
Mahavitaran Bharti 2025 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2025 | महावितरण भरती 2025 सराव प्रश्नसंच भाग 07 | Mahavitaran Bharti 2025 Question Paper | MSCBE Bharti
तर आपण त्याचा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे घेत आहोत. जेणेकरून आपल्याला या प्रश्नांचा थोडा तरी फायदा नक्कीच मिळेल, सोबतच आपल्याला या प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या “मराठी नौकरी” टेलिग्राम चॅनेलला JOIN करा.
प्रश्न 1: मॅग्नेट बनविण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ?
1) ॲल्युमिनियम
2) आयर्न
3) ब्रास
4) कॉपर
उत्तर : 2) आयर्न
प्रश्न 2: प्रेशर कॉइलची रचना ………. असते.
1) बारीक तारेची कमी वेढ्यांची
2) जाड तारेची कमी वेढ्यांची
3) जाड तारेची जास्त वेढ्यांची
4) बारीक तारेची जास्त वेढ्यांची
उत्तर : 4) बारीक तारेची जास्त वेढ्यांची
प्रश्न 3: सोल्डरिंग करताना कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साईडचा थर विरघळण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
1) सोल्डरिंग फ्लक्स
2) सोल्डरिंग बीट
3) बॉडिंग एजंट
4) सोल्डर
उत्तर : 1) सोल्डरिंग फ्लक्स
प्रश्न 4: वीज वाहक तारेभोवती निर्माण झालेल्या मॅग्नेटिक रेषांची दिशा कोणत्या नियमाने पडताळून पाहता येते ?
1) फॅरेडेच्या दुसऱ्या
2) कुलंबच्या पहिल्या
3) फॅरेडेच्या पहिल्या
4) कुलंबच्या दुसऱ्या
उत्तर : 3) फॅरेडेच्या पहिल्या
प्रश्न 5: ज्या पदार्थाचे रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही त्याला …………. म्हणतात.
1) संयुगे
2) मूलद्रव्य
3) रेणू
4) अणू
उत्तर : 2) मूलद्रव्य
प्रश्न 6: इलेक्ट्रो स्टॅटिकमुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो ?
1) वॅटमीटर
2) व्होल्टमीटर
3) ॲमीटर
4) एनर्जी मीटर
उत्तर : 2) व्होल्टमीटर
प्रश्न 7: दीर्घकाळ वापरात नसणारी बॅटरी चार्ज करण्याकरिता चार्जिंगची ………….. पद्धत वापरतात.
1) ट्रिकल चार्ज
2) कॉन्स्टंट करंट
3) रेक्टिफायर
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 4) वरीलपैकी सर्व
प्रश्न 8: ………… अग्निशामक मध्ये फेस उत्पन्न करणारी द्रव्य जास्त प्रेशर खाली भरलेली असते.
1) ड्राय पावडर
2) कार्बन डाय-ऑक्साइड
3) हेलॉन
4) फोम
उत्तर : 4) फोम
प्रश्न 9: सरळ जाणाऱ्या सप्लायचा टॅप करून दुसरीकडे न्यायचा असेल तर ……….. जॉईंट वापरतात.
1) प्लेन टॅप
2) डबल क्रॉस टॅप
3) मॅरीड
4) ब्रिटानिया टी
उत्तर : 1) प्लेन टॅप
प्रश्न 10: एका लाइटिंग सब सर्किटमध्ये भारतीय विद्युत नियमानुसार जास्तीत जास्त किती पॉईंट जोडले पाहिजेत ?
1) 8
2) 10
3) 12
4) 14
उत्तर : 2) 10
प्रश्न 11: औद्योगिक वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये लाइटिंग सर्किटसाठी मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा उपयोग केला जातो ?
1) आयर्न क्लॅड डबल पोल स्विच
2) डबल पोल स्विच
3) ट्रिपल पोल स्विच
4) आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच
उत्तर : 1) आयर्न क्लॅड डबल पोल स्विच
प्रश्न 12: कंडक्टर मधून करंट वाहत असताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता ही ………… असते.
1) करंटच्या समप्रमाणात
2) करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात
3) रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 2) करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात
प्रश्न 13: सिरीज सर्किट मधील उच्च किमतीच्या रेजिस्टन्स मध्ये मोठ्या प्रमाणात कोणता ड्रॉप होतो ?
1) व्होल्टेज
2) रेजिस्टन्स
3) करंट
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 3) करंट
प्रश्न 14: डी. सी. सिरीज मोटरला आर्मेचर डायव्हर्टर रजिस्टन्स जोडल्यास मोटारची स्पीड किती बदलता येईल ?
1) साधारण स्पीड पेक्षा कमी
2) साधारण स्पीड पेक्षा जास्त
3) साधारण स्पीड पेक्षा जास्त आणि कमी
4) यापैकी नाही
उत्तर : 1) साधारण स्पीड पेक्षा कमी
प्रश्न 15:: व्होल्ट मीटरच्या टर्मिनल मधील रेजिस्टन्स आणि मीटरची रेंज यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात ?
