Vanrakshak Bharti IMP Questions 2023 : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2022 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

प्रश्न : 1. ‘अरी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
1) अमृत
2) अनोळखी
3) सखा
4) सुरी
उत्तर : सखा
प्रश्न : 2. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्य मध्ये पाहायला मिळतो ?
1) भीमाशंकर – पुणे
2) यावल – जळगाव
3) सागरेश्वर – सांगली
4) कर्नाळा – रायगड
उत्तर : भीमाशंकर – पुणे
प्रश्न : 3. खालीलपैकी कोणती व्यक्ती प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू नाही ?
1) सानिया मिर्झा
2) पी व्ही सिंधू
3) सायना नेहवाल
4) एन सिक्की रेड्डी
उत्तर : सानिया मिर्झा
प्रश्न : 4. पृथ्वीचा 71 टक्के भाग ……… ने व्यापलेला आहे.
1) पाणी
2) जमीन
3) वनस्पती
4) यापैकी नाही
उत्तर : पाणी
प्रश्न : 5. महाराष्ट्रात ‘येलदरी’ हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ?
1) परभणी
2) सोलापूर
3) पुणे
4) नांदेड
उत्तर : परभणी
प्रश्न : 6. ‘कावळा’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) एकाक्ष
2) वैताग
3) चक्षु
4) वावटळ
उत्तर : एकाक्ष
प्रश्न : 7. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते ?
1) मध्य प्रदेश
2) आंध्र प्रदेश
3) हिमाचल प्रदेश
4) अरुणाचल प्रदेश
उत्तर : मध्य प्रदेश
प्रश्न : 8. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
मोजकाच आहार घेणारा
1) खादाड
2) कुपमंडूक
3) मीतभोजक
4) अधाशी
उत्तर : मीतभोजक
प्रश्न : 9. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा.
पॅलेस्टाईनच्या राजाचा शेजारील राष्ट्रावरती छुपा हल्ला करण्याचा ……….. होता.
1) पारंबा
2) मुरांबा
3) मनसुबा
4) मनखुरा
उत्तर : मनसुबा
अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09
प्रश्न : 10. घूमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारतातील कोणत्या राज्याचे आहे ?
1) हरियाणा
2) पंजाब
3) उत्तर प्रदेश
4) राजस्थान
उत्तर : राजस्थान
प्रश्न : 11. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होत्या ?
1) सुजाता कृपलानी
2) राबडी देवी
3) रेणुका चौधरी
4) अमृत कौर
उत्तर : सुजाता कृपलानी
प्रश्न : 12. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
गाय व्याली …………..
1) बैल झाली
2) वाघ झाली
3) शिंगी झाली
4) शेळी झाली
उत्तर : शिंगी झाली
प्रश्न : 13. भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
1) मुख्य न्यायाधीश
2) पंतप्रधान
3) गृहमंत्री
4) राष्ट्रपती
उत्तर : पंतप्रधान
प्रश्न : 14. मध्यवर्ती ऊस संशोधन ( central Sugarcane Research Station ) ……….. मध्ये स्थित आहे .
1) महाराष्ट्र
2) कर्नाटक
3) मध्य प्रदेश
4) उत्तर प्रदेश
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न : 15. खालीलपैकी कोणत्या देशात खारफुटीची (मँगरोव्ह) शक्यता कमीत कमी असू शकते ?
1) डेन्मार्क
2) मेक्सिको
3) ब्राझील
4) इंडोनेशिया
उत्तर : डेन्मार्क
प्रश्न : 16. ‘परोपकार’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधीविग्रह कोणता ?
1) पर + उपकार
2) परो + उपकार
3) परउप + कार
4) पर + पकार
उत्तर : पर + उपकार
प्रश्न : 17. ‘अचंबा’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
1) आश्चर्य
2) आकांक्षा
3) आरंभ
4) अवलंब
उत्तर : आश्चर्य
प्रश्न : 18. भारतातील पहिली यशस्वी भूमिगत अणुबॉम्ब चाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती ?
1) पोखरण राजस्थान
2) हिसार हरियाणा
3) कच्छ गुजरात
4) बारमेर राजस्थान
उत्तर : पोखरण राजस्थान
प्रश्न : 19. खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशीला गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे ?
