![District Court Questions Paper 01](https://marathinaukri.in/wp-content/uploads/2024/01/Screenshot-46-1024x576.png)
District Court Questions Paper 01 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 01
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. हे प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरतील. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, न्यायालयाविषयी संबंधित असणारे महत्वाचे प्रश्न तसे चालू घडामोडी 2023-24 आणि मागील वर्षी विचारलेलेमहत्त्वाचे आणि दरवर्षी विचारलेले प्रश्न घेतले आहेत.
1. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला सदर गीत कोणी लिहिले आहे ?
1) श्रीनिवास खळे
2) शाहीर साबळे
3) राजा बढे
4) अमर साबळे
उत्तर : 3) राजा बढे
2. कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही ?
1) रोजगाराचा अधिकार
2) माहितीचा अधिकार
3) बालकांचे अधिकार
4) समान कामासाठी समान वेतन
उत्तर : 2) माहितीचा अधिकार
3. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले ?
1) रशिया
2) मेक्सिको
3) चिली
4) पेरू
उत्तर : 1) रशिया
4. संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली ?
1) इंग्लंड
2) अमेरिका
3) फ्रान्स
4) नेपाळ
उत्तर : 1) इंग्लंड
5. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?
1) वाय. व्ही चंद्रचूड
2) राजेश पाटील
3) धर्माधिकारी
4) डी. वाय .चंद्रचूड
उत्तर : 4) डी. वाय .चंद्रचूड
6. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमा अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते ?
1) कलम 352
2) कलम 356
3) कलम 360
4) कलम 370
उत्तर : 3) कलम 360
7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे ?
1) इंदू मिल
2) जुहू चौपाटी
3) गेटवे ऑफ इंडिया
4) आझाद मैदान
उत्तर : 1) इंदू मिल
8. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?
1) महात्मा फुले
2) महादेव गोविंद रानडे
3) विठ्ठल रामजी शिंदे
4) धोंडो केशव कर्वे
उत्तर : 4) धोंडो केशव कर्वे
9. सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळाला ?
1) भिकूरामजी इदाते
2) रामकृष्ण शिंदे
3) मालतीबाई जाधव
4) राशिद शेख मिया
उत्तर : 1) भिकूरामजी इदाते
10. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे ?
1) माणिक बंडोजी इंगळे
2) डेबुजी झिंगराजी जानोरकर
4) माणिक खांडोजी महाराज
4) यापैकी नाही
उत्तर : 1) माणिक बंडोजी इंगळे
11. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला ?
1) असीम कुमार
2) बाबू गेनू
3) अच्युतराव पटवर्धन
4) शिरीष कुमार
उत्तर : 4) शिरीष कुमार
12. मा. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे ?
1) झारखंड
2) छत्तीसगड
3) आसाम
4) ओडिसा
उत्तर : 1) झारखंड
13. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
1) संसद
2) पंतप्रधान
3) लोकसभा
4) मुख्य न्यायाधीश
उत्तर : 1) संसद
14. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे ?
1) नांदेड
2) नागपूर
3) मुंबई
4) छ.संभाजीनगर
उत्तर : 2) नागपूर
15. वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्र मध्ये कोणत्या शहरांमध्ये सुरू आहे ?
1) मुंबई- सोलापूर
2) संभाजीनगर -नांदेड
3) शिर्डी- संभाजीनगर
4) पुणे -कोल्हापूर
उत्तर : 1) मुंबई- सोलापूर
16. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला ?
1) सर
2) लॉर्ड
3) रावबहादूर
4) रावसाहेब
उत्तर : 1) सर
17. 2023 साली चा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म ( माहितीपट) श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला ?
1) द वार गेम
2) फिरस्ती
3) झीऑन
4) द एलिफंट विस्पर
उत्तर : 4) द एलिफंट विस्पर
18. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ?
1) महात्मा गांधी
2) विनोबा भावे
3) मदर तेरेसा
4) सी.व्ही. रमण
उत्तर : 2) विनोबा भावे
19. भारत देशामध्ये चित्ता या प्राण्यांचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे ?
1) काना
2) कुनो
3) पन्ना
4) काझीरंगा
उत्तर : 2) कुनो
20. केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ?
1) 100 कोटी रुपये
2) 200 कोटी रुपये
3) 300 कोटी रुपये
4) 400 कोटी रुपये
उत्तर : 1) 100 कोटी रुपये
21. भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोठून घेण्यात आली ?
1) युनायटेड किंगडम
2) अमेरिका
3) ऑस्ट्रेलिया
4) कॅनडा
उत्तर : 3) ऑस्ट्रेलिया
22. भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे ?
1) राष्ट्रपती
2) पंतप्रधान
4) राज्यपाल
4) सरन्यायाधीश
उत्तर : 1) राष्ट्रपती
23. भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो ?
1) 4 वर्ष
2) 5 वर्ष
3) 3 वर्ष
4) 6 वर्ष
उत्तर : 2) 5 वर्ष
24. एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्या व्यक्तीचे किमान वय किती असणे आवश्यक आहे ?
1) 21 वर्ष
2) 25 वर्ष
3) 30 वर्ष
4) 35 वर्ष
उत्तर : 4) 35 वर्ष
25. कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या किती पेक्षा जास्त नसावी ?
1) 450 पेक्षा जास्त नाही
2) 478 पेक्षा जास्त नसावी
3) 500 पेक्षा जास्त नसावी
4) 100 पेक्षा जास्त नसावी
उत्तर : 3) 500 पेक्षा जास्त नसावी
26. हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023 चा अमेरिकेतील पेन नाकाबोव्ह पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
1) राजे निंबाळकर
2) अमित कुलकर्णी
3) विनोद शुक्ला
4) यापैकी नाही
उत्तर : 3) विनोद शुक्ला
27. 19 मे 2023 या दिवसापासून खालीलपैकी किती रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ?
1) 2000 रुपये
2) 500 रुपये
3) 200 रुपये
4) 1000 रुपये
उत्तर : 1) 2000 रुपये
28. सचिन तेंडुलकर यांना केनियातील मसाई मारा येथील आदिवासींनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे ?
1) मॅन ऑफ क्रिकेट
2) गॉड ऑफ टेस्ट क्रिकेट
3) गार्ड ऑफ ऑनर
4) यापैकी नाही
उत्तर : 3) गार्ड ऑफ ऑनर
29. जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 14 जानेवारी
2) 20 फेब्रुवारी
3) 15 ऑगस्ट
4) 12 सप्टेंबर
उत्तर : 2) 20 फेब्रुवारी
30. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे ?
1) अनुच्छेद 343 (1)
2) अनुच्छेद 340 (1)
3) अनुच्छेद 341 (1)
4) अनुच्छेद 334 (1)
उत्तर : 1) अनुच्छेद 343 (1)
Khup important ahet question sir . thanks
Very valuable and important information for all competitive exam sir. Thank you….
Mala question paper pahije
20
Thank sir
Hi i am fine
Thank sir khup Chan prashn hote