1) लोडिंग इफेक्ट
2) सेन्सिटिव्हिटी
3) व्होल्टेज ड्रॉप इफेक्ट
4) अचूकता
उत्तर : 2) सेन्सिटिव्हिटी
प्रश्न 16: लो पॉवर फॅक्टरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय सुधारावे लागते ?
1) पॉवर
2) कॅपॅसिटर
3) पॉवर फॅक्टर
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 2) कॅपॅसिटर
प्रश्न 17: ट्रान्सफॉर्मर मध्ये एका कॉइलची पॉवर दुसऱ्या कॉइल कडे कशी ट्रान्सफर होते ?
1) इलेक्ट्रिकली
2) इलेक्ट्रो – मेकॅनिकली
3) मॅग्नेटिकली
4) इलेक्ट्रो – स्टॅटिकली
उत्तर : 3) मॅग्नेटिकली
प्रश्न 18: फाईन सॉल्डरमध्ये लेड आणि टिन यांचे मिश्रण किती असते ?
1) 65% टिन 35% लेड
2) 50% प्रत्येकी
3) 90% टिन 10% लेड
4) 60% टिन 40% लेड
उत्तर : 3) 90% टिन 10% लेड
प्रश्न 19: पॉझिटिव्हकडून पाठवलेला इलेक्ट्रिक करंट मध्येच खंडित होऊन नेगेटिव्हकडे न पोहोचणारे सर्किट म्हणजे ………… .
1) कम्प्लीट सर्किट
2) शॉर्ट सर्किट
3) ओपन सर्किट
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 3) ओपन सर्किट
प्रश्न 20: विजेच्या वहनास विरोध करणाऱ्या परंतु करंट वाहू देणाऱ्या पदार्थाला काय म्हटले जाते ?
1) सेमी कंडक्टर
2) गुड कंडक्टर
3) बॅड कंडक्टर
4) इन्स्यूलेटर
उत्तर : 1) सेमी कंडक्टर
प्रश्न 21: ‘पतंग झाडावर अडकला.’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
1) उभयान्वयी अव्यय
2) क्रियाविशेषण अव्यय
3) केवलप्रयोगी अव्यय
4) शब्दयोगी अव्यय
उत्तर : 4) शब्दयोगी अव्यय
स्पष्टीकरण : शब्दयोगी अव्यय हे नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात.
वरील वाक्यात झाड नामाला वर शब्दयोगी अव्यय जोडलेले आहे.
प्रश्न 22: ‘औषध’ या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे ?
1) रस
2) पाणी
3) दवा
4) गोळी
उत्तर : 2) पाणी
स्पष्टीकरण : जोडीने येणारे शब्द – औषधपाणी, रसपान, दवादारू
प्रश्न 23: ‘पय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
1) पाणी
2) दूध
3) गोरस
4) वरील सर्व
उत्तर : 4) वरील सर्व
स्पष्टीकरण : पय – पाणी, दूध, गोरस
पाणी – जल, उदक, तोय, अंबू, नीर, जीवन, सलील
प्रश्न 24: खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ‘बादरायण संबंध असणे’
1) लग्न होणे
2) वाळीत टाकणे
3) आपल्या तंत्राने वागणे
4) ओढूनताणून संबंध लावणे
उत्तर : 4) ओढूनताणून संबंध लावणे
स्पष्टीकरण : बादरायण संबंध – ओढूनताणून संबंध लावणे
लग्न होणे – चतुर्भुज होणे
आपल्या तंत्राने वागणे – बोटावर नाचविणे
वाळीत टाकणे – बहिष्कार करणे
प्रश्न 25: ‘अडकित्ता’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
1) हिंदी
2) फारशी
3) कानडी
4) पोर्तुगीज
उत्तर : 3) कानडी
स्पष्टीकरण : परप्रांतीय भारतीय शब्द किंवा स्वदेशी शब्द – कानडी- अडकित्ता
भाकरी, तूप, गुढी, बांगडी, अप्पा, आई, आक्का.
Mahavitaran Bharti 2025 Question Paper 07 | Vidyut Sahayak Bharti 2025 | महावितरण भरती 2025 सराव प्रश्नसंच भाग 07 | Mahavitaran Bharti 2025 Question Paper | MSCBE Bharti
मित्रांनो, हे प्रश्न जर आपल्याला आवडले असतील तर आपण कमेंट मध्ये आपल्या Youtube Channel देखील Subscribe करून ठेवा, कारण आपण त्या ठिकाणी दररोज अशाच प्रश्नसंच विडियो माध्यमाद्वारे घेत असतो.
YouTube Channel : Marathi Naukri
Telegram Channel : Marathi Naukri
WhatsApp Channel : Marathi Naukri