
Vanrakshak Bharti 2025 Question Paper | वनरक्षक भरती 2025 | Vanrakshak Bharti Question Paper 01
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 साठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहत आहोत, यामध्ये आपण Vanrakshak Bharti 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, ज्या TCS पॅटर्ननुसार झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत.
प्रश्न 1: खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते ?
1) बँक ऑफ बडोदा आणि भारत सरकार
2) भारतीय स्टेट बँक आणि भारत सरकार
3) भारतीय रिझर्व बॅंक आणि भारत सरकार
4) बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार
उत्तर : 3) भारतीय रिझर्व बॅंक आणि भारत सरकार
स्पष्टीकरण : भारतीय रिझर्व बॅंक आणि भारत सरकार ही संस्था भारतात चलन जारी करू शकते.
भारतीय रिझर्व बॅंक म्हणजेच आरबीआय भारताची मध्यवर्ती बँक आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमानासाठी जबाबदार नियमक संस्था आहे.
ही भारताच्या सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीखाली येते.
प्रश्न 2: भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रीपरिषद ही सामूहिकरीत्या कोणाला उत्तरदायी असते ?
1) पंतप्रधान
2) भारताचे राष्ट्रपती
3) लोकसभा
4) राज्यसभा
उत्तर : 3) लोकसभा
स्पष्टीकरण : भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरीत्या लोकसभेला उत्तरदायी असते. अनुच्छेद 75 नुसार मंत्री हे लोकसभेला जबाबदार असतात.
मंत्रीपरिषद लोकसभेला थेट जबाबदार असते आणि जोपर्यंत तिला लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळतो तोपर्यंतच ती पदावर राहू शकते.
प्रश्न 3: घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळवलेली नाही ?
1) पहिले स्वातंत्र्य युद्ध – 1857
2) मुस्लिम लीगची स्थापना – 1910
3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना – 1885
4) असहकार चळवळीची सुरुवात – 1920
उत्तर : 2) मुस्लिम लीगची स्थापना – 1910
स्पष्टीकरण : अखिल भारतीय मुस्लिम लीग हा ब्रिटिश भारतातील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना 30 डिसेंबर 1906 रोजी झाली होती. नवाब सलीम उल्ला यांनी मुस्लिमांची स्वतंत्र राजकीय संघटना उभारण्यासंबंधीचा ठराव मांडला होता.
तर हकीम अजमलखान यांनी त्यास अनुमोदन दिले व अशाप्रकारे डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली.
प्रश्न 4: पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान [REN21 अक्षय्य ऊर्जा 2022 जागतिक स्थिती [REN21 Renewables 2022 Globql Status] अहवालानुसार कितवे आहे ?
1) चौथे
2) पहिले
3) दुसरे
4) तिसरे
उत्तर : 1) चौथे
स्पष्टीकरण : भारतात 1985 मध्ये गुजरात मधील मांडवी येथे व्यापारी तत्त्वावर पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आले होते, हे आशिया खंडातील पहिले पवन ऊर्जा केंद्र आहे.
प्रश्न 5: खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही ?
1) दक्षिणेकडील मैदाने
2) समुद्र तटीय मैदाने
3) उत्तरे कडील मैदाने
4) बेटे
उत्तर : 1) दक्षिणेकडील मैदाने
स्पष्टीकरण : दक्षिणेकडील मैदाने भारताच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक भाग येत नाही. भौगोलिक दृष्ट्या भारताचे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, समुद्र तटीय मैदानी, द्वीपकल्पीय पठार व भारतीय बेटे असे प्रादेशिक विभाग पडतात.
भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय भूपट्ट्याचा मोठा भाग आहे जो इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट्याचा एक तुकडा आहे.
प्रश्न 6: महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
1) त्याच्या आग्नेयेला तेलंगणा आहे.
2) त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे
3) त्याच्या वायव्येस गुजरात आहे
4) दक्षिणेस कर्नाटक राज्याने भेटलेले आहे
उत्तर : 2) त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे
स्पष्टीकरण : महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेय दिशेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, वायव्येस गुजरात, तर नैऋत्येला गोवा राज्य आहे.
प्रश्न 7: सुप्रसिद्ध ‘अमुल दूध’ उत्पादनाचे मुख्यालय गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) आनंद
2) सुरत
3) अहमदाबाद
4) मेहसाणा
उत्तर : 1) आनंद
प्रश्न 8: महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील …………. गटांच्या सहभागाची साक्ष देतो.
1) मराठा
2) ब्राह्मण
3) महिला
4) आदिवासी
उत्तर : 4) आदिवासी
स्पष्टीकरण : धुळे जिल्हा पूर्वी पश्चिम खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी/खानदेशी भाषेचे माहेर आहे.
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो.
प्रश्न 9: राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) (नॅशनल Institute Of Oceanography) याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) केरळ
2) तामिळनाडू
3) आंध्र प्रदेश
4) गोवा
उत्तर : 4) गोवा
स्पष्टीकरण : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) (नॅशनल Institute Of Oceanography) याचे मुख्यालय गोवा या ठिकाणी स्थित आहे.
