MAHA TET Model Question Paper 2024 :
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या MAHA TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी आपण 2013 ते 2021 या आठ वर्षात विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांचे स्पष्टीकरण घेऊन आलेलो आहोत. यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र, सामजिकशास्त्र, परिसर अभ्यास व सामान्य विज्ञान सोबतच गणित अशा सर्व विषयांचे प्रश्नसंच केलेले आहेत.
या पोस्टमध्ये आपण पेपर I व II साठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेतलेले आहेत.
1 अवकाशातील तार्याच्या समूहाला काय म्हणतात ?
1) आकाशगंगा
2) तेजोमध
3) तारकामंडल
4) दीर्घिका
उत्तर : 4) दीर्घिका
स्पष्टीकरण : आकाशगंगा : आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा असे म्हणतात. आपल्या सूर्यमालेप्रमाणे आकाशातल्या इतर काही तार्यांच्याभोवती त्यांच्या ग्रहमालिका आहेत.
दीर्घिका : असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात.
2 आदिलशहाने ‘सरलष्कर’ हा किताब कोणाला दिला होता ?
1) मलिक अंबर
2) फतेहखान
3) शरीफजी
4) शहाजीराजे
उत्तर : 4) शहाजीराजे
स्पष्टीकरण : आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर ही पदवी देऊन त्यांना बंगळूरची जहागिरी बहाल केली होती.
3 देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला येऊन मिळते ?
1) घागरा नदी
2) कोसी नदी
3) अलकनंदा
4) महानंदा
उत्तर : 3) अलकनंदा
स्पष्टीकरण : भागीरथी नदीचा उगम गंगोत्री येथे होतो. नंतर देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी प्रवाह एकत्र येतात. तेव्हा त्या जलौघाला गंगा असे म्हणतात. ती उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार , पश्चिम बंगाल मधून वाहते.
यमुना, रामगंगा, घागरा नदी, गंडक, कोसी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत.
4 भारतात परतीचा मान्सून काळ कोणता आहे ?
1) जून ते सप्टेंबर
2) ऑक्टोबर ते नोव्हेंबर
3) नोव्हेंबर ते जानेवारी
4) फेब्रुवारी ते जून
उत्तर : 2) ऑक्टोबर ते नोव्हेंबर
5 सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, कारण – ……….
1) धर्मगुरूंचे कर्मकांड स्तोत्र
2) राजसत्ता प्रबळ बनली
3) वैचारिक क्रांतीची प्रेरणा नाही
4) सामंतांचा पगडा
उत्तर : 1) धर्मगुरूंचे कर्मकांड स्तोत्र
6 ‘यमुना पर्यटन’ मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
1) हरिभाऊ आपटे
2) वामन मल्हार जोशी
3) वि स खांडेकर
4) बाबा पद्मनजी
उत्तर : 4) बाबा पद्मनजी
7 गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा कोणी बांधला होता ?
1) औरंगजेब
2) अकबर
3) शहाजहान
4) कुतुबुद्दीन ऐबक
उत्तर : 2) अकबर
स्पष्टीकरण : उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिद्ध आग्रा शहरापासून 43 किमी अंतरावर फत्तेपूर सिक्री येथे विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे. बुलंद दरवाजाची निर्मिती इ स. 1602 मध्ये मुघल बादशहा अकबरने केली. हा दरवाजा गुजरात विजयाचे प्रतीक म्हणून बांधण्यात आला होता. या दरवाज्याची उंची 280 फूट असून विश्वातील सर्वात मोठा दरवाजा म्हणून याची नोंद करण्यात आलेली आहे.
8 खालीलपैकी हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसलेले आहे ?
1) व्हेनिस
2) नेपल्स
3) मिलान
4) तुरीन
उत्तर : 3) मिलान
स्पष्टीकरण : मिलान : ओलान नदीकाठी वसलेले आहे. युरोप खंडातील देशांना भूमार्गाने जोडणारे केंद्र आहे. या शहरात प्रसिद्ध ग्रंथालय व लिओनार्डो द विन्सी संग्रहालय आहे.
व्हेनिस : या शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कालव्यातून केली जाते. म्हणून या शहराला कालव्यांचे शहर असे म्हणतात.
9 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली होती ?
1) सरदार वल्लभभाई पटेल
2) पंडित जवाहरलाल नेहरू
3) डॉ . राजेंद्र प्रसाद
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 2) पंडित जवाहरलाल नेहरू
स्पष्टीकरण : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्वे मांडली.
पंचशील तत्वे ही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहेत.
तत्वे : एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्वचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे.
अन्य देशांवर आक्रमण न करणे.
अन्य देशांच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ न करणे.
