District Court Questions Paper 02 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 02
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. हे प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरतील. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, न्यायालयाविषयी संबंधित असणारे महत्वाचे प्रश्न तसे चालू घडामोडी 2023-24 आणि मागील वर्षी विचारलेलेमहत्त्वाचे आणि दरवर्षी विचारलेले प्रश्न घेतले आहेत.

1. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ?
1) मैसूर
2) शिमला
3) जयपूर
4) हैदराबाद
उत्तर : 3) जयपूर
2. राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 24 जानेवारी
2) 11 ऑक्टोबर
3) 5 जून
4) 14 नोव्हेंबर
उत्तर : 1) 24 जानेवारी
3. कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ?
1) तामिळनाडू
2) केरळ
3) ओडिसा
4) कर्नाटक
उत्तर : 2) केरळ
4. इ.स. 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ?
1) ब्राह्मो समाज
2) सत्यशोधक समाज
3) प्रार्थना समाज
4) आर्य समाज
उत्तर : 2) सत्यशोधक समाज
5. Covid-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते ?
1) थिंपू
2) बीजिंग
3) वुहान
4) शांघय
उत्तर : 3) वुहान
6. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते ?
1) छ. संभाजीनगर
2) पुणे
3) नागपूर
4) सोलापूर
उत्तर : 3) नागपूर
7. नॅशनल मिशन ऑफ वुमन च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ?
1) मोहिनी गिरी
2) पौर्णिमा आडवाणी
3) गिरीजा व्यास
4) जयंती पटनाईक
उत्तर : 4) जयंती पटनाईक
8. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत ?
1) मदर तेरेसा
2) डॉ. सी. व्ही. रमण
3) रवींद्रनाथ टागोर
4) डॉ. हरगोविंद खुराना
उत्तर : 3) रवींद्रनाथ टागोर
9. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
1) महात्मा गांधी
2) महात्मा ज्योतिबा फुले
3) सुभाषचंद्र बोस
4) छत्रपती शाहू महाराज
उत्तर : 1) महात्मा गांधी
10. पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणी प्राप्त केला ?
1) रेश्मा माने
2) साक्षी मलिक
3) प्रतीक्षा बागडी
4) यापैकी नाही
उत्तर : 3) प्रतीक्षा बागडी
11. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?
1) माणिक गोडघाटे
2) दिनकर गंगाराम केळकर
3) यशवंत दिनकर पेंढारकर
4) हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
उत्तर : 1) माणिक गोडघाटे
12. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’.अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती ?
1) महाड
2) माणगाव
3) येवला
4) नागपूर
उत्तर : 3) येवला
13. इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात ?
1) ई-मेल
2) ई-कॉमर्स
3) ई-अर्थ
4) ई -मनी
उत्तर : 2) ई-कॉमर्स
14. समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे ?
1) अनुच्छेद 44
2) अनुच्छेद 46
3) अनुच्छेद 40
4) अनुच्छेद 45
उत्तर : 1) अनुच्छेद 44
15. ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) क्रिकेट
2) भालाफेक
3) लांब उडी
4) गोळा फेक
उत्तर : 2) भालाफेक
16. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे ?
1) 33 टक्के
2) 50 टक्के
3) 25 टक्के
4) १२ टक्के
उत्तर : 2) 50 टक्के
17. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहेत ?
1) कलम 510
2) कलम 511
3) कलम 512
4) कलम 515
उत्तर : 2) कलम 511
18. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे ?
1) गरुड
2) पोपट
3) हरियाल
4) मोर
उत्तर : 3) हरियाल
19. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले ?
1) परभणी
2) वर्धा
3) नागपूर
4) मुंबई
उत्तर : 2) वर्धा
20. डॉ.बी.आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ?
1) कलम 19
2) कलम 21
3) कलम 51
4) कलम 32
उत्तर : 4) कलम 32
21. संत रामनुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ( समतेचा पुतळा) कोठे उभारण्यात आला आहे ?
1) अहमदाबाद
2) अलाहाबाद
3) हैदराबाद
4) विशाखापटनम
उत्तर : 3) हैदराबाद
22. कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे ?
1) युनायटेड स्टेट
2) युनायटेड किंगडम
3) कॅनडा
4) डेन्मार्क
उत्तर : 1) युनायटेड स्टेट
23. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते ?
1) डॉ. आंबेडकर
2) डॉ.राजेंद्र प्रसाद
3) बी. एन.राव
4) श्री. अय्यर
उत्तर : 3) बी. एन.राव
24. भारतातील पहिले सौर उर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते ?
1) जालंधर
2) ढोलेरा
3) शिलॉंग
4) गुवाहाटी
उत्तर : 4) गुवाहाटी
25. आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995 -९६ पासून एक योजना राबवली जात आहे त्या योजनेचे नाव काय ?
1) नव संजीवनी योजना
2) महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना
3) मिशन इंद्रधनुष्य
4) नई रोशनी
उत्तर : 1) नव संजीवनी योजना
26. टोकियो ऑलम्पिक मध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे ?
1) विश्वनाथ आनंद
2) बजरंग पुनिया
3) रविकुमार दहिया
4) नीरज चोप्रा
उत्तर : 4) नीरज चोप्रा
27. ‘ दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ‘ हा प्रबंध कोणी लिहिला ?
1) डॉ. अमर्त्य सेन
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) अभिजीत बॅनर्जी
4) पेरियार रामस्वामी
उत्तर : 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
28. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे ?
1) प्रौढ साक्षरता
2) महिला सक्षमीकरण
3) मुलींचे शिक्षण
4) हरवलेल्या मुला मुलीचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे
उत्तर : 4) हरवलेल्या मुला मुलीचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे
29. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
1) शिवाजी सावंत
2) पु. ल. देशपांडे
3) साने गुरुजी
4) वि.स. खांडेकर
उत्तर : 4) वि.स. खांडेकर
30. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
1) अर्थशास्त्र
2) वैद्यकीय शास्त्र
3) क्रीडा
4) राजकारण
उत्तर : 1) अर्थशास्त्र

