District Court Questions Paper 05 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 05
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. हे प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरतील. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, न्यायालयाविषयी संबंधित असणारे महत्वाचे प्रश्न तसे चालू घडामोडी 2023-24 आणि मागील वर्षी विचारलेलेमहत्त्वाचे आणि दरवर्षी विचारलेले प्रश्न घेतले आहेत.
1. ‘रेला’ हा पारंपारिक लोकनृत्य प्रकार प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो ?
1) पालघर
2) सिंधुदुर्ग
3) गडचिरोली
4) चंद्रपूर
उत्तर : 3) गडचिरोली
2. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) एस. एम. जोशी
3) साने गुरुजी
4) डॉ. पंजाबराव देशमुख
उत्तर : 3) साने गुरुजी
3. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच ‘ हे उद्गार कोणाचे आहेत ?
1) वीर सावरकर
2) गोपाळ कृष्ण गोखले
3) महात्मा गांधी
4) लोकमान्य टिळक
उत्तर : 4) लोकमान्य टिळक
4. दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले ?
1) लॉर्ड लिटन
2) लॉर्ड रिपन
3) लॉर्ड डलहौसी
4) लॉर्ड कॅनिंग
उत्तर : 3) लॉर्ड डलहौसी
5. जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे ?
1) महात्मा गांधी
2) महात्मा ज्योतिबा फुले
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) डॉ. काणे
उत्तर : 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 26 जुलै
2) 15 जुलै
3) 20 जुलै
4) 29 जुलै
उत्तर : 1) 26 जुलै
7. संगणकीय भाषेमध्ये WWW याचा अर्थ काय होतो ?
1) World wide waste
2) Work wide web
3) World wide web
4) World video web
उत्तर : 3) World wide web
8. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
1) मुंबई
2) दिल्ली
3) चेन्नई
4) कोलकाता
उत्तर : 2) दिल्ली
9. आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले ?
1) गौंडवना
2) रायलसीमा
3) तेलंगणा
4) हैदराबाद
उत्तर : 3) तेलंगणा
10. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात ?
1) लोकशाही
2) हुकूमशाही
3) राजेशाही
4) सरंजामशाही
उत्तर : 1) लोकशाही
11. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला ?
1) 1960 साली
2) 1955 साली
3) 1949 साली
4) 1950 साली
उत्तर : 2) 1955 साली
12. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत ?
1) भारतीय जनता
2) कार्यकारी मंडळ
3) कायदेमंडळ
4) सर्वोच्च न्यायालय
उत्तर : 3) कायदेमंडळ
13. निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते ?
1) निवडणूक आयोग
2) राष्ट्रपती
3) लष्कर
4) पोलीस
उत्तर : 1) निवडणूक आयोग
14. ‘लोक माझे सांगाती’ हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे ?
1) विलासराव देशमुख
2) शरद पवार
3) गोपीनाथ मुंडे
4) प्रमोद महाजन
उत्तर : 2) शरद पवार
15. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कोठे स्थित आहे ?
1) मुंबई
2) पुणे
3) नागपूर
4) नाशिक
उत्तर : 1) मुंबई
16. एआय ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) चे जनक कोणाला मानले जाते ?
1) बिल गेट
2) सुंदर पिचाई
3) सत्या नडेला
4) डॉ. जेफ्री हिंटन
उत्तर : 4) डॉ. जेफ्री हिंटन
17. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
1) सदीप्तो सेन
2) मृणाल सेन
3) रोहित शेट्टी
4) अनुराग कश्यप
उत्तर : 1) सदीप्तो सेन
18. यूट्यूबच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1) नील मोहन
2) सुंदर पिचाई
3) अरविंद कृष्ण
4) लक्ष्मण नरसिंहन
उत्तर : 1) नील मोहन
19. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
1) सावंतवाडी
2) कुडाळ
3) दापोली
4) महाड
उत्तर : 3) दापोली
20. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे ?
1) ययाती
2) मृत्युंजय
3) श्रीमान योगी
4) महानायक
उत्तर : 2) मृत्युंजय
21. ‘भारतातील नीलक्रांती’ ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे ?
1) अन्नधान्य
2) दूध
3) रेशीम
4) मत्स्य उत्पादन
उत्तर : 4) मत्स्य उत्पादन
22. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपारिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे ?
1) तारपा
2) कुचीपुडी
3) कथकली
4) करमा
उत्तर : 1) तारपा
23. 67 वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटास मिळाला ?
1) तानाजी
2) पावनखिंड
3) शेरशाह
4) चंद्रमुखी
उत्तर : 3) शेरशाह
24. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे ?
1) भारतरत्न
2) पद्मश्री
3) पद्मभूषण
4) दादासाहेब फाळके
उत्तर : 2) पद्मश्री
25. महानिर्मितीचा राज्यातील ‘फ्लोटिंग सोलर ‘चा पहिला प्रकल्प कोठे उभारण्यात येणार आहे ?
1) चंद्रपूर
2) नाशिक
3) वर्धा
4) कोल्हापूर
उत्तर : 1) चंद्रपूर
26. प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकासाठी राबविण्यात येते ?
1) शहरातील फेरीवाले
2) असंघटित कामगार
3) शेतकरी
4) यापैकी नाही
उत्तर : 1) शहरातील फेरीवाले
27. राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते ?
1) ई – पॉस
2) ई – सर्विस
3) ई – केवायसी
4) यापैकी नाही
उत्तर : 1) ई – पॉस
28. समाधान यात्रा कोणी सुरू केली होती ?
1) नितीश कुमार
2) अखिलेश यादव
3) ममता बॅनर्जी
4) लालूप्रसाद यादव
उत्तर : 1) नितीश कुमार
29. सहावे अहिराणी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?
1) धुळे
2) वर्धा
3) चंद्रपूर
4) गोंदिया
उत्तर : 1) धुळे
30. प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासाव्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते माहिती पुस्तक प्रसिद्ध केले ?
1) वाईल्ड लाईफ इन इंडिया
2) अमृत काल का टायगर व्हिजन
3) इंटरनॅशनल बिग कॅट
4) यापैकी नाही
उत्तर : 2) अमृत काल का टायगर व्हिजन