Talathi Question Paper Online Test 02 : Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.
प्रश्न 01 : कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल ?
1) शिल्लक राहिलेला
2) कायम टिकणारे
3) वारंवार उल्लेख होणारे
4) यापैकी नाही
उत्तर : कायम टिकणारे
प्रश्न 02 : ‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
1) धाकटा
2) मोठा
3) चुलत
4) वारला
उत्तर : धाकटा
प्रश्न 03: राष्ट्रीय अन्नसुरक्षा मोहिमेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केला जात नाही ?
1) तांदूळ
2) अंडी
3) गहू
4) डाळी
उत्तर : अंडी
प्रश्न 04: 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात जास्त होता ?
1) मुंबई शहर
2) नागपूर
3) अकोला
4) मुंबई उपनगर
उत्तर : मुंबई उपनगर
प्रश्न 05: 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश कोण होते ?
1) एच जे कानिया
2) सर मॉरीस ग्वायर
3) पतंजली शास्त्री
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : एच जे कानिया
प्रश्न 06: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई कोण होत्या ?
1) म्हाळसाबाई
2) बाईजाबाई
3) गोपिकाबाई
4) जिजाबाई
उत्तर : जिजाबाई
प्रश्न 07: जगामधील सर्वात मोठा रेल्वे कोच निर्माता बनलेला राज्यामधील संपूर्ण कोच कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ?
1) चेन्नई
2) मुंबई
3) नागपूर
4) पुणे
उत्तर : चेन्नई
प्रश्न 08: राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 91 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ?
1) मंदिरा नदी
2) अंबा नदी
3) कुंडलिका नदी
4) शास्त्री नदी
उत्तर : शास्त्री नदी
प्रश्न 09: खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
खांद्याला खांदा लावणे –
1) प्रेताला खांदा देणे
2) सहकार्य करणे
3) निषेध नोंदवणे
4) जबाबदारी उचलणे
उत्तर : सहकार्य करणे
👇 अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 09
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 10
प्रश्न 10: भारतामधील कोणत्याही राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती खालीलपैकी कोणा द्वारे केली जाते ?
1) भारताचे राष्ट्रपती
2) भारताचे पंतप्रधान
3) स्थानिक शासन
4) पंचायती
उत्तर : भारताचे राष्ट्रपती
प्रश्न 11: ‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल .
1) संमुख
2) उन्मुख
3) विमुख
4) दुर्मुख
उत्तर : उन्मुख
प्रश्न 12: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे ?
1) मुंबई
2) हैदराबाद
3) दिल्ली
4) पुणे
उत्तर : पुणे
प्रश्न 13: ‘प्रत्यक्ष’ या शब्दाचा योग्य संधीविग्रह ओळखा.
1) प्रति + अक्ष
2) प्रत + अक्ष
3) प्रति + अ
4) प्रत्ये + अक्ष
उत्तर : प्रति + अक्ष
प्रश्न 14: एकाच आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला आहे असे या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता ?
1) सवत
2) सहोदर
3) सोबती
4) यापैकी नाही
उत्तर : सहोदर
प्रश्न 15: महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला ?
1) वसंतदादा पाटील
2) यशवंतराव चव्हाण
3) वसंतराव नाईक
4) यापैकी नाही
उत्तर : वसंतराव नाईक
प्रश्न 16: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागांतर्गत येते ?
1) जलपुरवठा आणि स्वच्छता
2) सार्वजनिक आरोग्य
3) मृदा आणि जलसंवर्धन
4) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
उत्तर : जलपुरवठा आणि स्वच्छता
प्रश्न 17: महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली होती ?
1) शेतकऱ्यांचे प्रश्न
2) शिक्षण
3) पुरपिडीतांचे प्रश्न
4) कामगारांचे प्रश्न
उत्तर : शिक्षण
प्रश्न 18: ……………. प्रदेशांमध्ये वाऱ्याच्या उच्च वेगाच्या वहनामुळे चक्रीवादळ येऊ शकते.
1) उच्च दाबाच्या
2) कमी तापमानाच्या
3) कमी दाबाच्या
4) सामान्य तापमानाच्या
उत्तर : कमी दाबाच्या
प्रश्न 19: 1782 मध्ये खालीलपैकी कोणत्या तहावर ती स्वाक्षरी केली गेली ज्यामुळे पहिले अँग्लो मराठा युद्ध समाप्त झाले ?
1) ग्वालियरचा तह
2) सालबाईचा तह
3) मंदसौरचा तह
4) पुण्याचा तह
उत्तर : सालबाईचा तह
प्रश्न 20: महाराष्ट्राच्या धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या कोणत्या क्षेत्रांमधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ?
1) न्यायदान
2) दलित आंदोलन
3) समाजकार्य
4) राजकारण
उत्तर : समाजकार्य
प्रश्न 21: सध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर पेशव्यांचे प्रशासकीय केंद्र होते ?
1) औरंगाबाद
2) अहमदनगर
3) पुणे
4) कोल्हापूर
उत्तर : पुणे
प्रश्न 22: भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे ?
1) धोंडो केशव कर्वे
2) सचिन तेंडुलकर
3) लता मंगेशकर
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : धोंडो केशव कर्वे
प्रश्न 23: ऑक्सिजन आणि ………….. हे वातावरणामधील दोन मुख्य वायुरूप घटक आहेत.
1) अमोनिया
2) नायट्रोजन
3) ॲरगॉन
4) कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : नायट्रोजन
प्रश्न 24: खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.
1) नवल – संतोष
2) घर – भांडागार
3) दर्पण – आरसा
4) घास – दाटी
उत्तर : दर्पण – आरसा
प्रश्न 25: कोइंबतूर नंतर भारतातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थान निवडले गेले आहे ?
1) पुणे
2) सोलापूर
3) नागपूर
4) नाशिक
उत्तर : नाशिक
प्रश्न 26: महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत ?
1) 4 लाख
2) 5 लाख
3) 6 लाख
4) 8 लाख
उत्तर : 5 लाख
प्रश्न 27: भारत सोयाबीन तेलाची सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून करतो ?
1) चीन
2) तैवान
3) अफगाणिस्तान
4) अर्जेंटीना
उत्तर : अर्जेंटीना
प्रश्न 28: आशियाई क्रीडा स्पर्धा या वर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहेत ?
1) भारत
2) मलेशिया
3) नेपाळ
4) चीन
उत्तर : चीन
प्रश्न 29: मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1) डॉ. रवींद्र कुलकर्णी
2) डॉ. सुरेश गोसावी
3) डॉ. संजय भावे
4) डॉ. इंद्रा मानी
उत्तर : डॉ. रवींद्र कुलकर्णी
प्रश्न 30: मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाला बिपरजॉय’ हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?
1) भारत
2) चीन
3) भूतान
4) बांगलादेश
उत्तर : बांगलादेश
Very helpful