प्रश्न 10: अंगामी ही ………….. राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे.
1) नागालँड
2) तामिळनाडू
3) हिमाचल प्रदेश
4) पंजाब
उत्तर : 1) नागालँड
स्पष्टीकरण : अंगामी ही नागालँड राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. ही नागा समाजाची एक शाखा आहे. अंगामी परंपरेने अंगामी भाषा त्यांची मातृभाषा म्हणून वापरतात. ते नागालँडच्या कोहिमा जिल्हा आणि दिमापुर जिल्ह्यात आणि शेजारच्या मणिपूर राज्यात राहतात.
प्रश्न 11: केंद्रीय माहिती आयोग (CIC) हे केंद्र सरकार द्वारे ……………. च्या अंतर्गत स्थापित करण्यात आला आहे.
1) माहितीचा अधिकार अधिनियम 2006
2) माहितीचा अधिकार अधिनियम 2005
3) माहितीचा अधिकार अधिनियम 2002
4) केंद्रीय माहिती आयोग कायदा 2008
उत्तर : 2) माहितीचा अधिकार अधिनियम 2005
प्रश्न 12: खालीलपैकी कोणते विधान रौलेट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही ?
1) महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही.
2) साल 1919 मध्ये ब्रिटिशांनी रौलेट कायदा मंजूर केला
4) रौलेट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला
4) रौलेट कायद्याने पोलिसांच्या अधिकाराचे मजबुतीकरण केले
उत्तर : 1) महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही.
स्पष्टीकरण : रौलेट कायद्याने (1919) राजकीय हालचालींवर दडपशाही केली व राजकीय कैद्यांना दोन वर्ष खटल्याशिवाय ताब्यात ठेवण्याची परवानगी दिली.
ब्रिटिश भारताच्या इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलने पारित केलेला हा कायदा होता.
मात्र याला भारतीय जनतेकडून प्रचंड नाराजी मिळाली.
प्रश्न 13: भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला ?
1) 1927 साली
2) 1972 साली
3) 1947 साली
4) 1988 साली
उत्तर : 2) 1972 साली
स्पष्टीकरण : भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 साली करण्यात आला आहे.
प्रश्न 14: भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते ?
1) महाराष्ट्र
2) केरळ
3) ओडिशा
4) पश्चिम बंगाल
उत्तर : 4) पश्चिम बंगाल
प्रश्न 15: महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी किती आहे ?
1) 7.73 टक्के
2) 6.51 टक्के
3) 5.50 टक्के
4) 1.70 टक्के
उत्तर : 1) 7.73 टक्के
स्पष्टीकरण : ज्या प्रदेशात 200 सेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात उष्णकटिबंधीय सदाहरित वने असतात.
महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलाने अंदाजे 7.73 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
उष्णकटिबंधीय आद्र पर्णपाती जंगल 29.89 टक्के व्यापते.
प्रश्न 16: महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समिती करत होती ?
1) सिंधुदुर्ग व रत्नागिरी
2) हिंगोली व भंडारा
3) लातूर व वर्धा
4) यवतमाळ व अकोला
उत्तर : 1) सिंधुदुर्ग व रत्नागिरी
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
प्रश्न 17: ज्या ढिगार्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते, ते ………….. म्हणून ओळखले जात होते.
1) मठ
2) स्तंभ
3) स्तूप
4) विहार
उत्तर : 3) स्तूप
स्पष्टीकरण : ज्या ढिगार्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते स्तूप म्हणून ओळखले जात होते.
स्तूप हे एक बौद्ध धर्मीय घुमटाकार समाधी स्थान पूजास्थान वास्तु प्रकार होते. स्तूप ही मुख्यत्वे करून बौद्ध धर्मीयांची वास्तू रचना होती.
स्तूप ही एक गोलाकार रचना आहे जी बुद्धांच्या अवशेषांवर उभी आहे.
प्रश्न 18: भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही ?
1) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे
2) कायद्यापुढे समानता
3) धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई
4) सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी
उत्तर : 1) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे
स्पष्टीकरण : भारतीय संविधानात अनुच्छेद (14-18) मध्ये समानतेचा अधिकार दिला आहे.
भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे.
कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान इत्यादी आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही.
भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे याचा समानतेच्या हक्कात समावेश करण्यात आला नाही.
प्रश्न 19: ‘शरावती जलविद्युत प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ?
1) कर्नाटक
2) हिमाचल प्रदेश
3) मध्य प्रदेश
4) महाराष्ट्र
उत्तर : 1) कर्नाटक
प्रश्न 20: महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) नाशिक
2) पुणे
3) नागपूर
4) मुंबई
उत्तर : 3) नागपूर
स्पष्टीकरण : महाराष्ट्र वन विभाग हा वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे.
महाराष्ट्र वनविभागाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे.
अमरावती, छ. संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ येथे 11 प्रादेशिक वनमंडळे आहेत.