समानता आणि परस्परांचा लाभ होईल असे धोरण अवलंबणे.
शांततामय सहजीवन
10 छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञ वरून रामचंद्रपंत अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
1) विनंती पत्र
2) आज्ञापत्र
3) वरील दोन्ही
4) यापैकी एकही नाही
उत्तर : 2) आज्ञापत्र
11 पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर करण्यात येतो ?
1) रिमोट सेन्सिंग
2) सोनार तंत्रज्ञान
3) रिश्टर स्केल
4) GPS (जी. पी. एस)
उत्तर : 4) GPS (जी. पी. एस)
12 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ? ?
1) पुणे
2सातारा
3) अहमदनगर
4) छ. संभाजीनगर
उत्तर : 3) अहमदनगर
स्पष्टीकरण : क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे पहिले व मध्य प्रदेश दुसरे तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.
क्षेत्रफळात महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर व सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे.
13 मिरत कट खटल्यात खालीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती ?
1) राजेंद्र लाहिरी
2) नीलकंठ जोगळेकर
3) श्रीपाद डांगे
4) मुजफ्फर अहमद
उत्तर : 1) राजेंद्र लाहिरी
स्पष्टीकरण : राजेंद्र लाहिरी हे नाव काकोरी कट याच्याशी संबंधित आहे. काकोरी कट हा 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकावरील खजिना लुटण्याचा संबंधित आहे.
14 महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली ?
1) 1 मे 1960
2) 1 मे 1961
3) 15 ऑगस्ट 1947
4) 26 जानेवारी 1950
उत्तर : 1) 1 मे 1960
स्पष्टीकरण : महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.
1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. यापूर्वी महाराष्ट्राची ओळख द्विभाषिक मुंबई अशी होते. द्विभाषिक राज्याची स्थापना नोव्हेंबर 1956 साली झाली होती. द्विभाषिक राज्यात महाराष्ट्रातील 26 जिल्हे व कर्नाटक राज्यातील बेळगाव, धारवाड, विजापूर, उत्तर कन्नड या चार जिल्ह्यांचा समावेश होता.
15 खालीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते ?
1) आत्माराम तर्खडकर
2) रा.गो. भांडारकर
3) गोपाळ गणेश आगरकर
4) न्यायमूर्ती रानडे
उत्तर : 3) गोपाळ गणेश आगरकर
स्पष्टीकरण : दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली.
16 पंजाब राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे ?
1) पोपट
2) बाझ (गरुड)
3) कबूतर
4) कावळा
उत्तर : 2) बाझ (गरुड)
स्पष्टीकरण : पंजाबचा राज्यपक्षी बाझ (गरुड)
पंजाब राज्याचा प्राणी काळवीट हा आहे.
महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी हरियाल (कबूतर)
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू आहे.
मुंबई पोलीस सराव प्रश्नसंच 2024
17 राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची ………… वर्षे पूर्ण केलेली असावीत.
1) 21 वर्षे
2) 25 वर्षे
3) 30 वर्षे
4) 35 वर्षे
उत्तर : 4) 35 वर्षे
स्पष्टीकरण : कलम 52 नुसार घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती केली आहे.
कलम 53 नुसार राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना प्राप्त झाली आहे.
पात्रता – भारतीय नागरिकत्व व वय 35 वर्षे पूर्ण.
कार्यकाल – पाच वर्ष
18 छ. शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आहे ?
1) कुरटे
2) खांदेरी
3) उंदेरी
4) यापैकी नाही
उत्तर : 1) कुरटे
19 पाम्पई हे ………….. संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून ओळखले जाते.
1) ग्रीक
2) सिंधू
3) सुमेरियन
4) रोमन
उत्तर : 4) रोमन
स्पष्टीकरण : ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने दिलेले जगातील एखादे स्थान जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. यासाठी त्या स्थानाला देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान देखील दिले जाते.
पाम्पई हे रोमन संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून ओळखले जाते.
20 वसईचा तह कोणा-कोणात झाला होता ?
1) टिपू सुलतान – इंग्रज
2) दुसरा बाजीराव – इंग्रज
3) रघुनाथ पेशवे – इंग्रज
4) पेशवे – पोर्तुगीज
उत्तर : 2) दुसरा बाजीराव – इंग्रज
स्पष्टीकरण : 1872 साली सालबाईचा तह होऊन पहिली इंग्रज व मराठा युद्ध संपले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला, हा करार वसईचा तह म्हणून ओळखला जातो.
MAHA TET Model Question Paper 2024 | शिक्षक पात्रता परीक्षा 2024 | MAHA TET Previous Question Paper 01