1) उत्तराखंड
2) उत्तर प्रदेश
3) बिहार
4) पश्चिम बंगाल
उत्तर : बिहार
प्रश्न : 20. भारतातील प्रथम महिला शिक्षक कोण मानल्या जातात ?
1) सावित्रीबाई फुले
2) रमाबाई रानडे
3) पंडिता रमाबाई
4) सरोजिनी नायडू
उत्तर : सावित्रीबाई फुले
प्रश्न : २१. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकारापैकी अधिकार येत नाही ?
1) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
2) समानतेचा हक्क
3) सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क
4) मालमत्तेचा हक्क
उत्तर : मालमत्तेचा हक्क
प्रश्न : 22. महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरू कोण होते ?
1) गोपाल कृष्ण गोखले
2) दादाभाई नौरोजी
3) लाल लजपत राय
4) महादेव गोविंद रानडे
उत्तर : गोपाल कृष्ण गोखले
प्रश्न : २३. भारतातील सांची महास्तुप हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) उत्तर प्रदेश
2) मध्य प्रदेश
3) अरुणाचल प्रदेश
4) आंध्र प्रदेश
उत्तर : मध्य प्रदेश
प्रश्न : 23. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती ?
1) नाशिक
2) रायगड
3) पुरंदर
4) जळगाव
उत्तर : रायगड
प्रश्न : 24. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
नवीन मतांचा पुरस्कार करणारा
1) पुराण मतवादी
2) उदारमतवादी
3) नवमतवादी
4) पुरस्कर्ता
उत्तर : नवमतवादी
प्रश्न : 25. भीतीने थरकाप उडणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा.
1) कानाचे पडदे फाटणे
2) उलट्या काळजाचे असणे
3) काळजाचे पाणी होणे
4) बोळकांडी बसणे
उत्तर : काळजाचे पाणी होणे
प्रश्न : 26. महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्त्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) कृष्णकांत
3) देवीलाल
4) जगजीवन राम
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न : 27. भारतातील कोणत्या राज्य भारतातील ऑर्किड राज्य (द ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया) म्हणून ओळखले जाते ?
1) मेघालय
2) मणिपूर
3) अरुणाचल प्रदेश
4) जम्मू काश्मीर
उत्तर : अरुणाचल प्रदेश
प्रश्न : 28. वनस्पती आणि प्राणी यांचे त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानापासून दूर केलेले संवर्धन ……. च्या अंतर्गत येते ?
1) इन सी टू संवर्धन
2) एक्स सी टू संवर्धन
3) अभयारण्य
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : एक्स सी टू संवर्धन
प्रश्न : 30. जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो ?
1) 14 जून
2) 13 जून
3) 12 जून
4) 11 जून
उत्तर : 14 जून
प्रश्न : 31. फोबर्स च्या जागतिक टॉप कंपन्याच्या यादी मध्ये भारतीय स्टेट बँक चा कितवा क्रमांक आहे ?
1) 76 वा
2) 77 वा
3) 78 वा
4) 80 वा
उत्तर : 77 वा
प्रश्न : 32. क्रिकेट मध्ये प्रतिष्ठित ऍसेस कसोटी क्रिकेट सिरीज कोणत्या दोन देशामध्ये खेळवण्यात येते ?
1) भारत आणि इंग्लंड
2) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलन्ड
3) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड
4) भारत आणि पाकिस्तान
उत्तर : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड
प्रश्न : 33. सिपरी च्या अहवाला नुसार सर्वाधिक अन्वस्त्राची संख्या कोणत्या देशात आहे ?
1) रशिया
2) चीन
3) भारत
4) पाकिस्तान
उत्तर : रशिया
प्रश्न : 34. महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळाने ने राज्यात कोठे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे ?
1) मुंबई
2) नाशिक
3) पुणे
4) ठाणे
उत्तर : पुणे
प्रश्न : 35. कोणत्या कंपनीचा शेअर भारतातील पहिला १ लाखाच्या वर किमतीचा शेअर ठरला आहे ?
1) MRF
2) टाटा
3) रिलायन्स
4) महिंद्रा
उत्तर : MRF

