Bhandara District Info in Marathi | भंडारा जिल्हा विशेष माहिती
Bhandara District Info in Marathi | भंडारा जिल्हा विशेष माहिती
भंडारा जिल्हा संक्षिप्त माहिती :
जिल्हा मुख्यालय : भंडारा
जिल्ह्याचे क्षेत्रफळ : 4087 चौ.किमी
जिल्ह्याचे स्थान : उत्तर-पूर्व महाराष्ट्र
एकूण लोकसंख्या : 12,00,334
पुरुष लोकसंख्या : 6,05,520
महिला लोकसंख्या : 5,94,814
प्रशासकीय विभाग : अमरावती
प्राकृतिक विभाग : विदर्भ
लोकसंख्या घनता : 294
लिंग गुणोत्तर : 982
एकूण साक्षरता : 83.76%
पुरुष साक्षरता : 90.35%
महिला साक्षरता : 77.08%
ग्रामीण लोकसंख्या : 80.52%
शहरी लोकसंख्या : 19.48%
एकूण तालुके : 07
पंचायत समित्या : 07
महानगरपालिका : 00
विधानसभा मतदारसंघ : 03
भंडारा जिल्हा स्थान व विस्तार :
🟢 भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला स्थित आहे.
🟢 भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4087 चौरस किलोमीटर आहे.
🟢 जिल्ह्याने भारताच्या सुमारे 1.33% क्षेत्र व्यापले आहे जिल्ह्याचे मुख्यालय भंडारा शहर आहे .
🟢 जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग – नागपूर
🟢 जिल्ह्याच्या सीमा –
📌 जिल्ह्याला एक राज्य आणि तीन जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहेत.
📌 जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे.
📌 जिल्ह्याच्या दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा येतो .
📌 जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया जिल्हा आहे.
📌 जिल्ह्याच्या पश्चिमेस नागपूर आहे.
भंडारा जिल्ह्यातील तालुके :
🟢 भंडारा या जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत.
🟢 तुमसर, भंडारा, साकोली, मोहाडी, लाखनी लाखांदूर, पावनी
🟢 26 जून 1999 रोजी लाखनी तालुक्याची निर्मिती केली.
🟢 जिल्ह्यातील तुमसर या तालुक्याची सीमा मध्य प्रदेशातील बालाघाट या जिल्ह्याच्या सीमेसी संलग्न आहे.
भंडारा जिल्हा प्राकृतिक :
🟢 जिल्ह्याच्या उत्तर भागात अंबागड डोंगररांग व चांदपूर टेकड्या आहेत, अंबागड डोंगररांगी सातपुडा पर्वत रांगेचा भाग आहे.
🟢 जिल्ह्याचा बहुतांश भाग हा सखल व मैदानी प्रदेशाचा आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागात गायमुख टेकड्या आहेत, जिल्ह्याच्या मध्यभागात भीमसेन टेकड्या आहेत.
🟢 जिल्ह्याच्या मध्य भागामध्ये असलेली डोंगररांग प्रदेश गायखुरीचे डोंगर म्हणून ओळखले जाते, जिल्ह्याचा उत्तर भाग प्रामुख्याने डोंगराळ आहे.
🟢 जिल्ह्यातील भंडारा,लाखनी लाखांदूर,पवनी,मोहाडी इत्यादी तालुके मैदानी प्रदेशात येतात, जिल्ह्यात जमीन टेकड्या,कोका टेकड्या,लेंडेझरी टेकड्या आहेत. जिल्ह्याचा उत्तर भाग हा 52 थडी नदी खोरे प्रदेशात येतो,अंबागड डोंगर रांगेने बावनथडी नदी खोरे प्रदेश हा उर्वरित जिल्ह्यांपासून वेगळा केला आहे.
हवामान :
🟢 भंडारा जिल्ह्याचे स्थान खंडांतर्गत असल्यामुळे हवामान विषम उष्ण व कोरड्या स्वरूपाचे आहे, जिल्ह्याला प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो तसेच,परतीच्या मोसमी वाऱ्यापासूनही पाऊस पडतो.
🟢 उन्हाळा ऋतू हा तीव्र स्वरूपाचा असतो, जिल्ह्यातील मैदानी भागाच्या तुलनेत उत्तरेकडील डोंगराळ भागात तापमान वर्षभर कमी असते. जिल्ह्यात हिवाळा ऋतू हा अत्यंत तीव्र थंडीचा असतो.
🟢 केंद्र शासनाने ठरविलेल्या आवर्षण प्रवण क्षेत्रात जिल्ह्यातील कोणताही तालुका येत नाही, जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्य 147 सेमी इतके आहे.
🟢 जिल्ह्याच्या उत्तरे कडील असलेल्या डोंगराळ भागाची समुद्रसपाटीपासून ची उंची जास्त असल्यामुळे येथे पावसाचे प्रमाण जास्त आहे, तसेच वातावरण थंड देखील असते.
