Talathi Question Paper Online Test 01 : Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.
प्रश्न 01: गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशाच्या शिल्पशैलीतून निर्माण झाली आहे ?
1) भारत व इराण
2) भारत व ग्रीस
3) भारत व श्रीलंका
4) भारत व बांग्लादेश
उत्तर : भारत व ग्रीस
प्रश्न 02: एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो ?
1) पंतप्रधान
2) गृहमंत्री
3) लोकसभा सभापती
4) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
उत्तर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
प्रश्न 03: स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला होता ?
1) लॉर्ड हॉबहाऊस
2) लॉर्ड रिपन
3) लॉर्ड मेयो
4) लॉर्ड डफरीन
उत्तर : लॉर्ड मेयो
प्रश्न 04: अजीम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत ?
1) इन्फोसिस
2) कॉग्निझंट
3) डेल
4) विप्रो
उत्तर : विप्रो
प्रश्न 05: वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे ?
1) रोहित शर्मा
2) सचिन तेंडुलकर
3) ए. बी. डिव्हिलियर्स
4) कोरी अँडरसन
उत्तर : रोहित शर्मा
प्रश्न 06: खालीलपैकी कोणत्या शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते ?
1) नाशिक
2) बेंगलोर
3) चंदिगड
4) म्हैसूर
उत्तर : नाशिक
प्रश्न 07 : ‘अर्धचंद्र मिळणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ काय होईल ?
1) अर्धा चंद्र होणे
2) काम अपूर्ण होणे
3) हकालपट्टी करणे
4) राग येणे
उत्तर : हकालपट्टी करणे
प्रश्न 08: समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.
1) केसरी – सजग
2) तटिनी – कर्ण
3) विहग – पक्षी
4) निंदा – गर्व
उत्तर : विहग – पक्षी
प्रश्न 09: खालीलपैकी कोणत्या राज्याने अटल सोलार कृषी पंप योजना सुरू केली आहे ?
1) मध्यप्रदेश
2) उत्तरप्रदेश
3) गुजरात
4) महाराष्ट्र
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न 10: प्रश्नातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
वाखाणणी करणे
1) नाश करणे
2) पश्चाताप करणे
3) स्तुती करणे
4) खात्री करणे
उत्तर : स्तुती करणे
प्रश्न 11: ‘गोंधळ घालणे’ हा महाराष्ट्रातील एक …………. प्रकार आहे .
1) हस्तकलेची शैली
2) प्रदर्शित करण्याच्या कलेचा प्रकार
3) दागिन्यांचा प्रकार
4) चित्रकलेची शैली
उत्तर : प्रदर्शित करण्याच्या कलेचा प्रकार
👇 अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 09
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 10
प्रश्न 12: यूएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडली गेलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे ?
1) विजयालक्ष्मी पंडित
2) एस राधाकृष्णन
3) आचार्य कृपालानी
4) व्ही.के कृष्ण मेनन
उत्तर : विजयालक्ष्मी पंडित
प्रश्न 13: नाशिक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ?
1) नर्मदा नदी
2) गोदावरी नदी
3) तापी नदी
4) कृष्णा नदी
उत्तर : गोदावरी नदी
प्रश्न 14: खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली ?
1) यादव राजवंश
2) राष्ट्रकूट राजवंश
3) सातवाहन
4) वाकाटक
उत्तर : यादव राजवंश
प्रश्न 15: 1867 साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
1) सेनापती बापट
2) बाळ गंगाधर टिळक
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) डॉ. आत्माराम पांडुरंग
उत्तर : डॉ. आत्माराम पांडुरंग
प्रश्न 16: पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही कोणत्या वर्षी सुरु करण्यात आलेली योजना आहे ?
1) 1985 साली
2) 1995 साली
3) 2005 साली
4) 2016 साली
उत्तर : 2016 साली
प्रश्न 17: महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे ?
1) विदर्भ
2) खानदेश
3) कोकण
4) मराठवाडा
उत्तर : कोकण
प्रश्न 18: पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात स्त्रवले जाणारे आम्ल कोणते आहे ?
1) सायट्रिक आम्ल
2) सल्फ्युरिक आम्ल
3) लॅक्टिक आम्ल
4) हायड्रोक्लोरिक आम्ल
उत्तर : हायड्रोक्लोरिक आम्ल
प्रश्न 19: लोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती कोण आहे ?
1) सोमनाथ चॅटर्जी
2) मनोहर जोशी
3) बलराम जाखर
4) रबी राज
उत्तर : बलराम जाखर
प्रश्न 20: हरमन प्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) फुटबॉल
2) हॉकी
3) क्रिकेट
4) बॅडमिंटन
उत्तर : क्रिकेट
प्रश्न 21: खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
1) 16 मे
2) 24 मे
3) 31 मे
4) 2 जून
उत्तर : 31 मे
प्रश्न 22: ‘उखळ पांढरे होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?
1) आनंद होणे
2) भांडण होणे
3) भरपूर कष्ट करणे
4) वैभव प्राप्त होणे
उत्तर : वैभव प्राप्त होणे
प्रश्न 23: महाराष्ट्र राज्यात 50 वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) भंडारा
2) चंद्रपूर
3) अमरावती
4) कोल्हापूर
उत्तर : चंद्रपूर
प्रश्न 24: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत ?
1) राधाकृष्ण विखे पाटील
2) देवेंद्र फडणवीस
3) एकनाथ शिंदे
4) बाळासाहेब थोरात
उत्तर : राधाकृष्ण विखे पाटील
प्रश्न 25: तलाठी या पदावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते ?
1) ग्रामसेवक
2) मंडळ अधिकारी
3) सरपंच
4) तहसीलदार
उत्तर : मंडळ अधिकारी
प्रश्न 26: महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे ‘अहिल्यादेवी नगर’ असे नामांतर करण्याची घोषणा केली आहे ?
1) पुणे
2) अहमदनगर
3) कोल्हापूर
4) सातारा
उत्तर : अहमदनगर
प्रश्न 27: महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत कोणत्या जिल्यात 4.2 मेगा वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे ?
1) सातारा
2) पुणे
3) कोल्हापूर
4) रायगड
उत्तर : सातारा
प्रश्न 28: खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?
1) जर्मनी
2) इंग्लंड
3) अमेरिका
4) मॉरिशस
उत्तर : मॉरिशस
प्रश्न 29: भारताचा नाटो प्लस श्रेणी मध्ये समावेश करण्याची शिफारस कोणत्या देशाच्या संसद समितीने केली आहे ?
1) अमेरिका
2) रशिया
3) चीन
3) इंग्लंड
उत्तर : अमेरिका
प्रश्न 30: जर्मनीने आपल्या देशातील कोणत्या देशाचे दुतावास कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ?
1) रशिया
2) चीन
3) पाकिस्तान
4) अफगाणिस्तान
उत्तर : रशिया
talathi question paper in marathi
Very nice video sir
Enjoy the best roulette payouts
7 gold gigablox casino game https://www.bestenroulette.com.