Gadchiroli District Info in Marathi | गडचिरोली जिल्हा विशेष माहिती

Gadchiroli District Info in Marathi

Gadchiroli District Info in Marathi | गडचिरोली जिल्हा विशेष माहिती

महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील हा जिल्हा आदिवासी व जंगलव्याप्त म्हणून प्रसिद्ध आहे . पूर्वीच्या काळी या भागावर नागवंशीय राजांची सत्ता होती. जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून झाली. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या घनता (74) याच जिल्ह्यात आहे . वनांचे अधिक  प्रमाण व औद्योगिक दृष्ट्या मागासलेपण यामुळे जिल्ह्यात केवळ 11 टक्के लोक शहरी भागात राहतात. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. जिल्ह्यातील चिरोल टेकड्यांवरून जिल्ह्यास गडचिरोली हे नाव प्राप्त झाले. बाबा आमटे यांनी हेमलकसा येथे सुरू केलेला अपंग व कुष्टरोग्यांसाठीचा आश्रम आपल्या जिल्ह्यात आहे. येथे ‘लोक बिरादरी’ हा आदिवासी विकास प्रकल्प बाबा आमटेंच्या प्रेरणेने रावबिला जातो.

Gadchiroli District Info in Marathi | गडचिरोली जिल्हा विशेष माहिती

Gadchiroli District Info in Marathi | गडचिरोली जिल्हा विशेष माहिती

 

गडचिरोली जिल्हा संक्षिप्त माहिती :
सर्व आकडेवारी 2011 च्या जनगणेनुसार
जिल्हा मुख्यालय : गडचिरोली शहर
जिल्हा क्षेत्रफळ : 14,412 चौ.किमी
जिल्ह्याचे स्थान : राज्याच्या अतिपूर्वेस
एकूण लोकसंख्या : 10,72,942
पुरुष लोकसंख्या : 5,41,328
महिला लोकसंख्या : 5,31,614
अनू.जाती लोकसंख्या : 1,20,745
अनू. जमाती लोकसंख्या : 4,15,306
प्रशासकीय विभाग : नागपुर
प्राकृतिक विभाग : विदर्भ
लोकसंख्या घनता : 74
लिंग गुणोत्तर : 982
एकूण साक्षरता : 74.36 टक्के
पुरुष साक्षरता : 82.31 टक्के
महिला साक्षरता : 66.27 टक्के
ग्रामीण लोकसंख्या : 89.00 टक्के
शहरी लोकसंख्या : 11.00 टक्के
एकूण तालुके : 12 तालुके
ग्रामपंचायती : 467
पंचायत समित्या : 12
नगरपालिका : 02 (गडचिरोली व देसाईगंज)
नगर पंचायती : 10
विधानसभा मतदारसंघ : 03

गडचिरोली जिल्हा स्थान व विस्तार :
✅ गडचिरोली जिल्ह्याचे स्थान महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील आहे.
✅ गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ – 14,412 चौ.किमी.
✅ जिल्ह्याने महाराष्ट्राच्या सुमारे 4.68%क्षेत्र व्यापले आहे.
✅ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गडचिरोली शहर आहे.
✅ जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग – नागपुर

जिल्ह्याच्या सीमा :
✅ जिल्ह्याला दोन राज्य व तीन जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहे.
✅ जिल्ह्याच्या पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे.
✅ जिल्ह्याच्या पश्चिमेस चंद्रपुर जिल्हा आहे.
✅ जिल्ह्याच्या वायव्येस भंडारा व गोंदिया जिल्हे आहेत.
✅ जिल्ह्याच्या नैऋत्येला तेलंगणा राज्य आहे.
✅ जिल्ह्याच्या दक्षिणेस तेलंगणा राज्य आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील राज्ये तालुके :
जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत.
गडचिरोली, एटापल्ली, धानोरा, चारमोशी, अहिरी, सिरोंचा, मुलचेरा, आरमोरी, देसाईगंज (वडसा),
कोरची, कुरखेडा, भामरागड

गडचिरोली जिल्हा महत्त्वाची स्थळे :
1. गडचिरोली – हे जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. येथे 2011 साली
गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. गडचिरोली स्थानिक भागातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे.
2. मारोडा – चामोर्शी तालुक्यातील मारोडा या ठिकाणी तांबे धातूच्या खाणी आहेत.
3. हेमलकसा – हे स्थळ भामरागड तालुक्यात आहे. कुष्टरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी सुरू केलेला आश्रम आहे.
येथे आदिवासी विकासासाठी ‘लोकबिरादरी’ प्रकल्प राबविला आहे.
4. भामरागड – हे तालुक्याचे मुख्यालय आहे. हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील तालुका आहे.

खनिजे :
जिल्ह्यात लोह-खनिज, चुनखडक साठे आढळतात.
1. लोह खनिज – सुरजागड, दमकोट, पडवी, भामरागड, गडचिरोली, देऊळगाव परिसर
2. चुनखडी – अहेरी, सिरोंचा तालुक्यांत
3. तांबे – चामोर्शी जवळ मोराडा येथे

धरण :
जिल्ह्यात मोठी धरणे फारशी नाहीत. जलसिंचनासाठी नद्यावर लहान मोठे बांध बांधले आहेत.
यामध्ये चामोर्शी तालुक्यात रेगडी येथील बांध महत्त्वपूर्ण आहे.
सती नदीवर पळसखेड (कुरखेडा) येथे धरण आहे.
सिंदेवाडी तालुक्यात असोलमेंढा येथे पाथरी नदीवर धरण आहे.
इतर धरण – चंदईनाला व लभानसराडा (वरोडा) चारगाव (वरोडा), तुलतुली (दवंडी, आरमोरी) इत्यादी.

