Talathi Question Paper Online Test 05 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 05

Talathi Question Paper Online Test 05

Talathi Question Paper Online Test 05

Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.

Talathi Question Paper Online Test 05  यामध्ये आज आपण 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या Talathi Bharti Exams चे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न घेत आहोत.

Talathi Question Paper Online Test 05

01: खालीलपैकी कोणत्या देशात खारफुटीची (मँगरोव्ह) शक्यता कमीत कमी असू शकते ?
1) डेन्मार्क
2) मेक्सिको
3) ब्राझील
4) इंडोनेशिया
उत्तर : डेन्मार्क
स्पष्टीकरण : खारफुटीची वने – समुद्राजवळ वाढणारा अनेक जातींच्या वनस्पतीचा समूह आहे.
खारफुटी ही चिखलात घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते.
मराठीत त्या वनांना कच्छ वनस्पती असे देखील म्हटले जाते.

02: कोणत्या प्रकल्पाला प्रिन्स विल्यम यांच्या द्वारे घोषित प्रथम ‘अर्थशॉट प्राइज’ याचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले ?
1) एनव्हिरोंन इंडिया
2) आर्केडिस
3) टाकाचर
4) यापैकी नाही
उत्तर : टाकाचर
स्पष्टीकरण : भारताच्या टाकचर या प्रकल्पाला क्लीन अवर एअर श्रेणीत ब्रिटनचा प्रिन्स विल्यम यांच्या द्वारे घोषित प्रथम अर्थशॉट प्राइस याचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले.

🟢 अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 🟢
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

03: धाराशीव जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे ?
1) तुळजाई
2) उपळा
3) शिंगोली
4) तेरणा
उत्तर : उपळा
स्पष्टीकरण : जरबेरा हे बिनवासाचे पण बहुवर्षायू फुलझाड आहे.
महाराष्ट्रात अहमदनगर नाशिक पुणे सांगली कोल्हापूर व धाराशीव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
धाराशीव जिल्ह्यातील जरबेरा फुलाचे उपळा या नावाने नामकरण करण्यात आले.

 

04: पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची…….. असे म्हणतात.
1) किंमत
2) उत्पादन मूल्य
3) मागणी
4) क्रयशक्ती
उत्तर : क्रयशक्ती
स्पष्टीकरण : मौद्रिक विनिमय दर दोन चलनाच्या खरेदी विक्रीचा दर दर्शवतो.
तर वास्तविक विनिमय दर दोन चलनाच्या तुलनात्मक खरेदी शक्तीचा दर्शवतो.
त्यामुळे याला खरेदी शक्ती समानते किंवा क्रयशक्ती समानतेचा दर संबोधले जाते.

05: कोणत्या राज्य सरकारने आदिवासी समाजातील लोकांसाठी आयोध्या शहरातील श्रीराम जन्मभूमी यात्रेसाठी प्रतिव्यक्ती 5000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे ?
1) गुजरात
2) उत्तरप्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड
उत्तर : गुजरात
स्पष्टीकरण : गुजरात सरकारने राज्यातील आदिवासी समाजातील लोकांसाठी आयोध्या शहरातील श्रीराम जन्मभूमी यात्रेसाठी प्रतिव्यक्ती पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर आहे.

marathi naukri telegram

06: कोणत्या राज्याचे नाव अंदमान आणि निकोबार बेटे येथील “हॅरिएट” पर्वताला देण्यात आले ?
1) मेघालय
2) आसाम
3) मणिपूर
4) मिझोरम
उत्तर : मणिपूर
स्पष्टीकरण : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पोर्टब्लेअर मधील कालापानी येथे असलेले हॅरिएट पर्वताचे नाव बदलण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
या पर्वताचे नाव बदलून मणिपूर पर्वत असे ठेवले जाईल.
हॅरिएट पर्वत शिखर उंची 383 मीटर आहे आणि हे अंदमान आणि निकोबार बेट प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च बेट शिखर आहे.

07: सन 2017 मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकेमध्ये विलीन झाल्या आहेत ?
1) पाच
2) नऊ
3) आठ
4) सहा
उत्तर : सहा
स्पष्टीकरण : 2017 मध्ये भारतीय स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँका – स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपुर, स्टेट बँक ऑफ रायपुर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, भारतीय महिला बँक या सहा बँका विलीन झाल्या आहेत.

09: दारिद्ररेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे ?
1) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
2) सावित्रीबाई आधार योजना
3) अटल आरोग्य योजना
4) यापैकी नाही
उत्तर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
स्पष्टीकरण : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दारिद्ररेषेखालील तसेच केसरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी 972 विविध आजारांमध्ये रुग्णास दीड लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

10: भीतीने थरकाप उडणे – या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा ?
1) कानाचे पडदे फाटणे
2) काळजाचे पाणी होणे
3) उलट्या काळजाचे असणे
4) बोळकांडी बसणे
उत्तर : काळजाचे पाणी होणे

11: कोणत्या संस्थेच्यावतीने NPCI टोकनायझेशन सिस्टीम सादर करण्यात आली ?
1) भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ
2) भारतीय माहिती सुरक्षा परिषद
3) A आणि B
4) यापैकी नाही
उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ
स्पष्टीकरण : नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) याने व्यापाऱ्याकडे कार्ड तपशील साठवण्याचा पर्याय म्हणून कार्डांच्या टोकनायझेशनला समर्थन देण्यासाठी NPCI टोकनायझेशन सिस्टीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.

12: डायनामाईटचा अविष्कार खालीलपैकी कोणी केला आहे ?
1) सिंगमंड फ्रोयड
2) रुडॉल्फ डीजल
3) थॉमस एडिसन
4) आल्फ्रेड नोबेल
उत्तर : आल्फ्रेड नोबेल
स्पष्टीकरण : अल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1867 मध्ये डायनामाईटचा शोध लावला.
1901 या वर्षापासून अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार देण्यात येतो.
दरवर्षी 10 डिसेंबर रोजी या पुरस्काराचं म्हणजेच नोबेल पुरस्काराचे वितरण केले जात.


Talathi Question Paper Online Test 05 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 05

 

One thought on “Talathi Question Paper Online Test 05 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 05”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *