Vanrakshak Bharti IMP Questions 2023 : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2022 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.
प्रश्न : 01. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या राष्ट्रीय ध्वजावरील तत्कालीक समितीचे अध्यक्ष होते ?
1) जे.बी. कृपलानी
2) जवाहरलाल नेहरू
3) डॉ. राजेंद्र प्रसाद
4) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
प्रश्न : 02. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देशिका स्वीकारली आहे ?
1) कॅनडा
2) ऑस्ट्रेलिया
3) युनायटेड किंगडम
4) युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
उत्तर : युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
प्रश्न : 03. भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
1) चेन्नई
2) विजयवाडा
3) विशाखापट्टणम
4) गुंटूर
उत्तर : चेन्नई
प्रश्न : 04. जगप्रसिद्ध पुष्कर तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ?
1) जयपुर
2) जोधपुर
3) अजमेर
4) कोटा
उत्तर : अजमेर
प्रश्न : 05. पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
1) महात्मा गांधी
2) महात्मा फुले
3) पंडिता रमाबाई
4) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : महात्मा फुले
प्रश्न : 06. मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद याचा लोगो काय आहे ?
1) किंगफिशर
2) माळढोक
3) ग्रेट हॉर्नबिल
4) पारवा
उत्तर : ग्रेट हॉर्नबिल
प्रश्न : 07. भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे ?
1) हिरालाल चौधरी
2) वर्गीस कुरियन
3) शालीहोत्रा
4) एम. एस. स्वामीनाथन
उत्तर : एम. एस. स्वामीनाथन
प्रश्न : 08. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
1) सुलक्षणी – कुलक्षणी
2) निर्गुण – सगुण
3) नियंत्रित – निराकार
4) प्रामाणिक – अप्रामाणिक
उत्तर : नियंत्रित – निराकार
प्रश्न : 09. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ?
1) कळसुबाई
2) लोहगड
3) रायगड
4) महाबळेश्वर
उत्तर : कळसुबाई
प्रश्न : 10 .प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा.
क्रांती दिनाला सर्व क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना …………. करण्यात आले.
1) अभिवादन
2) आक्रंदन
3) समर्थन
4) स्वादन
उत्तर : अभिवादन
प्रश्न : 11. द्राविडी प्राणायाम करणे ,या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य होईल.
1) सहजरीत्या होणारे काम कठीण रित्या पूर्ण करणे
2) लोकांना द्राविडी नावाचा योगाचा प्रकार शिकवणे
3) योगा करताना नमस्कार करणे
4) कोणतेही काम करताना श्वास जोरात सोडणे
उत्तर : सहजरीत्या होणारे काम कठीण रित्या पूर्ण करणे
प्रश्न : 12. डेहराडून मधील वन संशोधन संस्था याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1) 1906 साली
2) 1957 साली
3) 1970 साली
4) 1857 साली
उत्तर : 1906 साली
प्रश्न : 13. …………. ही पर्यावरणीय संरक्षणाची नियमन आणि सुनिश्चिती करण्यासाठी भारतातील केंद्रीय प्रशासकीय संस्था आहे .
1) पर्यावरण आणि वन मंत्रालय
2) पृथ्वी विज्ञान मंत्रालय
3) ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय
4) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
उत्तर : पर्यावरण आणि वन मंत्रालय
प्रश्न : 14. समूहदर्शक शब्द ओळखा. जसा चाव्यांचा जुडगा तसा पुस्तकांचा …………
1) गट्टा
2) टोळी
3) घोस
4) जुडी
उत्तर : गट्टा
प्रश्न : 15. ‘विहीर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल.
1) वापी
2) पट
3) याग
4) विहग
उत्तर : वापी
प्रश्न : 16. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
कावळ्याच्या शापाने ………….. मरत नसतात.
1) गाई
2) बाई
3) वासरे
4) मोर
उत्तर : गाई
प्रश्न : 17. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कस्तुरी हरिण प्रकल्प 1972 साली सुरू करण्यात आला होता ?
