Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 10

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

01. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करा .
तळे राखील तो …………..
1) रखवालदार होईल
2) चौकीदार होईल
3) पाणी चाखील
4) आंघोळ करेल
उत्तर : पाणी चाखील

02. ………….. वर्षामध्ये, सोलापूर नगरपरिषद ही नगरपरिषदेच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकवणारी भारताची पहिली नगरपरिषद बनली.
1) 1930 साली
2) 1912 साली
3) 1935 साली
4) 1950 साली
उत्तर : 1930 साली

03. खालीलपैकी कोणता महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यामधील सर्वोच्च डोंगर आहे ?
1) साल्हेर
2) मोर्शी
3) चिखलदरा
4) गोलिया पहाड
उत्तर : गोलिया पहाड

04. तत्कालीन मुंबई राज्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1) 1956 साली
2) 1960 साली
3) 1962 साली
4) 1964 साली
उत्तर : 1960 साली

05. कान्हेरी गुहा या महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये स्थित आहेत ?
1) ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान
2) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
3) नवेगाव राष्ट्रीय उद्यान
4) चांदोली राष्ट्रीय उद्यान
उत्तर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

 

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

 

06. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले ?
1) घटना (दुसरी सुधारणा) कायदा, 1952
2) घटना (69 वी सुधारणा) कायदा, 1991
3) घटना (दहावी सुधारणा) कायदा, 1961
4) घटना (52 वी सुधारणा) कायदा, 1985
उत्तर : घटना (69 वी सुधारणा) कायदा, 1991

07. भारतीय वायुदल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 8 ऑक्टोबर
2) 10 ऑक्टोबर
3) 11 ऑक्टोबर
4) 9 ऑक्टोबर
उत्तर : 8 ऑक्टोबर

08. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते ?
1) लुकन
2) जांभी
3) रेगूर
4) गाळ मिश्रित
उत्तर : जांभी

09. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले ?
1) बाळाजी बाजीराव
2) सदाशिव राव
3) बालाजी विश्वनाथ
4) महादेव राव
उत्तर : बाळाजी बाजीराव

10. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे ?
1) नैपुण्य x अप्राविण्य
2) नीज x जाग
3) नीट x आरोग्य
4) पगडा x वर्चस्व
उत्तर : पगडा x वर्चस्व

marathi naukri telegram

11. …………… वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे.
1) चपराळा
2) कोयना
3) गौताळा
4) फणसाड
उत्तर : चपराळा

12. मराठा आणि ब्रिटिश सेनेदरम्यान दुसरे मराठा युद्ध किंवा 2 रे अँग्लो मराठा युद्ध किती वर्ष लढले गेले ?
1) तीन वर्षे
2) दोन वर्षे
3) आठ वर्षे
4) पाच वर्षे
उत्तर : दोन वर्षे

13. गडचिरोली मधील ग्लोरी ऑफ आलापल्ली येथे आढळणारा सर्वात वृक्ष खालीलपैकी कोणता आहे ?
1) साग
2) ऐन
3) भिजा
4) स्नेहा
उत्तर : साग

14. महाराष्ट्र मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत वित्तीय सहाय्यासाठी लक्षित शेतकरी गट ……….. हा आहे .
1) लघु शेतकरी
2) अनुसूचित जाती मधील शेतकरी
3) अनुसूचित जमाती मधील शेतकरी
4) इतर मागासवर्गीय समुदायातील शेतकरी
उत्तर : अनुसूचित जमाती मधील शेतकरी

15. महाराष्ट्रातील कोणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटाच्या सिल्वर जेलमध्ये कारावासात ठेवण्यात आले होते ?
1) गोपाळ कृष्ण गोखले
2) बाळ गंगाधर टिळक
3) दादाभाई नौरोजी
4) विनायक दामोदर सावरकर
उत्तर : विनायक दामोदर सावरकर

16. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त होती ?
1) बुलढाणा
2) नंदुरबार
3) सांगली
4) लातूर
उत्तर : नंदुरबार

