आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 11 | Marathi Naukri Arogya Sevak Bharti 2021
प्रश्न १ : पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते ?
१) 100 डिग्री सेंटीग्रेड
२) 4 डिग्री सेंटीग्रेड ✔
३) 0 डिग्री सेंटीग्रेड
४) -236 डिग्री सेंटीग्रेड
प्रश्न २ : मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात ?
१) मज्जासंस्था ✔
२) पचनसंस्था
३) उत्सर्जनसंस्था
४) रक्ताभिसरण संस्था
प्रश्न ३ : शरीरात कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात ?
१) यकृत
२) अस्थिमज्जा ✔
३) हृदय
४) अन्ननलिका
प्रश्न ४ : पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोठे आहे ?
१) हृषीकेश (उत्तराखंड)
२) बुलंदशहर (उत्तरप्रदेश) ✔
३) नोयडा (उत्तरप्रदेश)
४) जबलपुर (मध्य प्रदेश)
प्रश्न ५ : कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
१) कायमधारा
२) जमीनदारी
३) रयतवारी ✔
४) मिरासदारी
प्रश्न ६ : सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केला ?
१) झेंडा सत्याग्रह
२) खेडा सत्याग्रह
३) बार्डोलीचा सत्याग्रह ✔
४) मिठाचा सत्याग्रह
प्रश्न ७ : महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले होते ?
१) महम्मद गझनी
२) महम्मद घोरी
३) अल्तमश
४) अल्लाउद्दीन खिलजी ✔
प्रश्न ८ : ‘दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया’ या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण होता ?
१) एच.एच. विल्सन
२) आर.सी.दत्त ✔
३) कार्टराइट
४) हारग्रीव्हज
प्रश्न ९ : गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे ?
१) डोकेदुखी ✔
२) हगवण
३) डायरिया
४) निद्रानाश
प्रश्न १० : भारतात ‘बँकांची बँक’ म्हणून कोणती बँक ओळखली जाते ?
१) नाबार्ड
२) SBI
३) राज्य मध्यवर्ती सहकारी बँक
४) RBI ✔
प्रश्न ११ : हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमीनची आवश्यकता आहे ?
१) व्हिटॅमीन ए
२) व्हिटॅमीन बी
३) व्हिटॅमीन डी ✔
४) व्हिटॅमीन सी
प्रश्न १२ : रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
१) सोडीयम-24 ✔
२) कार्बन-14
३) आयोडीन-131
४) आर्सेनिक
प्रश्न १३ : महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ………… येथे सुरू झाली ?
१) नाशिक
२) पुणे
३) सातारा ✔
४) औरंगाबाद
प्रश्न १४ : मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) नागपूर
२) अमरावती ✔
३) गोंदिया
४) चंद्रपूर
प्रश्न १५ : खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ‘ज्वारीचे कोठार’ म्हणतात ?
१) सोलापूर ✔
२) सातारा
३) अहमदनगर
४) बीड
प्रश्न १६ : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
१) पुणे
२) नाशिक ✔
३) औरंगाबाद
४) वर्धा
प्रश्न १७ : भारतातील कोणत्या राज्याला ‘ज्वेल सिटी’ म्हणतात ?
१) केरळ
२) सिक्किम
३) तेलंगणा
४) मणीपुर ✔
प्रश्न १८ : भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते ?
१) जयपूर ✔
२) आगरा
३) चंदिगड
४) बंगळुरू
प्रश्न १९ : ‘प्रगतीसाठी धडपडणारा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
१) होतकरू ✔
२) उद्योगी
३) महत्त्वकांक्षी
४) विद्वान
प्रश्न २० : ‘आनंदमठ’ या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
१) बंकीमचंद्र चटर्जी ✔
२) बिपिनचंद्र पॉल
३) रविंद्रनाथ टागोर
४) राजाराम मोहन रॉय
प्रश्न २१ : भारत सरकारने तयार केलेल्या मोबाइल अॅपस्टोअरचे नाव काय आहे ?
१) मोबाइल सेवा अॅपस्टोअर ✔
२) भारतीय अॅपस्टोअर
३) भारतीय सेवा अॅपस्टोअर
४) सेव अॅपस्टोअर
प्रश्न २२ : खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री चिरंजीवी योजना’ लागू केली जाणार आहे ?
१) उत्तरप्रदेश
२) गुजरात
३) राजस्थान ✔
४) मध्यप्रदेश
प्रश्न २३ : कोणता सर्वाधिक शास्त्रात्रे आयात करणारा जगातील दूसरा सर्वात मोठा देश ठरला आहे ?
१) रशिया
२) भारत ✔
३) ऑस्ट्रेलिया
४) चीन
प्रश्न २४ : कोणत्या देशात जगातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प उभारला जात आहे ?
१) सिंगापूर ✔
२) भारत
३) चीन
४) डेन्मार्क
प्रश्न २५ : कोणत्या शहरात कल्याणी राफेल अॅडव्हॉन्स सिस्टम्स या कंपनीचे मुख्यालय आहे ?
१) बंगळुरू
२) हैदराबाद ✔
३) दिल्ली
४) चेन्नई
Good question quality ,👍