मृदा :
🟢 जिल्ह्यामध्ये गाळाची काळी व सुपीक अशी कन्हार मृदा वाळू व चुना मिश्रित मोरंद मृदा आढळते . चुनखडीचे प्रमाण जास्त असलेली हलक्या प्रतीची खरडी मृदा, स्फटिक खडकांपासून बनलेली तांबूस, पिवळसर रंगाची सिहार मृदा व बरडी मृदा असे वेगवेगळे मृदा प्रकार पाहायला मिळतात.
🟢 कन्हार मृदेचा जास्त काळ ओलावा टिकून धरण्याच्या क्षमतेमुळे या मातीत वर्षातून दोन पिके घेतली जातात, जिल्ह्यातील उत्तरेकडील डोंगराळ भागात कमी खोलीची व हलक्या प्रतीची मृदा आढळते.
🟢 वैनगंगा खोऱ्यात कन्हार व उच्च प्रतीची मोरांड मृदा आढळते , मोरांड मृदेमध्ये गहू, ज्वारी, जवस पिके घेतली जातात.
नद्या :
🟢 ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे, वैनगंगा ही बारमाही वाहणारी नदी आहे.
🟢 52 तरीही वैनगंगेची उपनदी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते, बावनथडी नदीचा उगम हा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा डोंगरामध्ये होतो
🟢 बावनथडी नदी भंडारा जिल्ह्यात जवळपास 50 किमी अंतर वाहते आणि शेवटी वैनगंगा नदीला मिळते. वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत होतो, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून नदी भंडारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करते.
🟢 गाढवी,चुलबंद,बाघ या वैनगंगा नदीला डाव्या तीराला मिळणाऱ्या उपनद्या आहेत. बावनथडी, कन्हान, सूर या उजव्या तीरावर मिळणाऱ्या उपनद्या आहेत.
🟢 वैनगंगा नदी जिल्ह्यातून ईशान्य नैऋत्य व नैऋत्य आग्नेय दिशेस प्रवास करते वैनगंगा व चूलबंध नदी संगम सोनी संगम नावाने ओळखला जातो.
वने :
🟢 जिल्ह्याचा सुमारे 25 टक्के भाग हा वनाच्छादित आहे. जिल्ह्यामध्ये उष्णकटिबंधीय पानझडी प्रकारचे वने आढळतात मिश्र वने आणि सागाची वने असे दोन वनांचे प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात.
🟢 वनांमध्ये साग, तेंदू, शिसव,खैर,महुवा ऐन,बांबू,पळस,अंजन इत्यादी वृक्ष आढळतात.
🟢 अस्वल,सांबर,चितळ,माकड इत्यादी प्राणी देखील वनामध्ये आढळतात.
🟢 जिल्ह्यातील उत्तरेकडील डोंगराळ भागात वनांचे प्रमाण जास्त आहे.
धरणे :
🟢 भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो,येथील प्रामुख्याने जलसिंचनासाठी तलावांचा उपयोग केला जातो.
🟢 तुमसर तालुक्यात चांदपूर हा महत्त्वाचा तलाव आहे, जिल्ह्यातील गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर इंदिरा सागर प्रकल्प आहे.
🟢 धर्मापुर येथे चुलबंद नदीवर चुलबंद धरण आहे, तुमसर जिल्ह्यातील
बावनथडी नदीवर बावनथडी धरण आहे, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पातील पाण्याचा वापर भंडारा जिल्ह्यात सिंचनासाठी होतो.
भंडारा जिल्हा औद्योगिक :
🟢 आपल्या जिल्ह्यात तांदुळाचे विक्रमी उत्पादन होते म्हणून तांदूळ गिरण्या जिल्ह्यात सर्व ठिकाणी आढळतात, तुमसर रोड येथे साखर कारखाना देखील आहे.
🟢 जवाहर नगर येथे युद्ध सामग्री निर्माण कारखाना आहे एकोडी व गणेशपुर हे रेशीम कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. भंडारा, तुमसर,मोहाडी इत्यादी ठिकाणी विडी उद्योग चालतो.
🟢 मोहाडी तालुक्यात देवाडा येथे साखर कारखाना आहे, माडगी येथे मॅगनीज शुद्धीकरण कारखाना आहे.
भंडारा जिल्ह्यातील दळणवळण :
🟢 जिल्ह्यातील वाहतूक मुख्यतः रस्ते व लोहमार्गाने होते जिल्ह्यातून हाजीरा-धुळे-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 जातो.हा महामार्ग भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांमध्ये जातो .
🟢 मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग जिल्ह्यातून तुमसर रोड भंडारा रोड येथून जातो . साकोली-चंद्रपूर लोहमार्ग जिल्ह्यातून गोंडउमरी येथून जातो.
Bhandara District Info in Marathi | भंडारा जिल्हा विशेष माहिती : या घटकावर नेहमीच आपल्याला पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणून आपण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांवर विशेष माहिती पोस्ट घेऊन येत आहोत. सर्व जिल्ह्यांची विशेष माहिती आपल्याला खालील लिंकवरून मिळेल.
खुप छान आहे. परीक्षाभिमुख माहिती.
Kindly Provide Raigad District information.