Mumbai Police Bharti Questions | मुंबई पोलीस भरतीसाठी विचारलेले महत्त्वाचे 50 प्रश्न | Police Bharti 2024 Questions
Mumbai Police Bharti Questions : नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये मुंबई पोलीस भरती २०२४ (Mumbai Police Bharti Questions) साठी महत्त्वाचे असणारे ५० प्रश्नोत्तरे या पोस्टमध्ये पाहणार आहोत. हे सर्व आपल्याला मागील पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न होते, आणि यातील २८ प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नेहमीनेहमी विचारण्यात आलेले आहेत.यातील काही प्रश्न तर आपल्याला पोलीस भरती २०२४ मध्ये विचालेले आहेत.
1. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
1) दत्तात्रय पडसलगीकर
2) सुबोध जयस्वाल
3) रश्मी शुक्ला
4) रजनीश शेठ
उत्तर : 3) रश्मी शुक्ला
2. पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते ?
1) पोलीस उपनिरीक्षक
2) पोलीस निरीक्षक
3) पोलीस उपअधीक्षक
4) यापैकी नाही
उत्तर : 2) पोलीस निरीक्षक
3. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे ?
1) महात्मा ज्योतिराव फुले
2) विनोबा भावे
3) सावित्रीबाई फुले
4) वि दा सावरकर
उत्तर : 1) महात्मा ज्योतिराव फुले
4. वाघासाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
1) छत्तीसगड
2) उत्तर प्रदेश
3) उत्तराखंड
4) झारखंड
उत्तर : 3) उत्तराखंड
5. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
1) अप्पर वर्धा
2) जायकवाडी
3) कोयना
4) गोसीखुर्द
उत्तर : 4) गोसीखुर्द
6. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
1) नागपूर
2) अमरावती
3) नाशिक
4) पुणे
उत्तर : 1) नागपूर
7. वासिम नंदुरबार गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने ………… जिल्हे घोषित केले आहे.
1) आरक्षित
2) मागास
3) आकांक्षीत
4) यापैकी नाही
उत्तर : 2) मागास
8. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
1) छ. संभाजीनगर
2) नागपूर
3) पणजी
4) नवी मुंबई
उत्तर : 4) नवी मुंबई
9. पोलीस पाटील पदी नियुक्त होण्यासाठी किमान ……….. इयत्ता उत्तीर्ण असावे लागते.
1) आठवी
2) दहावी
3) बारावी
4) पदवीधर
उत्तर : 1) आठवी
10. खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही ?
1) लोथल
2) धोलावीरा
3) मेहेरगढ
4) मोहेंजोदडो
उत्तर : 3) मेहेरगढ
11. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी 1960 साली ..,…….. येथे स्थापन करण्यात आली.
1) सोलापूर
2) मालेगाव
3) इचलकरंजी
4) भिवंडी
उत्तर : 3) इचलकरंजी
12. कथ्थक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
1) केरळ
2) तामिळनाडू
3) कर्नाटक
4) उत्तर प्रदेश
उत्तर : 4) उत्तर प्रदेश
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
13. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे ?
1) मुंबई – अहमदाबाद – दिल्ली
2) धुळे – कोलकत्ता
3) पुणे – नाशिक
4) मुंबई – आग्रा
उत्तर : 4) मुंबई – आग्रा
14. कोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हणून ओळखले जाते ?
1) बेंगलोर
2) मुंबई
3) पुणे
4) जयपूर
उत्तर : 1) बेंगलोर
15. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?
1) लुकन मृदा
2) जांभी मृदा
3) रेगूर मृदा
4) गाळ मिश्रित मृदा
उत्तर : 2) जांभी मृदा
16. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
1) प्राणहिता
2) वैनगंगा
3) पर्लकोटा
4) अमरावती
उत्तर : 2) वैनगंगा
17. एक मिलियन म्हणजे किती ?
1) शंभर कोटी
2) एक कोटी
3) एक लाख
4) दहा लाख
उत्तर : 4) दहा लाख
18. गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे ?
1) तिबेटियन
2) आसामी
3) ओडिसी
4) नागा
उत्तर : 1) तिबेटियन
19. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
1) बाळशास्त्री जांभेकर
2) पंडिता रमाबाई
3) गो. ग. आगरकर
4) वि. रा. शिंदे
उत्तर : 1) बाळशास्त्री जांभेकर
20. देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) परभणी
2) नांदेड
3) छत्रपती संभाजीनगर
4) नाशिक
उत्तर : 4) नाशिक
21. 29 जून 2024 ला झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे ?
1) विराट कोहली
2) रोहित शर्मा
3) जसप्रीत बुमराह
4) हार्दिक पांड्या
उत्तर : 1) विराट कोहली
22. 12th Fail हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे ?
1) तुकाराम मुंढे
2) विश्वास नांगरे पाटील
3) रजनीश शेठ
4) मनोज कुमार शर्मा
उत्तर : 4) मनोज कुमार शर्मा
23. गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?
1) 1881 साली
2) 1891 साली
3) 1911 साली
4) 1935 साली
उत्तर : 3) 1911 साली
24. 1 जानेवारीला खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो ?
