Talathi Question Paper Online Test 03 : Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.

प्रश्न : 1. बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार शोनार बांगला हे खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?
1) रवींद्रनाथ टागोर
2) गगन हरकारा
3) शाम बेनेगल
4) काळजी इस्लाम
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
प्रश्न : 2. विविध राज्यांना वाटप केलेले लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात ?
1) आकार
2) लोकसंख्या
3) संसाधन
4) उत्पन्न
उत्तर : लोकसंख्या
प्रश्न : 3. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करा .
खाई त्याला ……………..
1) भूक फार
2) चक्कर येईल
3) खवखवे
4) घाई फार
उत्तर : खवखवे
प्रश्न : 4. स्टीव्ह जॉब्स यांच्या जोडीला ॲपल कम्प्युटर स्थापन करण्यासाठी कोण साथीदार होता ?
1) बिल गेट्स
3) विंट सर्फ
3) स्टीव्ह वोझियाक
4) लॅरी पेज
उत्तर : स्टीव्ह वोझियाक
प्रश्न : 5. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी केलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी 1969 मध्ये आपले अहवाल कोणी दिला होता ?
1) दांडेकर समिती
2) प्रशासकीय सुधारणा आयोग
3) भगवती समिती
4) महालनोबिस समिती
उत्तर : प्रशासकीय सुधारणा आयोग
प्रश्न : 6. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गुजरात राज्याच्या सीमेशी सामायिक नाही ?
1) छत्तीसगड
2) महाराष्ट्र
3) मध्य प्रदेश
4) राजस्थान
उत्तर : छत्तीसगड
प्रश्न : 7. राजाला त्याच्या राज्याची व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ ……………. वेद आहे.
1) सामवेद
2) यजुर्वेद
3) ऋग्वेद
4) अथर्ववेद
उत्तर : अथर्ववेद
प्रश्न : 8. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार कंपनीचे नाव काय आहे ?
1) रिलायन्स जिओ
2) रिलायन्स लिफ्ट
3) रिलायन्स इन्फोकॉम
4) रिलायन्स मोबाईल
उत्तर : रिलायन्स जिओ
प्रश्न : 9. ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते, त्यास …………….. असे म्हटले जाते.
1) कर्तरी प्रयोग
2) समापन कर्मणी
3) प्रधानकर्तृक कर्मणी
4) शक्य कर्मणी
उत्तर : प्रधानकर्तृक कर्मणी
प्रश्न : 10. ‘पलटण’ हा समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जाईल ?
1) सैनिक
2) उतारू
3) साधू
4) महिला
उत्तर : सैनिक
प्रश्न : 11. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी ……………… या दिवशी साजरा केला जातो.
1) 2 ऑक्टोबर
2) 3 ऑक्टोबर
3) 6 ऑक्टोबर
4) 7 ऑक्टोबर
उत्तर : 2 ऑक्टोबर
प्रश्न : 12. अण्णा, अक्का, ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेले शब्द आहेत ?
1) कानडी
2) गुजराती
3) तेलुगु
4) हिंदी
उत्तर : कानडी
👇 अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 09
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 10
प्रश्न : 13. वर्ल्ड टूर फायनल ही बॅडमिंटन मधील स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण आहे ?
1) प्रकाश पदुकोण
2) पी गोपीचंद
3) सायना नेहवाल
4) पी व्ही सिंधू
उत्तर : सायना नेहवाल
प्रश्न : 14. ‘दंगल’ हा चित्रपट कोणत्या महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे ?
1) बबीता फोगट
2) गीता फोगट
3) दिनेश फोगट
4) रंजना फोगट
उत्तर : गीता फोगट
प्रश्न : 15. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्द नाहीत ?
1) उजवा x डावा
2) गुरू x शिष्य
3) चढण x उतार
4) आहार x भोजन
उत्तर : आहार x भोजन
प्रश्न : 16. तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो ?
1) मंडळ अधिकारी
2) नायब तहसीलदार
3) अव्वल कारकून
4) पेशकार
उत्तर : मंडळ अधिकारी
प्रश्न : 17. मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पाहून महाराष्ट्रात प्रवेशणारी………….. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
1) गोदावरी नदी
2) तापी नदी
3) भीमा नदी
4) वैनगंगा नदी
उत्तर : तापी नदी
प्रश्न : 18. ‘गाजरपारखी’ या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
1) चांगल्याची पारख नसलेला
2) गाजर पारखणारा
3) निरुपयोगी सल्ला देणारा
4) गुणांची कदर न करणारा
उत्तर : चांगल्याची पारख नसलेला
प्रश्न : 19. छ. शिवाजी महाराजांच्या दुर्गानिर्मिती संबंधी, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे ?
1) गीता रहस्य
2) ग्रामगीता
3) शंभू भूषण
4) बुधभूषण
उत्तर : बुधभूषण
प्रश्न : 20. जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी खालीलपैकी कोणत्या देशात आढळला ?
1) चीन
2) इटली
3) अमेरिका
4) भारत
उत्तर : अमेरिका
प्रश्न : 21. देशातील पहिली राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे ?
1) चंदीगड
2) नागपूर
3) बेंगलोरु
4) भोपाळ
उत्तर : भोपाळ
प्रश्न : 22. जगाला सायकलने फेरी पूर्ण करणारी सर्वात जलद आशियाई व्यक्ती कोण ठरली आहे ?
1) शुभांगी जोशी
2) अर्पिता गोखले
3) सोनाली देशपांडे
4) वेदांगी कुलकर्णी
उत्तर : वेदांगी कुलकर्णी
प्रश्न : 23. भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे अस्तित्वात येणार आहे ?
1) अलाहाबाद
2) पटना
3) गोरखपुर
4) लखनऊ
उत्तर : पटना
प्रश्न : 24. केदार जाधव हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) क्रिकेट
2) फुटबॉल
3) हॉकी
4) हॅन्डबॉल
उत्तर : क्रिकेट
प्रश्न : 25. ‘पाणी पडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून अचूक निवडा ?
1) लपवून ठेवणे
2) वाया जाणे
3) स्वीकारणे
4) नाश होणे
उत्तर : वाया जाणे
प्रश्न : 26. दरवर्षी जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 5 जून
2) 6 जून
3) 7 जून
4) 8 जून
उत्तर : 8 जून
प्रश्न : 27. गीतांजली अय्यर यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोणत्या चैनल च्या न्यूज अँकर होत्या ?
1) आज तक
2) दूरदर्शन
3) झी न्यूज
4) स्टार न्युज
उत्तर : दूरदर्शन
प्रश्न : 28. लिंडा याकारीनो यांची कोणत्या सोशल मीडिया कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती झाली आहे ?
1) फेसबुक
2) व्हाट्सअप
3) ट्विटर
4) इंस्टाग्राम
उत्तर : ट्विटर
प्रश्न : 29. महाराष्ट्र राज्यात कैद्याना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबविण्यात आला आहे ?
1) सांगली
2) नागपूर
3) पुणे
4) मुंबई
उत्तर : पुणे
प्रश्न : 30. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे ?
1) महाराष्ट्र
2) बिहार
3) आसाम
4) गोवा
उत्तर : महाराष्ट्र

