर

24. सातारच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली होती ?
1) बाळाजीपंत नातू
2) रंगो बापूजी गुप्ते
3) आप्पासाहेब भोसले
4) कृष्णाजी भिडे
उत्तर : रंगो बापूजी गुप्ते

25. सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती ?
1) किसनवीर नागनाथ
2) अण्णा नायकवाडी
3) यशवंतराव चव्हाण
4) क्रांती नानासिंह पाटील
उत्तर : क्रांती नानासिंह पाटील

🏆 महाराष्ट्र वनरक्षक भरती अजून महत्त्वाचे प्रश्नसंच 🏆
वनरक्षक भरती प्रश्नसंच 11
वनरक्षक भरती प्रश्नसंच 12
वनरक्षक भरती प्रश्नसंच 13
वनरक्षक भरती प्रश्नसंच 14
वनरक्षक भरती प्रश्नसंच 15

26. छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
1) आर्य समाज
2) सत्यशोधक समाज
3) प्रार्थना समाज
4) ब्राह्मो समाज
उत्तर : सत्यशोधक समाज

27. महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता ?
1) थॉमस पेन
2) वॉल्टेयर
3) प्लेटो
4) यापैकी नाही
उत्तर : थॉमस पेन

28. भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली ?
1) 1948 साली
2) 1950 साली
3) 1951 साली
4) 1952 साली
उत्तर :1952 साली

29. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे ?
1) 25 वर्षे
2) 30 वर्षे
3) 45 वर्षे
4) 35 वर्ष
उत्तर : 35 वर्ष

30. ‘अखिल भारतीय सेवा’ ची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे ?
1) कलम 311
2) कलम 312
3) कलम 377
4) कलम 342
उत्तर : कलम 312

 


Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 20

One thought on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 20”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *