पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 10 || Police Bharti 2021 Practice Question Paper 10 || Marathi Naukri
प्रश्न १ : अमेरिकेच्या संविधानातील पंचविसावी दुरूस्ती कशाशी संबंधित आहे ?
१) राष्ट्रपती पदाची स्थापना
२) नागरिकांचा हक्क
३) राष्ट्रपती पदाची रिक्त जागा,पदाचा उत्तराधिकारी आणि अपंगत्त्व ✔
४) कोणतीही व्यक्ती दोन वेळा पेक्षा जास्त वेळा पदावर निवडली जाऊ शकत नाही
प्रश्न २ : कोणत्या द्रुतगती महामार्गावर भारतात प्रथमच प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग तयार केला आहे ?
१) दिल्ली-मेरठ
२) दिल्ली-मुंबई ✔
३) मुंबई-नागपुर
४) अहमदाबाद-वडोदरा
प्रश्न ३ : अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) बाबा आमटे
२) प्रकाश आमटे
३) विकास आमटे
४) शरद जोशी ✔
प्रश्न ४ : पंडूम हा कशाचा प्रकार आहे ?
१) नृत्य
२) गीत
३) वाद्य
४) सण ✔
प्रश्न ५ : ………. यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते ?
१) वि.रा. शिंदे
२) कर्मवीर भाऊराव पाटील ✔
३) लोकमान्य टिळक
४) शाहू महाराज
प्रश्न ६ : खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून घोषित केला आहे ?
१) 25 मे
२) 25 मार्च
३) 25 जानेवारी ✔
४) 12 जानेवारी
प्रश्न ७ : महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
१) पंढरपूर
२) नाशिक ✔
३) अमरावती
४) नागपुर
प्रश्न ८ : महाराष्ट्रात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
१) औरंगाबाद
२) पुणे
३) अमरावती
४) नागपुर ✔
प्रश्न ९ : महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
१) नाशिक
२) पुणे
३) अहमदनगर ✔
४) जळगाव
प्रश्न १० : महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे ?
१) ओझर ✔
२) तळोजा
३) सातारा
४) अहमदनगर
प्रश्न ११ : इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
१) समता स्थळ
२) एकता स्थळ
३) शक्ती स्थळ ✔
४) राजघाट
प्रश्न १२ : सात बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
१) चेन्नई
२) मुंबई ✔
३) कोलकाता
४) दिल्ली
प्रश्न १३ : पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे ?
१) नाथसागर ✔
२) यशवंत सागर
३) गोदा सागर
४) प्रीती संगम
प्रश्न १४ : 2011 च्या जनगणनेनुसार नागपुर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?
१) 82 टक्के
२) 82.5 टक्के
३) 84.3 टक्के
४) 89 टक्के ✔
प्रश्न १५ : वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे ?
१) गोविंद तिसरा
२) कृष्ण पहिला ✔
३) ध्रुव
४) दंतीदुर्ग
प्रश्न १६ : कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
१) अमरावती
२) नाशिक
३) नागपुर ✔
४) पुणे
प्रश्न १७ : खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील ………….. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे ?
१) पश्चिम महाराष्ट्र
२) मराठवाडा
३) विदर्भ ✔
४) कोकण
प्रश्न १८ : महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणत्या प्राण्याला संबोधित केले जाते ?
१) हत्ती
२) सिंह
३) शेकरू ✔
४) बैल
प्रश्न १९ : देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापुर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) नाशिक ✔
२) परभणी
३) औरंगाबाद
४) नांदेड
प्रश्न २० : सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे ‘मौसिनराम’ हे कोणत्या राज्यात आहे ?
१) सिक्किम
२) मेघालय ✔
३) ओडिशा
४) मिझोरम
प्रश्न २१ : ‘उगवत्या सूर्याचा देश’ कोणत्या देशाला संबोधले जाते ?
१) चीन
२) म्यानमार
३) जपान ✔
४) दक्षिण कोरिया
प्रश्न २२ : भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ?
१) जयपुर
२) मुंबई
३) दिल्ली
४) चंदीगड ✔
प्रश्न २३ : ………… नदी पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेले ‘माजुली’ हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे ?
१) तुंगभद्रा
२) महानदी
३) ब्रम्हपुत्रा ✔
४) सिंधु
प्रश्न २४ : क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ?
१) गोवा ✔
२) सिक्किम
३) केरळ
४) पंजाब