Police Bharti Previous Questions Papers 12 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
1. आवळा देऊन कोहळा काढणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय ?
1) इतरांच्या कष्टावर स्वतःचा फायदा करणे
2) लहान वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे
3) एका संकटातून दुसऱ्या संकटात पडणे
4) क्षमतेपेक्षा मोठे काम करणे
उत्तर : 2) लहान वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे
2. विचारलेल्या प्रश्नांचे त्वरेने योग्य उत्तर देणारा कोण असतो ?
1) स्थितप्रज्ञ
2) स्वावलंबी
3) हजरजबाबी
4) वक्ता
उत्तर : 3) हजरजबाबी
3. यूआरल ( URL) चे पूर्ण रूप काय आहे ?
1) युनिफॉर्म रिटेल लोकेशन
2) युनिव्हर्सल रिसोर्स लिस्ट
3) युनिफॉर्म रिसर्च लोकेटर
4) युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर
उत्तर : 4) युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर
4. न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ?
1) एक्सल
2) पीपीटी
3) डीटीपी
4) एलटीपी
उत्तर : 3) डीटीपी
5. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?
1) तारापूर
2) श्रीहरीकोटा
3) कल्पकम
4) कुडणकुलम
उत्तर : 1) तारापूर
6. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ?
1) इन्फ्रारेड
2) अल्ट्राव्हायोलेट
3) क्ष – किरण
4) विश्व किरण
उत्तर : 2) अल्ट्राव्हायोलेट
7. परावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) दुर्गुण
2) परकीय
3) स्वावलंबी
4) असंतोष
उत्तर : 3) स्वावलंबी
8. बालगंधर्व हे टोपण नाव कोणाचे आहे ?
1) राम गणेश गडकरी
2) नारायण राजहंस
3) प्रल्हाद केशव अत्रे
4) त्र्यंबक बापूजी ठोंबरे
उत्तर : 2) नारायण राजहंस
9. ‘मी वनवासी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
1) गंगुबाई हनगल
2) प्रज्ञा पवार
3) सिंधुताई सपकाळ
4) उत्तम कांबळे
उत्तर : 3) सिंधुताई सपकाळ
10. ‘निरूपण’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) विवेचन
2) लोकाचार
3) निर्णय
4) निकेतन
उत्तर : 1) विवेचन
11. ‘प्रतिदिन’ या शब्दाचा समास ओळखा ?
1) तत्पुरुष समास
2) बहुव्रीहि समास
3) द्वंद्व समास
4) अव्ययीभाव समास
स्पष्टीकरण : अव्ययीभाव समास :-जेव्हा समासातील पहिले पद बहुदा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामाजिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा ते अव्ययीभाव समास असतो.
उदा. प्रतिदिन- प्रत्येक दिवशी .
उत्तर : 4) अव्ययीभाव समास
12. 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व कोणी केले होते ?
1) लोकमान्य टिळक
2) न्या.गोविंद रानडे
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) महात्मा फुले
उत्तर : 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
13. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) भंडारा
2) बुलढाणा
3) जळगाव
4) नांदेड
उत्तर : 2) बुलढाणा
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते कोण होते ?
1) लोकमान्य टिळक
2) फिरोजशहा मेहता
3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
4) गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर : 1) लोकमान्य टिळक
15. पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे ?
1) कृष्णा
2) महानदी
3) गोदावरी
4) तापी
उत्तर : 4) तापी
16. राष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो ?
1) 2 ऑक्टोबर
2) 5 जानेवारी
3) 13 फेब्रुवारी
4) 20 मार्च
उत्तर : 3) 13 फेब्रुवारी
17. ‘मूकनायक’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते ?
1) नारायण गुरु
2) बाळशास्त्री जांभेकर
3) लोकमान्य टिळक
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
18. निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
1) भारोतोलन ( weightlifting)
2) हॉकी
3) कुस्ती
4) धनुर्विद्या
उत्तर : 2) हॉकी
19. देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन कोणी केले होते ?
1) पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
2) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
3) गोपाळ गणेश आगरकर
4) महात्मा ज्योतिराव फुले
उत्तर : 2) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
20. पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते ?
1) चिरोली
2) सातपुडा
3) गायखुरी
4) सह्याद्री
उत्तर : 4) सह्याद्री
21. नुकत्याच सुधारित ‘शक्ती फौजदारी कायद्यामध्ये’ कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आली ?
1) फाशीची शिक्षा
2) 10 वर्ष तुरुंगवास
3) 25 वर्षे तुरुंगवास
4) जन्मठेप
उत्तर : 1) फाशीची शिक्षा
22. डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे, मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो ?
1) नाशिक
2) अमरावती
3) नागपूर
4) पुणे
उत्तर : 3) नागपूर
23. ‘अंगात उत्सव संचारणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
1) अन्नत्याग करणे
2) उपकाराचे स्मरण करणे
3) खूप उत्साह वाटणे
4) भूतबाधा होणे
उत्तर : 3) खूप उत्साह वाटणे
24. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या ?
1) गोविंदाग्रज
2) अनिल
3) केशवसुत
4) बालकवी
उत्तर : 1) गोविंदाग्रज
25. ‘शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता’. या वाक्यातील काळ ओळखा ?
1) अपूर्ण भूतकाळ
2) पूर्ण भूतकाळ
3) साधा भूतकाळ
4) रितीवर्तमान काळ
स्पष्टीकरण : दिलेल्या वाक्यातील वाचत होता हे क्रियापद असे दर्शवते की वाचण्याची क्रिया भूतकाळात चालू होती किंवा अपूर्ण होती म्हणून हे अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे.
उत्तर : 1) अपूर्ण भूतकाळ
Kalusing kursa Padvi
हे प्रश्न खूप उपयोगी आहे मी वेळ भेटला तेव्हा वाचन करतो. धन्यवाद मराठी नोकरी 🙏