🟪भूतानमध्ये ‘प्रोजेक्ट दंतक’चा हिरक महोत्सवी वर्ष साजरा | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)

 

🟪भूतानमध्ये ‘प्रोजेक्ट दंतक’चा हिरक महोत्सवी वर्ष साजरा

भूतान देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे.

24 एप्रिल 2021 रोजी भूतानमधील भारतीय राजदूत श्रीमती रुचिरा कंबोज यांनी सिमतोखा येथील दंतक स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत करण्यासाठी भूतानमधील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारताना दंतक सैनिकांनी केलेल्या त्यागांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

🎆‘प्रोजेक्ट दंतक’ विषयी.

भूतानचे तिसरे राजा आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाचा परिणाम म्हणून 24 एप्रिल 1961 रोजी ‘प्रोजेक्ट दंतक’ची स्थापना केली गेली.

हा भारत आणि भूतान या देशांचा एक मैत्रीपूर्ण संयुक्त प्रकल्प आहे. ‘प्रोजेक्ट दंतक’ची अंमलबजावणी भारताची सीमा रस्ते संघटना (BRO) करीत आहे.

भारताच्या मदतीने भूतान देशात वाहनांसाठी रस्ते तयार करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या अंतर्गत काही उल्लेखनीय कार्यांमध्ये पारो विमानतळ, योन्फुला हवाई क्षेत्र, थिंफू-त्राशिगंग महामार्ग, दूरसंचार व जलविद्युत पायाभूत सुविधा, शेरूब्त्से महाविद्यालय, कांगलुंग आणि इंडिया हाऊस इस्टेटचे बांधकाम समाविष्ट आहे.

🎆भुतान देश

हा दक्षिण आशियातील एक सार्वभौम राजेशाही राष्ट्र आहे. पूर्व हिमालयातील हे एक भूवेष्टीत राज्य असून याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस भारताचा अरूणाचल प्रदेश, दक्षिणेस आसाम व प. बंगाल आणि पश्चिमेस सिक्कीम तसेच तिबेटमधील चुंबी खोरे आहे. भारत व चीन यांच्या सीमेवर हा देश आहे. ‘ड्रॅगन भूमी’, ‘दक्षिणेचे ‘नंदनवन’ (पॅरडाइझ ऑफ द साउथ) इ. नावांनीही हा देश ओळखला जातो.

थिंफू हे शहर देशाची उन्हाळी, तर पारो हे हिवाळी राजधानी आहे. भूतानी ङुलत्रुम हे राष्ट्रीय चलन आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)

🔰 ७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली

🔰 ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू

🔰 ८१वे : २००८ : सांगली : म.द. हातकणंगलेकर

🔰 ८२वे : २००९ : महाबळेश्वर : आनंद यादव

🔰 ८३वे : २०१० : पुणे : द.भि.कुलकर्णी

🔰 ८४वे : २०११ : ठाणे : उत्तम कांबळे

🔰 ८५वे : २०१२ : चंद्रपूर : व.आ. डहाके

🔰 ८६वे : २०१३ : चिपळूण : ना कोत्तापल्ले

🔰 ८७वे : २०१४ : सासवड : फ. मुं. शिंदे

🔰 ८८वे : २०१५ : घुमान (पंजाब) : स मोरे

🔰 ८९वे : २०१६ : पिंपरी-चिंचवड : श्री. सबनीस

🔰 ९०वे : २०१७ : डोंबिवली : अ. काळे

🔰 ९१वे : २०१८ : बडोदे : लक्ष्मीकांत देशमुख

🔰 ९२वे : २०१९ : यवतमाळ : अरुणा ढेरे

🔰 ९३वे : २०२० : उ.बाद : फादर फ्रा. दिब्रिटो

🔰 ९४वे : २०२१ : नाशिक : जयंत नारळीकर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *