Talathi Question Paper Online Test 06
Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.
Talathi Question Paper Online Test 05 यामध्ये आज आपण 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 चे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न घेत आहोत.
01: देशाच्या भिन्न भागांमध्ये होळीचे विविध प्रकार आहेत, महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागात याला काय म्हटले जाते ?
1) लाथमार होळी
2) रंगपंचमी
3) ढोल जत्रा
4) बसंत उत्सव
उत्तर : रंगपंचमी
02: ‘औषधालाही नसणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल ?
1) गावात डॉक्टर नसणे
2) घरात औषध नसणे
3) औषध न घेणे
4) एखादी गोष्ट अजिबात नसणे
उत्तर : एखादी गोष्ट अजिबात नसणे
03: ‘अंतःकरणाला पाझर फोडणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय कोणता ?
1) हृदयस्पर्शी
2) हृदयस्थ
3) हृदयद्रावक
4) हृदयाघात
उत्तर : हृदयद्रावक
04: भारतीय रेल्वेद्वारे वापरल्या जाणाऱ्या जैव शौचालय यंत्रणेमध्ये, मानवी विस्टेला पाणी आणि बायोगॅस मध्ये रूपांतरित करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
1) सुडोमोनस
2) एक्टीनोमायसेट्स
3) जिवाणूजन्य इनोक्युलम
4) क्लोस्ट्रीडीयम
उत्तर : जिवाणूजन्य इनोक्युलम
05: खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात ?
1) तामिळ व मल्याळी
2) सिंधी व बंगाली
3) पंजाबी व मल्याळी
4) सिंधी व कन्नड
उत्तर : सिंधी व कन्नड
06: कोणत्या समासात दोन्ही पदापेक्षा तिसरेच पद महत्त्वाचे असते आणि हा सामासिक शब्द ह्या तिसऱ्या पदाची विशेषण असते ?
1) द्वंद्व समास
2) अव्ययीभाव समास
3) बहुव्रिही समास
4) कर्मधारय समास
उत्तर : बहुव्रिही समास
07: ‘छत्तीसचा आकडा असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
1) तीन व सहा लिहिणे
2) छत्तीस गुण जुळणे
3) वैर असणे
4) विरुद्ध दिशांना पाहणे
उत्तर : वैर असणे
08: अकबरच्या मनसबदारी यंत्रणेखाली, व्यक्तीला किती संख्येने घोडदळ ठेवण्याची गरज आहे हे त्याच्या ………. श्रेणी वरून कळत असत.
1) मनसब
2) झात
3) सवार
4) जागीर
उत्तर : सवार
09: महाराष्ट्राने अटल सोलार कृषी पंप योजनेखाली नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची या मोफत भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे, या योजनेखाली खालीलपैकी कशाचा समावेश केलेला नाही ?
1) एलईडी बल्ब
2) डीसी फॅन
3) मोबाईल चार्जिंगचे सॉकेट
4) एलईडी टीव्ही
उत्तर : एलईडी टीव्ही
🟢 अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 🟢
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
10: डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता असेल ?
1) प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे
2) भांडण मिटवणे
3) नुकसान करणाऱ्याला धडा शिकवणे
4) खूप यश मिळविणे
उत्तर : प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे
11: घटनेमधील कोणता अनुच्छेद अनुक्रमे राष्ट्रपती व गव्हर्नरचा अध्यादेश तयार करण्याचा अधिकार नमूद करतो ?
1) अनुच्छेद 132 आणि 230
2) अनुच्छेद 196 आणि 264
3) अनुच्छेद 141 आणि 210
4) अनुच्छेद 123 आणि 213
उत्तर : अनुच्छेद 123 आणि 213
12: स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?
1) पंडिता रमाबाई
2) ताराबाई शिंदे
3) रमाबाई रानडे
4) स्वामी दयानंद सरस्वती
उत्तर : पंडिता रमाबाई
13: रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो ?
1) लाल रक्तपेशी
2) पांढऱ्या रक्तपेशी
3) बिंबाणू
4) जीवद्रव्य
उत्तर : लाल रक्तपेशी
14: महाराष्ट्रात महीला व विकासासाठी तळमळीने कार्य करणार्या सेवाभावी व्यक्ति व संस्था यांना ………. पुरस्कार दिला जातो .
1) इंदिरा गांधी
2) अहिल्यादेवी होळकर
3) सावित्रीबाई फुले
4) मदर तेरेसा
उत्तर : अहिल्यादेवी होळकर
15: नेमणुकीच्या वेळी किती कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक केली जाते ?
1) पाच वर्ष
2) तीन वर्ष
3) दोन वर्ष
4) एक वर्ष
उत्तर : पाच वर्ष
Talathi Question Paper Online Test 06 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 06
Best
Very important questions sir.
Thank you.
Ok
Great. thanks a lot
nice paper set
VR good paper 🗞️ set