पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 14 || Police Bharti 2021 Practice Question Paper 14 || Marathi Naukri
प्रश्न १ : विधेयक वित्त विधेयक आहे की नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो ?
१) राष्ट्रपती
२) उपराष्ट्रपती
३) लोकसभेचे सभापती ✔
४) पंतप्रधान
प्रश्न २ : राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
१) राष्ट्रपती
२) उपराष्ट्रपती ✔
३) पंतप्रधान
४) महान्यायवादी
प्रश्न ३ : पृथ्वीचा आस हा कक्षा प्रतलाशी किती अंशाचा कोण करतो ?
१) विशालकोन
२) चौकोन
३) त्रिकोण
४) काटकोन ✔
प्रश्न ४ : आरोह पर्जन्य प्रामुख्याने ………… परदेशात पडतो ?
१) विषुववृत्तीय ✔
२) किनारपट्टी
३) पर्वतीय
४) ध्रुवीय
प्रश्न ५ : महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत ?
१) गाळणा टेकड्या
२) गावीलगड
३) गायखुरी
४) दरकेसा टेकड्या ✔
प्रश्न ६ : ‘मुर्हा’ ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे ?
१) गाय
२) उंट
३) घोडा
४) म्हैस ✔
प्रश्न ७ : ‘गीतांजली’ या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत ?
१) कुसुमाग्रज
२) रविंद्रनाथ टागोर ✔
३) सुरेश भट
४) बंकीमचंद्र चॅटर्जी
प्रश्न ८ : सौदी अरेबिया या देशाचा प्रमुख क्रीडा प्रकार कोणता आहे ?
१) उंटांची शर्यत ✔
२) आट्यापाट्या
३) घोड्याची शर्यत
४) कोंबड्यांची झुंज
प्रश्न ९ : बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली ?
१) गो.ग. आगरकर
२) गोपाळ कृष्ण गोखले
३) नाना शंकर शेठ ✔
४) वि.दा. सावरकर
प्रश्न १० : सह्याद्री निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे ?
१) वली
२) भूकंप
३) प्रस्तरभंग ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ११ : कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ?
१) पानिपत
२) बक्सार
३) झांसी
४) प्लासी ✔
प्रश्न १२ : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरालॉजी संशोधन संस्था कोठे आहे ?
१) नागपुर
२) पुणे ✔
३) मुंबई
४) दिल्ली
प्रश्न १३ : हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता ?
१) अदिलशाहा
२) वाकाटकांचा
३) यादवांचा ✔
४) निजामशहाचा
प्रश्न १४ : दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने …………. व ………… साठी जगप्रसिद्ध आहे ?
१) चांदी व तांबे
२) अभ्रक व तांबे
३) चांदी व हिरे
४) सोने व हिरे ✔
प्रश्न १५ : पश्चिम घाटातील कुंद्रेमुख हे खाणक्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?
१) कर्नाटक ✔
२) केरळ
३) गोवा
४) महाराष्ट्र
प्रश्न १६ : राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव असलेली लुनी नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ?
१) विंध्य पर्वत
२) अरवली पर्वत ✔
३) हिमालय पर्वत
४) सातपुडा पर्वत
प्रश्न १७ : चंबळ नदी खोर्यातील घड्यांचा प्रदेश …………… म्हणून ओळखला जातो ?
१) तराई
२) भंड्डाड
३) बिहड ✔
४) गुहा
प्रश्न १८ : बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?
१) ताग
२) ऊस
३) तूर
४) नीळ ✔
प्रश्न १९ : 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून घोषित केला जातो ?
१) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन ✔
२) जागतिक सत्यापण दिन
३) आंतरराष्ट्रीय शांतता दिन
४) जागतिक सत्याग्रह दिन
प्रश्न २० : भारतात सर्वात जास्त शिलालेख ………….. यांचे प्राप्त झाले आहेत ?
१) सम्राट अकबर
२) औरंगजेब
३) शिवाजी महाराज
४) सम्राट अशोक ✔