नदी :
🟢 वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी जिल्ह्यांच्या पूर्व पश्चिम सीमेवरून वाहते. नदीने भंडारा व गडचिरोली आणि चंद्रपूर व गडचिरोली दरम्यान नैसर्गिक सीमा तयार केली आहे. वैनगंगा उत्तर दक्षिणेला वाहते शिवनी जवळ वैनगंगा वर्धा न त्यांचा उगम होतो व नदी प्राणहिता नावाने पुढे जाते .
🟢 इंद्रावती नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर दक्षिणेकडे वाहत गडचिरोली व छत्तीसगड दरम्यान नैसर्गिक सीमा निर्माण करते.
🟢 गोदावरी नदी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलेगत आहे, सोमनूर येथे इंद्रावती गोदावरीस मिळते.

marathi naukri telegram

मृदा :
🟢 जिल्ह्याचा बराचसा प्रदेश वनाच्छादित व डोंगराळ आहे. नद्यांच्या प्रदेशातील जमीन सुपीक व उपजावू आहे, पूर्वेकडील डोंगराळ भागात मुरमाड जमीन आहे.

पिके :
🟢 जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण अत्यल्प आहे,जिल्ह्यात प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते.
🟢 जिल्ह्याच्या पूर्व भागात तीळ मूग माका तुर उडीद हरभरा ज्वारी गहू धान्य पिके घेतली जातात.
🟢 आरमोरी व शिरोंचा तालुक्यात जलसिंचनाच्या सोयी असल्यामुळे या भागात उसाचे पीक घेतले जाते. उन्हाळ्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात टरबूज व खरबूज ही पिके घेतली जातात.
🟢 जिल्ह्याच्या दुर्गम भागात ताडाच्या झाडापासून व तेंदु पत्त्याचे वन उत्पन्न घेतात. शिरूंच्या व आरमोरी तालुक्यात उत्तम प्रतीचे तंबाखूचे पीक घेतले जाते.

हवामान :
🟢 जिल्ह्याचे स्थान समुद्रापासून दूर असल्याने जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान उष्ण व दमट आहे. येथील डोंगराळ प्रदेश वनांचे अधिक प्रमाणे यामुळे वातावरणात काहीसादमटपणा देखील जाणवतो.
🟢 पूर्वेकडील डोंगरांमुळे जिल्ह्यास प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, पूर्व भागात पश्चिम भागाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण हे अधिक आहे.

वने :
🟢 जिल्ह्याचे ७० टक्के पेक्षा अधिक क्षेत्र वनात छातीत आहे वनाच्या टक्केवारी व वनाच्या प्रमाणानुसार जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक लागतो.
🟢 वनांमध्ये सागवन व बांबू ही प्रमुख वृक्षे आढळतात. यासह शिसम, खैर,मोह, वड, चंदन इत्यादी वृक्ष देखील आढळतात. वाघ जंगली म्हैस, ससे, सांभर, नीलगाय, चौसिंगा इत्यादी प्राणी देखील आहेत.
🟢 जिल्ह्यात चपराळा आणि भामरागड अभयारण्य आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागात धानोरा डेटापल्ली अहेरी सिरोंचा तालुक्यात घनदाट जंगले आहेत.

गडचिरोली जिल्हा प्राकृतिक :
🟢 महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील हा जिल्हा वैनगंगा नदी खोऱ्याच्या प्रदेशात आहे जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक डोंगर आहेत. या भागात सातनाला, टिपागड, चिरोली,भामरागड,सुरजगड इत्यादी डोंगर आहेत यामुळे प्रदेशात वनांचे व आदिवासी समाजाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
🟢 भामरागड डोंगरांमधील गडलगट्टा हे जिल्ह्यातील सर्वोच्च (967 मी) शिखर आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरकोंडा व चिकियालाचा डोंगराळ प्रदेश आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग वैनगंगा नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे.

गडचिरोली जिल्हा औद्योगिक :
औद्योगिकदृष्ट्या जिल्हा मागासलेला आहे. जिल्ह्यात वडसा व देसाईगंज येथे औद्योगिक वसाहती आहेत, अल्लापल्ली येथे धान गिरण्या आहेत, देसाईगंज, चामोर्शी, गडचिरोली, आलापल्ली इत्यादी ठिकाणी लाकूड कटाईचे उद्योग चालतात. भामरागड,एटापल्ली, हेमलकसा येथे मत्स्य व्यवसाय चालतो. जिल्ह्यात पूर्वी पासून रेशीम कोष निर्मिती चालतो. आरमोरी येथे रेशीम निर्मिती परियोजना चालते. भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे हस्तकला वस्तू बनवण्याचा उद्योग चालतो.


Gadchiroli District Info in Marathi | गडचिरोली जिल्हा विशेष माहिती : या घटकावर नेहमीच आपल्याला पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणून आपण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांवर विशेष माहिती पोस्ट घेऊन येत आहोत. सर्व जिल्ह्यांची विशेष माहिती आपल्याला खालील लिंकवरून मिळेल.

 

 

One thought on “Gadchiroli District Info in Marathi | गडचिरोली जिल्हा विशेष माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *