Police Bharti Previous Questions Papers 13 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
1. खालीलपैकी कोणते समाजसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) गोपाळ हरी देशमुख
3) महात्मा ज्योतीराव फुले
4) डॉ.आत्माराम पांडुरंग
उत्तर : 2) गोपाळ हरी देशमुख
2. कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता ?
1) राजगड
2) रायगड
3) प्रतापगड
4) जुनागड
उत्तर : 1) राजगड
3. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली ?
1) चौरीचोरा
2) अहमदाबाद
3) चंपारण्य
4) खेडा
उत्तर : 3) चंपारण्य
4. ‘वाकबगार’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) तरबेज
2) व्याख्याता
3) वाकडा
4) वाकलेला
उत्तर : 1) तरबेज
5. ‘पतन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) अप्रतिष्ठा
2) अवनती
3) उन्नती
4) पडणे
उत्तर : 3) उन्नती
6. आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो ?
1) केशवसुत
2) शांता शेळके
3) कुसुमाग्रज
4) अनिल
उत्तर : 1) केशवसुत
7. कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे ?
1) राज्याचे राज्यपाल
2) विधान परिषदेचे सभापती
3) विधानसभेचे अध्यक्ष
4) राज्याचे मुख्यमंत्री
उत्तर : 1) राज्याचे राज्यपाल
8. 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली ?
1) पंडित मदन मोहन मालवीय
2) लोकमान्य टिळक
3) एनी बेझंट
4) जवाहरलाल नेहरू
उत्तर : 1) पंडित मदन मोहन मालवीय
9. ‘सून’ या शब्दाचे वचन बदला .
1) सुना
2) सासु
3) सुनी
4) सासरे
उत्तर : 1) सुना
10. भारतातील पहिले वैद्यकीय शहर ‘इंद्रायणी मेडिसिटी’ कोठे स्थापन होणार आहे ?
1) पुणे
2) नागपूर
3) नाशिक
4) मुंबई
उत्तर : 1) पुणे
11. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ?
1) महानदी
2) गोदावरी
3) तापी
4) कृष्णा
उत्तर : 1) महानदी
12. भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणते आहे ?
1) मुंबई उच्च न्यायालय
2) दिल्ली उच्च न्यायालय
3) केरळ उच्च न्यायालय
4) मध्यप्रदेश उच्च न्यायालय
उत्तर : 3) केरळ उच्च न्यायालय
13. 1840 मध्ये परमहंस सभा या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली ?
1) बाळशास्त्री जांभेकर
2) गोपाळ हरी देशमुख
3) महात्मा ज्योतिबा फुले
4) दादोबा पांडुरंग तर्खडकर
उत्तर : 4) दादोबा पांडुरंग तर्खडकर
14. ‘आदर’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
1) अव्हेर
2) अनादर
3) नाआदर
4) निंदा
उत्तर : 2) अनादर
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
15. सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे ?
1) हिंगोली
2) बीड
3) लातूर
4) रत्नागिरी
उत्तर : 4) रत्नागिरी
16. हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो ?
1) मणिपूर
2) नागालँड
3) त्रिपुरा
4) आसाम
उत्तर : 2) नागालँड
17. ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते ?
1) अरुणाचल प्रदेश
2) सिक्कीम
3) लदाख
4) मिझोरम
उत्तर : 1) अरुणाचल प्रदेश
18. ‘राऊ’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
1) बाबासाहेब पुरंदरे
2) एन.एस. इनामदार
3) पि.के.अत्रे
4) बहिणाबाई चौधरी
उत्तर : 2) एन.एस. इनामदार
19. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातुक आढळते ?
1) गोंदिया
2) गडचिरोली
3) चंद्रपूर
4) सिंधुदुर्ग
उत्तर : 2) गडचिरोली
20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आले होते ?
1) मुंबई
2) पुणे
3) नाशिक
4) नागपूर
उत्तर : 1) मुंबई
21. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत ?
1) सांगली
2) कोल्हापूर
3) सिंधुदुर्ग
4) पालघर
उत्तर : 3) सिंधुदुर्ग
22. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
1) संगीत
2) क्रीडा
3) साहित्य
4) विज्ञान आणि तंत्रज्ञान
उत्तर : 2) क्रीडा
23. ‘सैनिकांनी लढाई जिंकली असेल’ या वाक्याचा काळ ओळखा .
1) अपूर्ण वर्तमान काळ
2) साधा भूतकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ
4) साधा वर्तमानकाळ
स्पष्टीकरण : ‘जिंकली असेल’ या संयुक्त क्रियापदावरून असे दिसून येते की क्रिया पुढे कधीतरी पूर्ण झालेली आहे म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ आहे.
उत्तर : 3) पूर्ण भविष्यकाळ
24. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र लागून नाही ?
1) गोवा
2) आंध्रप्रदेश
3) गुजरात
4) तेलंगणा
उत्तर : 2) आंध्रप्रदेश
25. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
1) आर. जी.भांडारकर
2) आत्माराम पांडुरंग
3) व्ही.एन. मंडलिक
4) के.टी. तेलंग
उत्तर : 2) आत्माराम पांडुरंग