District Court Questions Paper 03 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 03 | court exam question paper

District Court Questions Paper 03

District Court Questions Paper 03 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 03

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. हे प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरतील. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, न्यायालयाविषयी संबंधित असणारे महत्वाचे प्रश्न तसे चालू घडामोडी 2023-24 आणि मागील वर्षी विचारलेलेमहत्त्वाचे आणि दरवर्षी विचारलेले प्रश्न घेतले आहेत.

District Court Questions Paper 03

 

1. पुणे करार कोणामध्ये झाला होता ?
1) गांधी – आयर्विन
2) राष्ट्रसभा व ब्रिटिश प्रधानमंत्री
3) गांधी व बॅरिस्टर जिना
4) गांधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 4) गांधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
1) 1897 साली
2) 1899 साली
3) 1901 साली
4) 1857 साली
उत्तर : 1) 1897 साली

3. ‘रामचरितमानस’ या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली ?
1) सूरदास
2) तुलसीदास
3) कालिदास
4) चिरदास
उत्तर : 2) तुलसीदास

4. भारतातील लोकसंख्येची जनगणना ही किती वर्षात केली जाते ?
1) दर 10 वर्ष
2) दर 5 वर्ष
3) दर 20 वर्ष
4) दर 15 वर्ष
उत्तर : 1) दर 10 वर्ष

5. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत ?
1) उत्तरप्रदेश
2) पंजाब
3) गुजरात
4) मध्यप्रदेश
उत्तर : 4) मध्यप्रदेश

6. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 15 सप्टेंबर
2) 16 सप्टेंबर
3) 27 सप्टेंबर
4) 28 सप्टेंबर
उत्तर : 1) 15 सप्टेंबर

7. निर्भय प्रशासन हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
1) सलमान रश्दी
2) नंदिनी दास
3) किरण बेदी
4) अमिताभ कांत
उत्तर : 3) किरण बेदी

marathi naukri telegram

8. परभणी शक्ती ( पीव्हीके 1009 ) हे वाण कोणत्या पिकाचे आहे ?
1) कापूस
2) ज्वारी
3) बाजरी
4) गहू
उत्तर : 2) ज्वारी

9. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती ?
1) आयएनएस सिंधू
2) आयएनएस अरिहंत
3) आयएनएस विराट
4) आयएनएस विक्रांत
उत्तर : 2) आयएनएस अरिहंत

10. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
1) पंढरपूर
2) नाशिक
3) शिर्डी
4) वरूड काजी
उत्तर : 2) नाशिक

11. आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
1) स्वामी रामकृष्ण परमहंस
2) राजा राममोहन रॉय
3) स्वामी दयानंद सरस्वती
4) स्वामी विवेकानंद
उत्तर : 2) राजा राममोहन रॉय

12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?
1) एलेन ह्युम
2) लॉर्ड कर्जन
3) रॉबर्ट क्लाइव्ह
4) यापैकी नाही
उत्तर : 1) एलेन ह्युम

13. चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?
1) महात्मा फुले
2) महात्मा गांधी
3) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
4) लोकमान्य टिळक
उत्तर : 3) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

14. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ?
1) इंग्रजी
2) मराठी
3) हिंदी
4) उर्दू
उत्तर : 1) इंग्रजी

15. भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली ?
1) 21 जानेवारी 1999
2) 22 ऑगस्ट 1994
3) 26 जानेवारी 1950
4) 24 ऑगस्ट 1947
उत्तर : 2) 22 ऑगस्ट 1994

16. भारत- चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या ठिकाणी आहे ?
1) उत्तराखंड
2) अरुणाचल प्रदेश
3) सिक्कीम
4) लडाख
उत्तर : 4) लडाख

marathi naukri telegram

17. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले ?
1) डॉ. रावसाहेब कसबे
2) डॉ. उत्तम कांबळे
3) डॉ. अण्णासाहेब साळुंखे
4) डॉ. आनंद यादव
उत्तर : 3) डॉ. अण्णासाहेब साळुंखे

18. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे ?
1) जिम कार्बेट
2) मेळघाट
3) ताडोबा
4) काना
उत्तर : 1) जिम कार्बेट

19. विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने वितरित केलेली आहे ?
1) मायक्रोसॉफ्ट
2) ॲपल
3) ओरॅकल
4) इन्फोसिस
उत्तर : 1) मायक्रोसॉफ्ट

20. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत ?
1) रमेश बैस
2) भगतसिंग कोशारी
3) सी. विद्यासागर राव
4) एस.सी. जमीर
उत्तर : 1) रमेश बैस

21. मनरेगा योजना खालीलपैकी कोणत्या अधिकारांची हमी देते ?
1) कामाचा अधिकार
2) माहितीचा अधिकार
3) समानतेचा अधिकार
4) शोषणाविरुद्धचा अधिकार
उत्तर : 1) कामाचा अधिकार

22. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1) सुमित्रा महाजन
2) मीरा कुमार
3) निर्मला सीतारमन
4) सुषमा स्वराज
उत्तर : 2) मीरा कुमार

23. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ?
1) मार्क झुकेरबर्ग
2) बिल गेट्स
3) इलॉन मस्क
4) सुंदर पिचाई
उत्तर : 3) इलॉन मस्क

24. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे ?
1) नागपूर
2) चंद्रपूर
3) वर्धा
4) नांदेड
उत्तर : 3) वर्धा

25. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे ?
1) मुंबई
2) पुणे
3) रायगड
4) कोल्हापूर
उत्तर : 2) पुणे

marathi naukri telegram

26. महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते ?
1) दर 4 वर्षांनी
2) दर 3 वर्षांनी
3) दर 2 वर्षांनी
4) दर 5 वर्षांनी
उत्तर : 1) दर 4 वर्षांनी

27. संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनिअर पुरविणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे ?
1) नांदेड
2) लातूर
3) छ. संभाजीनगर
4) नागपूर
उत्तर : 2) लातूर

28. दिव्यांगासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे ?
1) सक्षम
2) दृष्टी
3) तेजस
4) यापैकी नाही
उत्तर : 1) सक्षम

29. आर.आर.आर (RRR) या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
1) मनीरत्नम
2) प्रियदर्शन
3) एस. एस. राजामौली
4) अनुराग कश्यप
उत्तर : 3) एस. एस. राजामौली

30. ‘बॉम्बे आफ्टर आयोध्या’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) जितेंद्र दीक्षित
2) शशी थरूर
3) वीरेन सिंह
4) विनोद राय
उत्तर : 1) जितेंद्र दीक्षित

 


 

4 thoughts on “District Court Questions Paper 03 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 03 | court exam question paper”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *