Police Bharti Previous Questions Papers 07 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
1. नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कोणता वायू मुक्त होतो ?
1) कार्बन डाय-ऑक्साइड
2) ओझोन
3) हायड्रोजन
4) हायड्रोजन सल्फाईड
उत्तर : 1) कार्बन डाय-ऑक्साइड
2. अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे आंतर – उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राकडे प्रवाहित केल्यावर कोण अडथळा आणतो ?
1) पूर्व घाट
2) पश्चिम घाट
3) अरवली पर्वतरांगा
4) ग्रेट हिमालयीन पर्वतरांगा
उत्तर : 2) पश्चिम घाट
3. खालीलपैकी कोणता रूपांतरित खडक आहे ?
1) शेल
2) ग्रॅनाईट
3) वाळूचा खडक
4) कॉर्टिझाइट
उत्तर : 4) कॉर्टिझाइट
4. बक्सर ची लढाई …………….. मध्ये लढली गेली.
1) 1757 साली
2) 1755 साली
3) 1760 साली
4) 1764 साली
उत्तर : 4) 1764 साली
5. खालीलपैकी कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ?
1) फायबर
2) लोह
3) कर्बोदके
4) पाणी
उत्तर : 2) लोह
6. मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
1) आंध्र प्रदेश
2) गुजरात
3) तामिळनाडू
4) तेलंगणा
उत्तर : 2) गुजरात
7. भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
1) मुंबई
2) पणजी
3) पटना
4) जयपुर
उत्तर : 3) पटना
8. महिला सुरक्षेसाठी ‘हमार बेटी हमारा मान’ ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
1) उत्तराखंड
2) मध्य प्रदेश
3) छत्तीसगड
4) महाराष्ट्र
उत्तर : 3) छत्तीसगड
9. देशातील पहिले तरंगते ग्रंथालय कोठे सुरू करण्यात आले आहे ?
1) तामिळनाडू
2) पश्चिम बंगाल
3) आंध्रप्रदेश
4) गुजरात
उत्तर : 2) पश्चिम बंगाल
10. विद्युत वाहन धोरण ( electric vehicles policy ) जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1) आंध्र प्रदेश
2) गुजरात
3) महाराष्ट्र
4) कर्नाटक
उत्तर : 4) कर्नाटक
11. बालिका पंचायत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1) तेलंगणा
2) गुजरात
3) तामिळनाडू
4) महाराष्ट्र
उत्तर : 2) गुजरात
12. कोणत्या देशामध्ये भारताच्या मदतीने लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे ?
1) नेपाळ
2) म्यानमार
3) भूतान
4) बांगलादेश
उत्तर : 1) नेपाळ
13. लेमरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?
1) कर्नाटक
2) तामिळनाडू
3) झारखंड
4) छत्तीसगड
उत्तर : 4) छत्तीसगड
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
14. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे ?
1) मुंबई
2) नागपूर
3) ठाणे
4) नाशिक
उत्तर : 2) नागपूर
15. मराठी भाषा भवन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
1) मुंबई
2) पुणे
3) नागपूर
4) नाशिक
उत्तर : 1) मुंबई
16. जागतिक कर्करोग दिन कोणत्या दिवशी पाळला जातो ?
1) 4 फेब्रुवारी
2) 4 जानेवारी
3) 4 मार्च
4) 2 फेब्रुवारी
उत्तर : 1) 4 फेब्रुवारी
17. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन हा मार्ग सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो ?
1) कर्तव्यपथ
2) संसद मार्ग
3) राजपथ
4) अब्दुल कलाम मार्ग
उत्तर : 1) कर्तव्यपथ
18. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शीला मंदिराचे उद्घाटन कोणी केले आहे ?
1) अमित शहा
2) नरेंद्र मोदी
3) देवेंद्र फडवणीस
4) शरद पवार
उत्तर : 2) नरेंद्र मोदी
19. आपल्या नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
1) गोवा
2) हिमाचल प्रदेश
3) सिक्कीम
4) राजस्थान
उत्तर : 1) गोवा
20. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला स्टॅच्यू ऑफ पीस कोणत्या राज्यात आहे ?
1) गुजरात
2) केरळ
3) राजस्थान
4) गोवा
उत्तर : 3) राजस्थान
21. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जगातील पहिले वृक्ष संमेलन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले ?
1) बीड
2) जळगाव
3) परभणी
4) नांदेड
उत्तर : 1) बीड
22. गुगलने गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केली ?
1) 2000 साली
2) 2005 साली
3) 2008 साली
4) 2010 साली
उत्तर : 2) 2005 साली
23. कोणत्या राज्य सरकारने CM app लाँच केले आहे ?
1) आसाम
2) महाराष्ट्र
3) केरळ
4) हिमाचल प्रदेश
उत्तर : 4) हिमाचल प्रदेश
24. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आली ?
1) 2 जानेवारी 1960
2) 2 जानेवारी 1961
3) 2 जानेवारी 1962
4) 2 जानेवारी 1963
उत्तर : 2) 2 जानेवारी 1961
25. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात ?
1) पोलीस महानिरीक्षक
2) पोलीस महासंचालक
3) पोलीस अधीक्षक
4) पोलीस समादेशक
उत्तर : 2) पोलीस महासंचालक