17. भारताच्या स्वातंत्र्योत्तर अर्थव्यवस्थेच्या विकासाचे प्रारूप देणाऱ्या आठ प्रमुख भारतीय उद्योजकांच्या प्रस्तावाला काय नाव देण्यात आले होते ?
1) दिल्ली प्लान
2) कलकत्ता प्लान
3) लंडन प्लान
4) बॉम्बे प्लान
उत्तर : बॉम्बे प्लान

18. मुंबई येथील ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे कोणत्या ब्रिटिश राज्याच्या पदार्पण स्मरणोत्त्सवासाठी बांधण्यात आले होते ?
1) राणी विक्टोरिया
2) एडवर्ड तृतीय
3) जॉर्ज पंचम
4) राणी एलिझाबेथ
उत्तर : जॉर्ज पंचम

19. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्ये जोडली गेली आहेत ?
1) महाराष्ट्र व मध्य प्रदेश
2) महाराष्ट्र व गोवा
3) महाराष्ट्र व गुजरात
4) महाराष्ट्र व कर्नाटक
उत्तर : महाराष्ट्र व गोवा

marathi naukri telegram

20. तोफ, किल्ला, समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत ?
1) अरबी
2) फारसी
3) तेलगू
4) कानडी
उत्तर : फारसी

21. खालीलपैकी कोणता ‘अनुरक्त’ शब्दाचा समानार्थी शब्द नाही .
1) इच्छायुक्त
2) अनुरागी
3) प्रेमशब्द
4) अनासक्त
उत्तर : अनासक्त

22. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील मूलभूत विज्ञानासाठी सगळ्यात पायाभूत संशोधन करणारी सगळ्यात जुनी संस्था आहे ?
1) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च
2) नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी
3) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
4) इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स
उत्तर : इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स

23. ‘हाता तोंडाशी गाठ पडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल ?
1) जेमतेम खाण्यास मिळणे
2) हात तोंड एकत्र येणे
3) यातायात करणे
4) प्रारंभ करणे
उत्तर : जेमतेम खाण्यास मिळणे

24. ज्या दोषामुळे व्यक्ती तुमच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्याला …………. म्हणतात .
1) लघु दृष्टीदोष (मायोपिया)
2) दूरदृष्टीता (हायपरमेट्रोपिया)
3) मोतीबिंदू
4) पार पटल
उत्तर : लघु दृष्टीदोष (मायोपिया)

25. आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो ?
1) 15 मार्च
2) 13 मार्च
3) 21 मार्च
4) 10 मार्च
उत्तर : 21 मार्च

26. सर्वोच्च न्यायालयात कोणाच्या हस्ते ई फायलिंग 2.0 सेवेचा प्रारंभ झाला आहे ?
1) रंजन गोगई
2) तुषार मेहता
3) आर व्यंकटेशरमण
4) धनंजय चंद्रचूड
उत्तर : धनंजय चंद्रचूड

27. ‘वाजपेयी असेंट ऑफ द हिंदू राईट:1924-1977’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) अभिषेक चौधरी
2) संजय बारू
3) राजदीप सरदेसाई
4) निखिल वागळे
उत्तर : अभिषेक चौधरी

marathi naukri telegram

28. कोणत्या देशाच्या लस्कराच्या तोफखाना रेजिमेंट मध्ये पहिल्यांदाच महिलांचा समावेश झाला आहे ?
1) भारत
2) चीन
3) पाकिस्तान
4) सिंगापूर
उत्तर : भारत

29. मुबंई मेट्रो मध्ये जेष्ठ नागरिक अपंग व विद्यार्थ्यांना किती प्रवास भाड्यात किती टक्के सवलत मिळणार आहे ?
1) 20 टक्के
2) 15 टक्के
3) 10 टक्के
4) 25 टक्के
उत्तर : 25 टक्के

30. महाराष्ट्र राज्यातील पहिले सरकारी वाळू विक्री डेपो कोणत्या जिल्ह्यात सुरु होणार आहे ?
1) पुणे
2) नांदेड
3) सातारा
4) अहमदनगर
उत्तर : अहमदनगर

 


 

Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 10

 

2 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 10”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *