Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 | Police Bharti Previous Questions Papers #01
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे. या प्रश्न संचामध्ये राज्यघटना या विषयावर विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्नसंच..
01. काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या …………. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला होता ?
a) फैजपूर
b) नागपूर
c) वर्धा
d) अलाहाबाद
उत्तर : c) वर्धा
02. ‘चले जाव’ या आंदोलनामध्ये कुलाबास जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्यांनी केले होते ?
a) नानासाहेब कुंटे
b) वसंतराव नाईक
c) उत्तमराव पाटील
d) रावसाहेब ओक
उत्तर : a) नानासाहेब कुंटे
03. वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते ?
a) रासायनिक खते
b) कंपोस्ट खत
c) कीटकनाशके
d) सूर्यप्रकाश
उत्तर : d) सूर्यप्रकाश
04. हिंदी महासागर …………. मुळे भूमध्य समुद्राला जोडल्याने साहजिकच हिंदी महासागराच्या प्रत्यक्ष प्रभावात दक्षिण युरोप व उत्तर आफ्रिका आला.
a) पनामा कालवा
b) सुएझ कालवा
c) किल कालवा
d) वरीलपैकी नाही
उत्तर : b) सुएझ कालवा
05. घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा 1935 मधून घेण्यात आलेले आहेत ?
a) प्रशासकीय
b) लोकसेवा आयोग
c) संघराज्य योजना
d) वरील सर्व
उत्तर : d) वरील सर्व
06. मोदी आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय लाभार्थीसाठी तीन वर्षात एकूण किती घरे उभारण्यात येणार आहेत ?
a) 10 लाख
b) 05 लाख
c) 02 लाख
d) 07 लाख
उत्तर : a) 10 लाख
📌 पोलीस भरती प्रश्नसंच 📌
पोलीस भरती प्रश्नसंच 01
पोलीस भरती प्रश्नसंच 02
पोलीस भरती प्रश्नसंच 03
07. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टनुसार सलग सहाव्यांदा सर्वाधिक आनंदी देश खालीलपैकी कोणता ठरला आहे ?
a) स्वित्झर्लंड
b) नॉर्वे
c) फिनलँड
d) ग्रीनलँड
उत्तर : c) फिनलँड
08. ‘इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे लेखक कोण आहेत ?
a) अमिश त्रिपाठी
b) चेतन भगत
c) रश्मी बन्सल
d) अरिंदम चौधरी
उत्तर : a) अमिश त्रिपाठी
09. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना ………… असे म्हणतात.
a) संधी
b) विभक्ती
c) समास
d) वर्ण
उत्तर : b) विभक्ती
10. ‘दीन’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल ?
a) गरीब
b) दिवस
c) रात्र
d) यापैकी नाही
उत्तर : a) गरीब
11. तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी कोणती आहे ?
a) बायज्यूझ
b) खान अकॅडमी
c) Wifi स्टडी
d) अन अकॅडमी
उत्तर : d) अन अकॅडमी
12. ‘एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही’ हे ठरवण्याचा शेवटचा अधिकार हा कोणाकडे असतो ?
a) राष्ट्रपती
b) लोकसभा अध्यक्ष
c) सर्वोच्च न्यायालय
d) कायदामंत्री
उत्तर : b) लोकसभा अध्यक्ष
13. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे ?
a) गोदावरी नदी
b) कृष्णा नदी
c) भीमा नदी
d) यापैकी नाही
उत्तर : c) भीमा नदी
14. …………. यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्ते यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी ‘पोलादी पडदा’ ही संज्ञा सर्वप्रथम वापरली.
a) सर विंस्टन चर्चिल
b) फ्रँकलिन रुजवेल्ट
c) मार्शल टिटो
d) थिओडोर रुजवेल्ट
उत्तर : a) सर विंस्टन चर्चिल
15. गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत ?
a) प्रतिभाताई पाटील
b) सरोजिनी नायडू
c) शबाना आजमी
d) इंदिरा गांधी
उत्तर : d) इंदिरा गांधी
16. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अनुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत अधिकार प्राप्त होतात ?
a) अनुच्छेद 152
b) अनुच्छेद 163
c) अनुच्छेद 154
d) अनुच्छेद 160
उत्तर : b) अनुच्छेद 163
17. सन 2018 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?
a) 35.14 टक्के
b) 45.23 टक्के
c) 50.68 टक्के
d) 60.32 टक्के
उत्तर : b) 45.23 टक्के
18. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे उभारण्यात आला होता ?
a) प्रवरानगर
b) सांगली
c) राहुरी
d) कोल्हापूर
उत्तर : a) प्रवरानगर
19. पांढर देवीचा मान म्हणून फाल्गुन महिन्यात रीमदेव हा सामुदायिक सण कोणती आदिवासी जमात साजरा करते ?
a) गोंड
b) हलबा
c) कातोडी
d) मावची
उत्तर : d) मावची
20. बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते ?
a) मोसमी काळात
b) हिवाळ्यात
c) शरद ऋतूमध्ये
d) उन्हाळ्यानंतर
उत्तर : b) हिवाळ्यात
21. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक खालीलपैकी कोण आहेत ?
a) सप्रिया किंद्रे
b) मोक्षदा पाटील
c) तेजीस्विनी सातपुते
d) आरती सिंह
उत्तर : a) सप्रिया किंद्रे
22. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे ?
a) दक्षता पथक
b) सक्षम पथक
c) दामिनी पथक
d) स्वामिनी पथक
उत्तर : c) दामिनी पथक
23. महाराष्ट्र पोलिसांना टोपी ऐवजी डोक्याला घट्ट बसणारी आर्मी कॅप सारखी नवीन कॅप कधीपासून देण्यात आली ?
a) एप्रिल 2017
b) एप्रिल 2018
c) एप्रिल 2020
d) एप्रिल 2019
उत्तर : d) एप्रिल 2019
24. माहितीचा कायदा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाने जगाला दिलेली एक देणगी आहे ?
a) अमेरिका
b) फ्रान्स
c) इंग्लंड
d) स्वीडन
उत्तर : d) स्वीडन
25. संघ सहकार्य संघटना सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
a) भारत
b) चीन
c) कुवैत
d) दक्षिण आफ्रिका
उत्तर : a) भारत
Police Bharti Math Questions 01
26. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार देशात सायबर गुन्हेगारीत प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ?
a) उत्तरप्रदेश
b) कर्नाटक
c) तेलंगणा
d) महाराष्ट्र
उत्तर : c) तेलंगणा
27. गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेटच्या मराठी रूपांतराचे नाव काय आहे ?
a) विकार विलसित
b) ज्ञानप्रकाश
c) कॅमलेट
d) हायकास्ट वूमन
उत्तर : a) विकार विलसित
28. 15 ऑगस्ट 1948 रोजी ‘साधना’ या साप्ताहिक पत्रिकेचे संस्थापन केलेल्या स्वातंत्र्यसेनानी, लेखक आणि समाजसुधारकाचे नाव काय आहे ?
a) आचार्य विनोबा भावे
b) अच्युत पटवर्धन
c) एस. एम. जोशी
d) साने गुरुजी
उत्तर : d) साने गुरुजी
29. लॅटेराईट खडकापासून तयार झालेली जमीन कोणत्या रंगाची असते ?
a) काळी
b) पिवळी
c) तांबडी
d) तपकिरी
उत्तर : c) तांबडी
30. वर्ड प्रोसेसर,स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ग्राफिक्स व डाटाबेस या सॉफ्टवेअरच्या संचाला काय म्हटले जाते ?
a) ऑपरेटिंग सिस्टीम
b) ऑफिस सूट
c) डिसिजन सपोर्ट सिस्टीम
d) मायक्रोसॉफ्ट सूट
उत्तर : b) ऑफिस सूट
Umeshchande786@gamil. Com
Beautiful