पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 16 || Police Bharti 2021 Practice Question Paper 16 || Marathi Naukri
प्रश्न १ : नटसम्राट या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका खालीलपैकी कोणत्या नायकाने भूषविली आहे ?
१) सदाशिव अमरापूरकर
२) नाना पाटेकर ✔
३) श्रीराम लागू
४) सचिन खेडेकर
प्रश्न २ : भारताचे पंतप्रधान रेडियोवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात ?
१) दिल की बात
२) आप की बात
३) मन की बात ✔
४) छोटी सी बात
प्रश्न ३ : मुळशी सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे ?
१) पुणे ✔
२) सोलापूर
३) सातारा
४) अहमदनगर
प्रश्न ४ : लोकमान्य टिळकांना हिंदी असंतोषाचे जनक असे कोणी संबोधले ?
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड माऊंट बॅटन
३) सर विल्यम चर्चिल
४) सर व्हॅलेंटाईन चिरोल ✔
प्रश्न ५ : आग्नेय आशियातील सर्वात महत्त्वाचे नदी खोरे कोणते आहे ?
१) मेकाँग ✔
२) यांगत्से
३) इरावती
४) तैग्रीस
प्रश्न ६ : भूमध्य सागराच्या किनार्यावर निसर्ग सौंदर्याने नटलेले हैफा हे प्रमुख बंदर कोणत्या देशात आहे ?
१) इजिप्त
२) इस्त्राइल ✔
३) लेबॅनॉन
४) ग्रीक
प्रश्न ७ : सुलतान अझलन शाह चषक खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे ?
१) क्रिकेट
२) फुटबॉल
३) हॉकी ✔
४) पोलो
प्रश्न ८ : कुविख्यात चंदन तस्कर विरप्पन याला पकडण्यासाठी राबवलेली मोहीम कोणती ?
१) रेड डॉन
२) ककून ✔
३) टायगर
४) सॅंडल
प्रश्न ९ : बल्लारपुर हे ………….. नदीच्या खोर्यातील महत्त्वाचे दगडी कोळसा क्षेत्र आहे ?
१) वैनगंगा
२) वर्धा ✔
३) प्राणहीता
४) पैनगंगा
प्रश्न १० : महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो ?
१) अहमदनगर ✔
२) अकोला
३) परभणी
४) रत्नागिरी
प्रश्न ११ : चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
१) वैनगंगा
२) वैतरणा
३) इंद्रावती ✔
४) भीमा
प्रश्न १२ : भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?
१) 3
२) 4
३) 7
४) 5 ✔
प्रश्न १३ : महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील ‘तूफान सेना’ स्थापन झाली होती ?
१) सोलापूर
२) सातारा ✔
३) पुणे
४) कोल्हापूर
प्रश्न १४ : प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे ?
१) रायरी
२) भोरप्या ✔
३) कमळगड
४) चंदन-वंदन
प्रश्न १५ : महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते ?
१) बॉम्बे असोसिएशन ✔
२) डेक्कन सभा
३) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसीएशन
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १६ : भुकवचाचे खालील कोणते प्रमुख दोन भाग कोणते आहेत ?
१) सियाल व गाभा
२) गाभा व सायमा
३) गाभा व प्रावरण
४) सियाल व सायमा ✔
प्रश्न १७ : स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस ही संस्था कोणी स्थापन केली ?
१) स्वामी रामानंद ✔
२) श्री.दैवीसिंह चौहान
३) एम.के. पन्नीकर
४) गोविंदाभाई श्रोफ
प्रश्न १८ : विष्णुदास भावे यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक कोणते ?
१) शामची आई
२) गारंबीचा बापू
३) मुक्तात्मा
४) सीता स्वयंवर ✔
प्रश्न १९ : बाबा पद्मनजी लिखित मराठीतील पहिली कादंबरी कोणती ?
१) सुशिलेचा देव
२) यमुना पर्यटन ✔
३) पण लक्षात कोण घेतो
४) भंगलेले देऊळ
प्रश्न २० : ब्रिटिश सरकारने रौलट कायदा कधी पास केला ?
१) 1920 साली
२) 1921 साली
३) 1919 साली ✔
४) 1918 साली