Marathi Naukri Daily Notes || मराठी नौकरी दैनिक नोट्स || 93th Oscars Awards

 

✅ ९३वे ऑस्कर पुरस्कार २०२१ विजेते 

⏳ पुरस्काराची सुरुवात : १९२९ पासून

🎞️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : नोमँडलँड

👤 सर्वोत्कृष्ट अभिनेता : एंथनी हॉपकिंस

👩‍🦰 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रांसेस मैकडॉर्मेंड

👤 सर्वो. स. अभिनेता : डैनियल कलुया

👩‍🦰 सर्वो. स. अभिनेत्री : यूह जंग यौन

👤 सर्वो. दिग्दर्शक : क्लो झाओ 

🎞️ सर्वो. आंतरराष्ट्रीय चित्रपट : अनदर राउंड

🎞️ सर्वो. मूळ पटकथा : इमराल्ड फेनल

🎞️ सर्वो. अ‍ॅ. लघुपट : इफ अनीथिंग हेपन्स

🎞️ सर्वो. अ‍ॅनिमेटेड चित्रपट : सोल

🎞️ सर्वोत्कृष्ट माहितीपट : माई ऑक्टोपस टीचर

🎵 ओरिजनल साँग : फाइट फॉर यू

🏆 हयुम्यानिटेरियन पुरस्कार : टायलर पेरी

🎞️ ओरिजनल स्कोअर : सोल

🎞️ फिल्म् एडिटिंग : साऊंड ऑफ मेटल

🎞️ बस्ट प्रोडक्शन डिझाइन : मँक

🎞️ वहिज्युअल इफेक्ट : टेनेट

🎞️ बस्ट सिनेमॅटोग्राफी : एरिक मेशर्समेंट

✅ सर्वाधिक नामांकनं : मँक (१०)

🏆 सर्वाधिक पुरस्कार : नोमँडलँड (०३)

वरुण-2021’ युद्ध कवायत

🎑भारत आणि फ्रान्स या देशांच्या नौदलांदरम्यान द्वैवार्षिक 19 व्या संयुक्त युद्ध कवायतीचे अरबी समुद्रात 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2021 या काळात आयोजन करण्यात आले आहे. ‘वरुण-2021’ असे या कवायतीचे नाव आहे.

🖱ठळक बाबी….

🎑भारतीय नौदलाकडून INS कोलकाता, INS तरकश, INS तलवार, INS दीपक, सी-किंग 42बी हेलिकॉप्टर आणि चेतक हेलिकॉप्टर, INS कलवरी पाणबुडी आणि P8I लांब पल्ल्याचे सागरी गस्त विमान या युद्ध अभ्यासात सहभागी होणार आहे.

🎑भारतीय चमुचे नेतृत्व पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर रिअर अ‍ॅडमिरल अजय कोच्चर हे करतील तर फ्रान्सच्या चमुचे नेतृत्व रिअर अ‍ॅडमिरल मार्क ऑसेडाट करतील.

🎑तीन दिवस चालणाऱ्या या युद्ध सरावात समुद्रात उच्च पातळीवरील नौदल मोहीम, यात अत्याधुनिक हवाई आणि पाणबुडी सरावाचा समावेश आहे. दोन्ही नौदल सागरी क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रदान करण्यासाठी आपले युद्ध-कौशल्य आणखी वर्धित करण्याचा प्रयत्न करतील.

🖱भारतीय नौदलाविषयी…..

🎑भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

🎑छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.

🎑1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

🎑फरान्स हा प‌‌श्चिम यूरोपातील एक अग्रगण्य प्रजासत्ताक देश आहे. देशाच्या उत्तरेस इंग्लिश खाडी, ईशान्येस बेल्जियम, लक्सेंबर्ग, पूर्वेस स्वित्झर्लंड, आग्नेयीस इटली व भूमध्य समुद्र, दक्षिणेस भूमध्य समुद्र व स्पेन आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर (बि‌स्के उपसागर) आहे. पॅरीस हे शहर देशाची राजधानी आहे. युरो हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.

शर्मिला टागोर, नाना पाटेकर यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार

‘दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारे वर्ष २०२० साठीचे ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ शनिवारी त्यांच्या ७९ व्या स्मृतिदिनी जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारार्थींना त्यांचे पुरस्कार घरी नेऊन दिले जाणार आहेत. यावेळी कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, संगीतकार प्यारेलाल शर्मा आणि अभिनेते नाना पाटेकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मंगेशकर कु टुंबीयांकडून हा पुरस्कार दिला जातो.

यंदा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विान मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ गायिका – संगीतकार मीना खडीकर, ज्येष्ठ गायिका – संगीतकार उषा मंगेशकर यांच्यासह वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *