District Court Questions Paper 06 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 06
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. हे प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरतील. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, न्यायालयाविषयी संबंधित असणारे महत्वाचे प्रश्न तसे चालू घडामोडी 2023-24 आणि मागील वर्षी विचारलेलेमहत्त्वाचे आणि दरवर्षी विचारलेले प्रश्न घेतले आहेत.
1. महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगासाठी न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1) छ. संभाजीनगर
2) पुणे
3) नागपूर
4) नाशिक
उत्तर : 2) पुणे
2. समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता ?
1) ऑस्ट्रेलिया
2) नॉर्वे
3) आयर्लंड
4) न्युझीलँड
उत्तर : 3) आयर्लंड
3. सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1) मणिपूर
2) केरळ
3) सिक्कीम
4) मेघालय
उत्तर : 4) मेघालय
🟢 महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
🟢 आरोग्य भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
4. कोणत्या देशाने अंतराळात भाताची पीक घेतले आहे आणि त्याला ‘ स्पेस राईस ‘ असे नाव दिले आहे ?
1) भारत
2) चीन
3) अमेरिका
4) रशिया
उत्तर : 2) चीन
6. भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
1) 2001 साली
2) 2002 साली
3) 2004 साली
4) 2005 साली
उत्तर : 4) 2005 साली
6. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात ?
1) पंतप्रधान
2) राष्ट्रपती
3) राज्यपाल
4) मुख्यमंत्री
उत्तर : 2) राष्ट्रपती
7. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
1) छ. संभाजीनगर
2) नागपूर
3) पणजी
4) नवी मुंबई
उत्तर : 4) नवी मुंबई
8. ‘फेडरल कोर्ट ऑफ इंडिया’ चे सर्वोच्च न्यायालय’ मध्ये रूपांतर कधी झाले ?
1) 26 नोव्हेंबर 1949
2) 26 जानेवारी 1950
3) 14 जानेवारी 1935
4) 9 डिसेंबर 1946
उत्तर : 2) 26 जानेवारी 1950
9. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?
1) बहिणाबाई चौधरी
2) इंदिरा संत
3) पद्मा गोळे
4) शांता शेळके
उत्तर : 1) बहिणाबाई चौधरी
10. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले ?
1) दत्ता वामन पोतदार
2) विष्णुशास्त्री चिपळूणकर
3) इतिहासाचार्य राजवाडे
4) महर्षी धोंडो कर्वे
उत्तर : 2) विष्णुशास्त्री चिपळूणकर
11. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात ?
1) होन
2) दाम
3) शिवराई
4) टंका
उत्तर : 3) शिवराई
12. खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास विरोध दर्शविला होता ?
1) हैदराबाद
2) काश्मीर
3) जुनागड
4) वरील सर्व
उत्तर : 4) वरील सर्व
13. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) चंद्रपूर
2) यवतमाळ
3) गडचिरोली
4) भंडारा
उत्तर : 1) चंद्रपूर
14. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो ?
1) 16 सप्टेंबर
2) 16 ऑक्टोबर
3) 16 नोव्हेंबर
4) 24 ऑगस्ट
उत्तर : 1) 16 सप्टेंबर
15. भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आली ?
1) केरळ
2) महाराष्ट्र
3) ओडिशा
4) तेलंगणा
उत्तर : 3) ओडिशा
16. महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता ?
1) भारत
2) न्यूझीलंड
3) स्कॉटलंड
4) जर्मनी
उत्तर : 3) स्कॉटलंड
17. अमित शहा यांनी कोणत्या शहरात स्वामी रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ पीस चे अनावरण केले ?
1) लदाख
2) जयपूर
3) श्रीनगर
4) जम्मू
उत्तर : 3) श्रीनगर
18. हिमरू शालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
1) मालेगाव
2) सोलापूर
3) इचलकरंजी
4) छ. संभाजीनगर
उत्तर : 4) छ. संभाजीनगर
19. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण ?
1) सुनील गावस्कर
2) सचिन तेंडुलकर
3) कपिल देव
4) विराट कोहली
उत्तर : 1) सुनील गावस्कर
20. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते ?
1) आदिनाथ
2) महावीर
3) पार्श्वनाथ
4) ऋषभदेव
उत्तर : 4) ऋषभदेव
21. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली ?
1) बराकपूर
2) कानपूर
3) मेरठ
4) आग्रा
उत्तर : 1) बराकपूर
22. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) डॉ. राजेंद्र प्रसाद
3) जवाहरलाल नेहरू
4) बी. एन. राव
उत्तर : 4) बी. एन. राव
23. राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे ?
1) राष्ट्रपती
2) पंतप्रधान
3) संसद
4) सर्वोच्च न्यायालय
उत्तर : 3) संसद
24. महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम दहा लाखावरून किती रुपये करण्यात आली ?
1) 15 लक्ष रुपये
2) 20 लक्ष रुपये
3) 22 लक्ष रुपये
4) 25 लक्ष रुपये
उत्तर : 4) 25 लक्ष रुपये
25. मराठा व कुणबी जातीतील उमेदवारांसाठी पीएचडी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य योजना कोणामार्फत राबविण्यात येते ?
1) बार्टी
2) सारथी
3) महाज्योती
4) अभिछात्र वृत्ती योजना
उत्तर : 2) सारथी
26. अभिनेते रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता ?
1) मुंबईचा फौजदार
2) पानिपत
3) झुंज
4) देवता
उत्तर : 2) पानिपत
27. महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे ?
1) नागपूर
2) नाशिक
3) पुणे
4) मुंबई
उत्तर : 1) नागपूर
28. राज्यातील मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे ?
1) मांघर
2) भिलार
3) हिवरे बाजार
4) यापैकी नाही
उत्तर : 1) मांघर
29. देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?
1) छ. संभाजीनगर
2) परभणी
3) बीड
4) लातूर
उत्तर : 4) लातूर
30. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोठे आहे ?
1) बेंगलोर
2) मुंबई
3) नवी दिल्ली
4) पुणे
उत्तर : 3) नवी दिल्ली
खूपच सुंदर प्रश्न होते सर मॅडम