Arogya Sevak Group D Question Paper 01| ZP Bharti 2023 Questions | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका, अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी (ZP), गृहवस्त्रपाल, दंत यांत्रिकी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, दंत आरोग्यक, नियमित क्षेत्र कर्मचारी, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, समुपदेष्टा, शिपाई व आरोग्यविषयक इतर ग्रुप C व ग्रुप D च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच
आरोग्य सेवक IBPS पॅटर्ननुसार प्रश्नसंच : आरोग्य सेवक भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

01. व्यक्ती आणि वल्ली (Vyakti Ani Valli) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
a) रणजित देसाई
b) पु. ल. देशपांडे
c) वि. वा. शिरवाडकर
d) साने गुरुजी
उत्तर : b) पु. ल. देशपांडे
02. ‘निक्षय पोषण योजना’ ही भारत सरकारने कोणत्या रोगांना पोषण सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे ?
a) एड्स
b) स्कर्वी
c) क्षयरोग
d) गोवर
उत्तर : c) क्षयरोग
03. ‘कॉल्पिक स्पॉट’ हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते ?
a) क्षयरोग
b) डांग्या खोकला
c) कावीळ
d) गोवर
उत्तर : d) गोवर
04. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो ?
a) 11 जुलै
b) 11 एप्रिल
c) 11 मे
d) 11 जून
उत्तर : a) 11 जुलै
05. मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवाची संबंधित विषयाला हेपॅटोलॉजी म्हणतात ?
a) हाडे
b) किडनी
c) यकृत
d) मेंदू
उत्तर : c) यकृत
06. क्षार संजीवनी ( ओरल रिहाड्रेशन सोल्युशन ) मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो ?
a) सोडियम
b) कॅल्शियम
c) ग्लुकोज
d) पोटॅशियम
उत्तर : b) कॅल्शियम
07. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते ?
a) प्रायमाक्वीन
b) सल्फोनामाईड
c) पॅरासिटॅमॉल
d) सिफॅलेक्सिन
उत्तर : a) प्रायमाक्वीन
08. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ?
a) पुणे
b) मुंबई
c) नाशिक
d) नागपूर
उत्तर : c) नाशिक
09. रेडिओ थेरपी व केमो थेरेपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगावर उपचार पद्धती आहेत ?
a) एड्स
b) कर्करोग
c) मलेरिया
d) न्युमोनिया
उत्तर : b) कर्करोग
10. पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी खालीलपैकी कोणता जलविद्युत केंद्राचा सर्वात मोठा सहभाग आहे ?
a) राधानगरी
b) कोयना
c) भाटघर
d) जायकवाडी
उत्तर : b) कोयना
11. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेप्रमाणे एका वर्षात कमीत कमी किती दिवसांचा रोजगार पुरविण्यात येतो ?
a) 120 दिवस
b) 150 दिवस
c) 100 दिवस
d) 180 दिवस
उत्तर : c) 100 दिवस
12. घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या LPG सिलेंडर मध्ये मुख्य वायू कोणकोणते असतात ?
a) इथेन, हेक्सेन
b) हेक्सेन, नोनेन
c) मिथेन, इथेन
d) ब्युटेन, प्रोपेन
उत्तर : d) ब्युटेन, प्रोपेन
13. दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढवून दवाखान्यात प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना सुरू केली आहे ?
a) जननी सुरक्षा योजना
b) बालिका समृद्धी योजना
c) सुरक्षित जन्म योजना
d) अस्पताल जन्म योजना
उत्तर : a) जननी सुरक्षा योजना
14. जैव वैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापन व विघटन योग्य पद्धतीने केले नाही तर खालील रोगाचा प्रसार होऊ शकतो ?
a) एड्स
b) क्षयरोग
c) कावीळ
d) वरील सर्व
उत्तर : d) वरील सर्व
📌 पोलीस भरती सोल्युशन 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
प्रश्नसंच 03
प्रश्नसंच 04
📌 पोलीस भरती सराव सामान्य ज्ञान प्रश्नसंच 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
15. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने ……………. निर्मितीसाठी केला जातो ?
a) आण्विक विद्युत
b) औष्णिक ऊर्जा
c) जलविद्युत
d) अपरंपरागत ऊर्जा
उत्तर : b) औष्णिक ऊर्जा
16. ‘आकाश पाताळ एक करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल ?
a) आकाशातून पातळात प्रवेश करणे
b) आनंदाने टाळ्या वाजविणे
c) संतापाने थैमान घालणे
d) आकाशात विमानाने प्रवास करणे
उत्तर : c) संतापाने थैमान घालणे
17. सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ?
a) कैपलर
b) आयझॅक न्यूटन
c) गॅलिलिओ
d) कोपर्निकस
उत्तर : b) आयझॅक न्यूटन
18. कोणाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस (जागतिक विज्ञान दिन) National Science Day म्हणून पाळला जातो ?
a) डॉ. चंद्रशेखर बोस
b) जगदीशचंद्र बोस
c) डॉ. रामचंद्र वैंकट रमण
d) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
उत्तर : d) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
19. शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो ?
a) थॅलॉमस
b) हायपरथॅलॉमस
c) हायपोथॅलॉमस
d) यापैकी नाही
उत्तर : c) हायपोथॅलॉमस
20. आक्रियन / आर्कियन व गोंडवन प्रस्तर समूहातील मातीचे महत्त्वाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
a) नागपूर
b) अमरावती
c) कोल्हापूर
d) धुळे
उत्तर : a) नागपूर
21. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (National Institute of Oceanography) याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
a) दोना पावला, गोवा
b) नवी मुंबई, महाराष्ट्र
c) हैद्राबाद, तेलंगणा
d) कोलकत्ता, प.बंगाल
उत्तर : a) दोना पावला, गोवा
22. विद्रोही साहित्य संमेलन 2023 याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
a) अमीर सातपुते
b) नरेंद्र जाधव
c) ज्ञानेश्वर मुळे
d) चंद्रकांत वानखेडे
उत्तर : d) चंद्रकांत वानखेडे
23. खालीलपैकी कोणता धबधबा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे ?
a) कुंचिकल धबधबा
b) बरेहिपणी धबधबा
c) नोहकालिकाई धबधबा
d) नोहसिंथियांग धबधबा
उत्तर : c) नोहकालिकाई धबधबा
24. हिमाचल प्रदेशातील बायस नदीवर वसलेले महाराणा प्रताप सागर जलाशय …………….. या नावानेही ओळखले जाते .
a) भाक्रा नांनगल
b) पोंग धरण
c) मलाना
d) यापैकी नाही
उत्तर : b) पोंग धरण
25. जर्मन गव्हर्मेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात राबवला जात आहे ?
a) नागपूर – अमरावती – अकोला
b) धुळे – जळगाव – नंदुरबार
c) सांगली – सातारा – कोल्हापूर
d) पुणे – अहमदनगर – छ.संभाजीनगर
उत्तर : d) पुणे – अहमदनगर – छ.संभाजीनगर