1) दचीगम राष्ट्रीय उद्यान
2) केदारनाथ राष्ट्रीय उद्यान
3) जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
4) पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान
उत्तर : केदारनाथ राष्ट्रीय उद्यान
अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09
प्रश्न : 18. ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
1) राजस्थान
2) उत्तर प्रदेश
3) ओडीसा
4) महाराष्ट्र
उत्तर : राजस्थान
प्रश्न : 19. ‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल.
1) वजन
2) क्षार
3) अवघड
4) कठीण
उत्तर : वजन
प्रश्न : 20. भारतातील …………. हा कायदा जंगली प्राणी पक्षी वनस्पतींचे संरक्षण पुरवतो .
1) वन्यजीव संरक्षण
2) पर्यावरण आणि वन
3) जैविक विविधता
4) पर्यावरण संरक्षण
उत्तर : वन्यजीव संरक्षण
प्रश्न : 21. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
1) त्रेमासिक
2) पाक्षिक
3) साप्ताहिक
4) मासिक
उत्तर : पाक्षिक
प्रश्न : 22. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.
1) हर्ष x दोष
2) ददात x उणीव
3) घाऊक x किरकोळ
4) तसदी x त्रास
उत्तर : घाऊक x किरकोळ
प्रश्न : 23. भारतातील प्रथम मल्टीस्पोर्ट संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले होते ?
1) कोलकत्ता
2) गुजरात
3) मुंबई
4) बेंगलोर
उत्तर : कोलकत्ता
प्रश्न : 24. ‘देवर्षी’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा .
1) देव + र्षी
2) देव + अर्षी
3) देव + ऋषी
4) देव + रूषी
उत्तर : देव + ऋषी
प्रश्न : 25. खालीलपैकी कोणाला ‘बर्ड मॅन ऑफ इंडिया’ या नावाने ओळखले जाते ?
1) माधव गाडगीळ
2) सलीम अली
3) सुंदरलाल बहुगुणा
4) वर्गीस कुरियन
उत्तर : सलीम अली
प्रश्न : 26. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
कष्ट करून जीवन जगणारे
1) पीडित
2) गरीब
3) श्रमजीवी
4) शोषित
उत्तर : श्रमजीवी
प्रश्न : 27. ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून दरवर्षी कोणता दिवस जगभरात साजरा केला जातो ?
1) 29 जून
2) 29 जुलै
3) 27 जुलै
4) 29 मे
उत्तर : 29 जुलै
प्रश्न : 28. महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे ?
1) भीमा नदी
2) कोयना नदी
3) गोदावरी नदी
4) तापी नदी
उत्तर : गोदावरी नदी
प्रश्न : 29. ‘कलमकारी ब्लॉक प्रिंट’ भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे ?
1) आंध्र प्रदेश
2) मध्य प्रदेश
3) उत्तर प्रदेश
4) पश्चिम बंगाल
उत्तर : आंध्र प्रदेश
प्रश्न : 30. वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा .
विज्ञान आणि मानवतावादाची …………. घालून काम करणे ही काळाची गरज आहे.
1) धनगड
2) भानगड
3) गडबड
4) सांगड
उत्तर : सांगड
प्रश्न : 31. महाराष्ट्रात भीमा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधलेले आहे ?
1) ईसापुर धरण
2) उजनी धरण
3) तोतलाडोह धरण
4) जायकवाडी धरण
उत्तर : उजनी धरण
प्रश्न : 32. ‘अन्नभाग्य योजना’ ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे ?
1) महाराष्ट्र
2) बिहार
3) तामिळनाडू
4) कर्नाटक
उत्तर : कर्नाटक
प्रश्न : 33. रशियाच्या लष्करामध्ये सैनिक म्हणून खालीलपैकी कोणते देशातील तरुणांची भरती केली जात आहे ?
1) बांगलादेश
2) भारत
3) मलेशिया
4) नेपाळ
उत्तर : नेपाळ
प्रश्न : 34. स्वातंत्र्यसैनिक शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
1) राजू देशमुख
2) बाबा भांड
3) ज्ञानेश्वर मुळे
4) पंकज शिक्रापूरकर
उत्तर : ज्ञानेश्वर मुळे