1) जागतिक धूम्रपान विरोधी दिन
2) केंद्रीय उत्पादक शुल्क दिन
3) प्रवासी भारतीय दिन
4) पत्रकार दिन
उत्तर : 1) जागतिक धूम्रपान विरोधी दिन
25. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो ?
1) पंढरपूर
2) भीमाशंकर
3) त्र्यंबकेश्वर
4) पैठण
उत्तर : 3) त्र्यंबकेश्वर
26. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे ?
1) 550
2) 588
3) 552
4) 530
उत्तर : 1) 550
27. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते ?
1) नाशिक
2) यवतमाळ
3) नागपूर
4) जळगाव
उत्तर : 3) नागपूर
28. केंद्र सरकारने नेमलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष कोण होते ?
1) अशोक कुमार माथुर
2) रंगराजन
3) विजय केळकर
4) रघुराम राजन
उत्तर : 1) अशोक कुमार माथुर
29. भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023 चे 108 वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले ?
1) कोलकत्ता
2) बेंगलोर
3) जालंधर
4) नागपूर
उत्तर : 4) नागपूर
30. भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1) 1935 साली
2) 1947 साली
3) 1960 साली
4) 1927 साली
उत्तर : 1) 1935 साली
31. गडचिरोली मध्ये आत्म समर्पित नक्षल साठी स्थापन करण्यात आलेल्या वसाहतीचे नाव काय आहे ?
1) उमंग
2) पुनर्जीवन
3) नवउर्जा
4) नवजीवन
उत्तर : 4) नवजीवन
32. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या ……… यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
1) गाडगे महाराज
2) तुकडोजी महाराज
3) साने गुरुजी
4) विनोबा भावे
उत्तर : 2) तुकडोजी महाराज
33. जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो ?
1) 12 मे
2) 19 ऑगस्ट
3) 4 फेब्रुवारी
4) 5 जून
उत्तर : 4) 5 जून
34. सिंधू खोरे संस्कृतीचा भाग असलेला कालीबंगा भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
1) पश्चिम बंगाल
2) राजस्थान
3) उत्तरप्रदेश
4) गुजरात
उत्तर : 2) राजस्थान
35. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांमध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे ?
1) अनुच्छेद 14
2) अनुच्छेद 16
3) अनुच्छेद 17
4) अनुच्छेद 18
उत्तर : 2) अनुच्छेद 16
36. खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
1) पुणे
2) हैदराबाद
3) बेंगलोर
4) श्रीहरीकोटा
उत्तर : 1) पुणे
37. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?
1) मुंबई
2) नाशिक
3) अमरावती
4) पुणे
उत्तर : 2) नाशिक
38. पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?
1) तेलबिया
2) अन्नधान्य
3) फळे
4) यापैकी नाही
उत्तर : 1) तेलबिया
39. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण निवडा.
1) पळसाला पाणी तीन
2) पदरी पडले पवित्र झाले
3) घरोघरी मातीच्या चुली
4) नव्याचे नऊ दिवस
उत्तर : 3) घरोघरी मातीच्या चुली
40. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
1) पंतप्रधान
2) केंद्रीय गृहमंत्री
3) केंद्रीय संरक्षण
4) केंद्रीय अर्थमंत्री
उत्तर : 1) पंतप्रधान
41. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात केली गेली होती ?
1) गोवा
2) महाराष्ट्र
3) गुजरात
4) केरळ
उत्तर : 3) गुजरात
42. क्रिस्टोलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे ?
1) धातूंचा अभ्यास
2) मज्जा संस्थेचा अभ्यास
3) उतींचा अभ्यास
4) स्फटिकांचा अभ्यास
उत्तर : 4) स्फटिकांचा अभ्यास
43. पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढली जाते ?
1) डारसीस सिद्धांत
2) स्टोक्स सिद्धांत
3) हेनरीज सिद्धांत
4) यापैकी नाही
उत्तर : 3) हेनरीज सिद्धांत
44. महान गायिका लता मंगेशकर यांचे निधन कोणत्या वर्षी झाले होते ?
1) 2020 साली
2) 2018 साली
3) 2022 साली
4) 2019 साली
उत्तर : 3) 2022 साली
45. सोनेरी माकड हे खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडते ?
1) नोकरेक राष्ट्रीय उद्यान
2) मानस वन्यजीव अभयारण्य
3) वायनाड अभयारण्य
4) पेरियार अभयारण्य
उत्तर : 2) मानस वन्यजीव अभयारण्य
46. जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
1) अरुणाचल प्रदेश
2) जम्मू काश्मीर
3) हिमाचल प्रदेश
4) सिक्कीम
उत्तर : 4) सिक्कीम
47. बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
1) आसाम
2) केरळ
3) बिहार
4) तामिळनाडू
उत्तर : 1) आसाम
48. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
1) नवी दिल्ली
2) बेंगलोर
3) श्रीहरीकोटा
4) कोची
उत्तर : 2) बेंगलोर
49. तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही ?
1) भुपलपल्ली
2) मंचेरियल
3) वारंगल
4) असिफाबाद
उत्तर : 3) वारंगल
50. आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 28 ऑक्टोबर
2) 16 सप्टेंबर
3) 17 जानेवारी
4) 12 डिसेंबर
उत्तर : 1) 28 ऑक्टोबर